आशीष माळी
आशीष माळी

@Garjana206

4 تغريدة 1 قراءة Dec 12, 2024
अन्वय (१९७६) मधील अंकातील नरहर कुरुंदकर ह्यांचा लेख.
फॅसिझमला फक्त टाळ्या वाजवणारे हात हवे असतात. शंका घेणारी मूठभर डोकी केंव्हाही समाजात अल्पसंख्यच असतात. ह्या अल्पसंख्येने बहुसंख्येच्या प्रतिनिधी असणाऱ्या शासनाला त्रास द्यावा हे फॅसिस्टांना पटतच x.com
नाही. म्हणून वेळोवेळी सर्वांनी आपल्या नेत्यावर विश्वास व्यक्त करावा अशी फॅसिझममध्ये प्रथा आहे. आमचा एकमेव नेता, आमचा अलौकिक नेता- फक्त तोच एक राष्ट्र तारू शकतो, `आमचा नेता म्हणजेच राष्ट्र', `गेल्या हजार वर्षांतील आमचा सर्वश्रेष्ठ नेता' अशी सगळी वाक्ये ठरलेली असतात. जनतेच्या नावे
नाममात्र सुधारणांचे कार्यक्रम चालू असतात; आणि हे कार्यक्रम यशस्वी झाल्याच्या घोषणाही चालू असतात. जर्मनीसारख्या सहा-सात कोटी लोकसंख्येच्या देशात तीन-साडेतीन कोटी मतदान होते. हिटलरला मिळालेली सव्वाकोटी मते ही बहुसंख्या नव्हे, तरी ह्या सव्वाकोट श्रद्धावान अनुयायांच्या ताकदीवर
हिटलर उभा असतो. म्हणून फॅसिझमला दारिद्र्य आणि दास्यांचे जतन करण्यासाठी अशा श्रद्धावानांची गरज असते. कैद्यांनी बेड्यांच्या संरक्षणार्थ प्राणपणाने लढावे अशी प्रेरणा कैद्यांमध्ये निर्माण करण्यात फॅसिझमचे खरे यश असते. " - नरहर कुरुंदकर (`अन्वय' -१९७६)

جاري تحميل الاقتراحات...