।। अभिषेकी ।।
।। अभिषेकी ।।

@Late_Night1991

4 تغريدة Sep 15, 2024
#Tumbbad
भयपट आणि त्याच्याशी नारायण धारप यांचं नाव जोडलेलं असणं इतकंच कारण पुरेसं होतं तुंबाड बघण्यासाठी! पाचेक वर्षांपूर्वी चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी थिएटरमध्ये जाऊन पाहिला होता. नंतर OTT वगैरे वरही पाहिला. भारतीय सिनेमाच्या इतिहासात वेगळ्या धाटणीचा भयपट हे याचं
वैशिष्ट्य कायमच अधोरेखित होत राहील. पण याचं वलय केवळ भयपट म्हणून मर्यादित राहत नाही तर त्यापेक्षाही वेगळं आणि सकस या चित्रपटात आहे. लालच या एका शब्दाशी चित्रपटाची कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसंध राहते. एखादं पुस्तक वाचताना जो थरार असतो तो चित्रपट बघताना येतो.
मोठ्या पडद्यावर ते दृश्य, मुसळधार पावसाचा आवाज जबरदस्त अनुभव आहे. तो काळ उभं करणे, पार्श्वसंगीत, पुराणांतील संदर्भ ज्या सचोटीने मांडलेले आहेत ते लेखक-दिग्दर्शक यांची विषयाप्रती असलेली उत्सुकता व प्रामाणिकपणा दर्शवते. खऱ्या अर्थाने वेगळ्या वाटेवरील चित्रपट म्हणता येईल.
जागीतक पातळीवर जे भयपट-थरारपट येतात त्यातही याचा क्रम वरच लागतो.
दुसऱ्या भागाची उत्कंठा व प्रतीक्षा आहेच...
एकदा आवर्जून थिएटरमध्ये पहावा असंच म्हणावं लागेल!
~ अभिषेक बुचके
#चित्रपट_म्हणे #tumbbadmovie

جاري تحميل الاقتراحات...