Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande
Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande

@Dr_of_Lifestyle

8 تغريدة 7 قراءة Nov 02, 2022
🫓 मैदा / गहू 🫓
🫓 मैदा हे गव्हाचं परिष्कृत पीठ आहे. त्यातले फायबर्स काढून टाकले जातात आणि बेंझेल पेरोऑक्सईड ने ब्लिच केलं जातं. त्यामुळे ते पांढरं दिसतं.
🫓 मैदयाने लठ्ठपणा वाढतो. रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे डायबेटिस सारखे आजार उद्भवतात.
🫓 मैदयाने पोट गच्च होतं. गॅस साचतो (Bloating) आणि त्यामुळे एक अस्वस्थ अशी भावना येते (Restlessness).
🫓गॅस जर वाढला तर करपट ढेकर येतात. तेव्हा छातीच्या मध्यभागी दुखणे (epigastrium),
डोकं दुखणे ई, असे त्रास होतात. तेव्हा समजायचं की ऍसिडिटी झालीये.
🫓भुवयांच्या मधोमध डोकं दुखत असेल तर ती ऍसिडिटी असते (Mostly).
🫓मैदायुक्त पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होते. तुम्ही आळशी बनता व साधी सर्दी ही लवकर हटत नाही.
🫓मैदा वाईट आहेच, पण गहू सुद्धा वाईटच.
🫓गव्हाचे पदार्थ सुद्धा काहीवेळा ऍसिडिटी निर्माण करतात. Bloating होतं. Gassy अबडोमेन होतं.
🫓कधी निरीक्षण केलं असेल तर समजेल तुम्हाला की भाकरी ही पचायला हलकी असते आणि चपाती जड. आपली आजी किंवा घरातले अजून मोठे हे कायम सांगताना दिसतात की भाकरी खा.😊
🫓 गहू न खाल्ल्याने काहीही अडत नाही. भाकरी वर शिफ्ट व्हा. ज्वारी, बाजरी, नाचणी, ई. हे सर्व पचायला हलके आहेत.
🫓गव्हात ग्लुटेन असतं. ज्यामुळे गव्हाला एक इ्लास्टिकपणा येतो. पण ह्याच ग्लुटेन ची काहींना अलर्जी असते, व म्हणून त्यांना इंटेस्टाईन चे विकार होतात (Celiac disease).
🫓आता येतो मुद्दा कोलेस्टे्रोलचा. अनलिमिटेड मटण थाळी खाताना चपात्या आणि भात हे अनलिमिटेड असतं. मटण अनलिमिटेड नसतं. 😅, आणि म्हणून आपण चपात्या वर चपात्या खातो कारण अनलिमिटेड आहे.. आणि इथे गल्लत होते.
🫓त्यामुळे गहू काय किंवा मैदा काय... हे सगळंच सोडा. वेळ लागेल. पण आपली
बॉडी आपलं ऐकते. जशी तिला सवय लावू, तसं ती करते. 😊सुरवातीला त्रास होईल, पण end result will be always good. आफ्टरऑल शेवट चांगला व्हायला हवा.!!
#नो_ग्लुटेन_नो_मैदा

جاري تحميل الاقتراحات...