6 تغريدة 2 قراءة Dec 12, 2024
खरंच कौतुकास्पद !! 👌👌👏👏👏🙏🙏
जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी एका साखर कारखान्याबाहेर विदेशी खजुराची झाडे पाहिली. प्रथमतः त्यांना ते फक्त शोभेची झाडे असल्याचे वाटले. बारही खजुराच्या झाडांचे इराण मधून भारतात इम्पोर्ट होते. ++ x.com
त्यामुळे शेंडगे यांना या विदेशी पिवळ्या खजूराची माहिती नव्हती. जेव्हा त्या झाडांवर फळे लागली, तेव्हा जगदीश यांच्या लक्षात आलं की हे पीक सतत आणि ऊसापेक्षा जास्त प्रॉफिट देणारे आहे.
जगदीश शेंडगे यांचे गाव तानवाडी, जालनामध्ये आहे, जे एक कोरडे आणि पाणीटंचाई असलेले क्षेत्र आहे. ++
बारही डेटला जास्त पाणी लागत नसल्याने आणि बाजारात त्याचे चांगले रेट मिळत असल्याने त्यांनी तीन एकरात बारही खजूर लागवड केली.
बारही डेट हा पिवळ्या रंगाचा खजूर गोड आणि सॉफ्ट असतो. तसेच तो फायबर्स आणि अँटीऑक्सिडन्ट्सने परिपूर्ण असतो. बारही खजुराचे झाड मजबूत असतं, त्याला जास्त पाणी ++
आणि जास्त खताची आवश्यकता नसते.
2020 मध्ये, जगदीशने गुजरातमधील एका नर्सरीतून 180 बारही खजूराची रोपं खरेदी केली. प्रत्येक रोपाची किंमत 4,000 असल्याने एकूण इन्व्हेस्टमेंट 9 लाख झाली. ही रोपं टिश्यू कल्चर वापरून तयार केली जातात आणि चौथ्या वर्षी फळे देतात. ++
त्यांनी ती 180 रोपं तीन एकरांत लावली. खजूराचे एक झाड तब्बल ७० वर्षे फळं देऊ शकते,ज्यामुळे ही लागवड प्रॉफिटेबल ठरते.
ऑरगॅनिक पद्धतीने खजूराची फार्मिंग करणाऱ्या जगदीश यांनी थेट झाडाच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी ठिबक सिंचन बसवले आहे.त्यात ते सोयाबीनचेही आंतरपीक घेत आहेत.++
ऑरगॅनिक खजुराच्या शेतीतून शेंडगे यांनी या पहिल्याच वर्षी एकरी 8 लाख रुपये कमावले. तीन एकरातून त्यांनी एकूण 24 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.
फेबुवरील वाॅलवरुन

جاري تحميل الاقتراحات...