Kalpesh | कल्पेश
Kalpesh | कल्पेश

@Atarangi_Kp

12 تغريدة Jan 03, 2025
तुम्हाला जीवनात अडकल्यासारखे वाटत असल्यास, 2025 सुरू होण्यापूर्वी ह्या १० गोष्टी लक्ष्यात ठेवा... x.com
1. परिस्थितीचा पूर्णपणे स्वीकार करा आणि ही परिस्थिती कायमच राहणार नाही हे मान्य करा.
चांगली असो किंवा वाईट बदल नीच्छित आहे त्यामुळे परिस्थिती स्वीकारून सतत काम करत रहा.
2. नियंत्रण सोडून द्या.
आपण बाह्य गोष्टींवर काहीही नियंत्रित करू शकत नाही म्हणून आपण काय नियंत्रित करू शकता यावर लक्ष केंद्रित करा; त्यानुसारच कृती करा.
3. घराबाहेर अधिक जा.
निसर्ग आपल्या जीवनातील बऱ्याच मानसिक आणि शारीरिक आजारांवर उत्तम औषध आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा, चाला, ट्रेकिंग आणि इतर ॲक्टिव्हिटी मध्ये सहभाग घ्या.
4. नकारात्मक विचार सोडून द्या.
तुमच्या विचारांना मनामध्ये दाबून ठेऊ नका त्यांना कागदावर लिहा, सकारात्मक असो किंवा नकारात्मक मन मोकळं करा, लिहा पुनर्विचार करा, बरेच प्रश्न सुटतील.
5. परिपूर्ण होण्याची गरज सोडून द्या.
कोणतीही कृती न करता परिपूर्ण नियोजन करण्यापेक्षा काहीतरी पूर्ण करणे नेहमीच चांगले असते. Perfection येईल पण त्यासाठी आधी सुरुवात करा.
6. तुमचे कारण शोधा.
आपण मनुष्य आहोत, फक्त जन्माला येईल जग सोडण हे जीवन तर कोणताही प्राणी जगतोच आपलं वेगळेपण आहे आपल्या जीवनाचं ध्येय काय? जीवनाचं कारण शोधा, त्यावर काम करा.
7. काहीतरी नवीन शिकण्यासाठी स्वतःला आव्हान द्या.
काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केल्याने तुमचा दिनक्रम बदलतो आणि तुम्हाला संपूर्ण नवीन मार्गावर नेऊ शकतो. त्यामुळे सतत शिकण्यावर भर द्या.
8. व्यायाम करा.
व्यायाम केवळ तुमचा मूड सुधारू शकत नाही, तर तुम्ही स्वतःला अधिक सकारात्मक बनवते, शारीरिक अरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील उत्तम बनते.
9. चांगल्या व्यक्तींना भेटा.
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री करा, अश्या व्यक्तींना भेटा, चर्चा करा जीवनाला एक योग्य दिशा द्यायची असेल तर हा संवाद तुम्हाला एक उत्तम दिशा देईल.
10. भूतकाळ सोडून द्या.
फक्त पुढे जात रहा आणि मागे वळून पाहू नका कारण तुम्ही परत भूतकाळात पोहोचू शकत नाही पण भविष्यावर नक्कीच काम करू शकता. भूतकाळ शिकवून जातो त्याची शिकवण घेऊन भविष्यामध्ये बदल करा.

جاري تحميل الاقتراحات...