आजची मुंबईच जणू. अतिश्रीमंत व्यापाऱ्यांची पंढरी. इथून सगळ्या जगात व्यापाऱ्याचे तांडे जात. सगळ्या जगातील व्यापारी जहाजं भरभरून येजा करत. तर अशा या सुरतेत एका हिंदू-जैन कुटुंबात सन १५९० साली वीरजी व्होराचा जन्म झाला. वडिलांच्या छोट्यामोठ्या व्यवसायाला यानं सर्व नैतिक-अनैतिक ++
मार्गानं उंच शिखरावर पोचवलं. सन १६१९ साली यानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दहा हजार महेमुदी (होन) कर्ज दिल्याची अधिकृत नोंद आहे. तिथून पुढं डच ईस्ट इंडिया कंपनी, पोर्तुगीज व्यापारी, मोगली सरदार अशा अनेकांना तो अव्वाच्या सव्वा दरानं कर्ज देई. वीरजी व्होराचा व्याजाचा दर अतिशय ++
जास्त असल्याची तक्रार अनेक व्यापाऱ्यांनी लेखी पत्रांतून केलेली आढळते. वीरजी व्होराचा व्यापार चढत्या क्रमाने वाढत गेला. सन १६६२ साली त्यानं ईस्ट इंडिया कंपनीला दिलेलं कर्ज होतं सुमारे दहा लाख अशरफी..! दर सुरतेच्या जवळचं एक महत्त्वाचं बंदर त्यानं मोगल बादशहा कडून मिळवलं. ++
इतकंच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशांशी त्याची व्यापारी जहाजं येजा करत. पश्चिमेला तांबडा समुद्र, ग्रीस सोबत बत्तीस देशातील व्यापारी त्याला वचकून असत. पूर्वेला आग्नेय आशियातील सर्वच बंदरावर त्याची हुकूमत चाले. हिंदुस्थानातील चांदी, सोनं, मसाल्याचे विविध पदार्थ, कापड, अफू ++
यांवर एकट्या वीरजीची मक्तेदारी होती. तो म्हणेल त्याच भावात खरेदी विक्री करावी लागे. देशातील काळी मिरीची सगळी खरेदी एकट्या वीरजीनं करुन जगातील सर्वांना वेठीस धरल्याची नोंद सन १६४० साली सापडते.
सन १६६४ साली त्याच्या देशातील सर्व महत्त्वाच्या शहरात पेढ्या होत्या. एकट्या ++
सन १६६४ साली त्याच्या देशातील सर्व महत्त्वाच्या शहरात पेढ्या होत्या. एकट्या ++
सुरतेच्या पेढीवर ऐंशी लाख मुहम्मदी अशरफी (तेव्हाचं गुजरात मधील एक सुवर्ण नाणं) होत्या. ही रक्कम स्वराज्याच्या एकूण उत्पन्नाच्या तीनपट जास्त आहे, हे लक्षात घ्या. कारण सन १६६६ सालात स्वराज्याचं उत्पन्न होतं केवळ २७ लक्ष होन.! यावरून वीरजीच्या एकूण साम्राज्याचा आवाका लक्षात यावा. ++
मोगलांच्या दरबारात वीरजीची एवढी वट होती की कोणाला बादशाह बनवायचं हे तो अगोदर ठरवून सगळ्या दरबारी लोकांना फितूर करायचा. औरंगजेब बादशहा बनण्यापूर्वी गुजरातचा सुभेदार होता. काही दिवस तो बुऱ्हाणपूरातही होता. औरंगजेबानं वीरजीला गळ घालून दिल्ली-आग्र्यातील अनेक सरदारांना आपल्याकडं ++
वळवलं होतं. त्याचं बक्षीस म्हणून वीरजीला हिंदुस्थानच्या व्यापारात मुक्त हस्ते मदत झाली. वीरजी व्होरा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला त्यामागं शाहजहानचा व नंतर औरंगजेबाचा वरदहस्त होता. शाहजहानला व नंतर औरंगजेबाला बादशहा बनवण्यात वीरजीची भूमिका लक्षात यावी एवढी मोठी होती. ++
सूरत शहराचं उत्पन्न शाहजहाननं आपल्या मुलीला लावून दिलं होतं. एकट्या सुरतेची जकात सन १६५६ सालात सुमारे तेरा लाख मुहमदी अशरफी होतं..! आणि वीरजी व्होरा हा सुरतमधील काही एकटा व्यापारी नव्हता. त्याच्या खालोखाल अनेक बडे व्यापारी तिथं बस्तान बसवून होते.म्हणून औरंगजेबाचं तोंड उघडायचं ++
असेल तर वीरजीचं नाक कापावं लागेल याची जाणीव शिवाजी महाराजांना झाली. म्हणून सुरतेवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी सगळीच माहिती गोळा केली.
पाच जानेवारीला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा सुरतेत निरोप पाठवला की माला कुणालाही त्रास द्यायची इच्छा नाही. पण इथल्या व्यापाऱ्यांनी व ++
पाच जानेवारीला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा सुरतेत निरोप पाठवला की माला कुणालाही त्रास द्यायची इच्छा नाही. पण इथल्या व्यापाऱ्यांनी व ++
सुभेदारांनी मिळून मला अमुक एक रक्कम खंडणी म्हणून द्यावी. सुरतेचा कोतवाल इनायतखान व वीरजी व्होराला महाराजांच्या शक्तीचा अंदाज आला नाही. त्यांनी महाराजांची मागणी उडवून लावली. बाकीच्या काही व्यापाऱ्यांनी खंडणी देण्याची तयारी केली, पण इनायतखान व वीरजी पुढं त्यांचं काही चाललं ++
नाही. वीरजी व्होरा म्हणाला,"नहीं देंगे. क्या उखाडना है उखाड लो.."
पाच तारखेपासून मराठ्यांचा कहर सुरू झाला. शहरात आगीमुळं दिवसा अंधार तर रात्री लक्ख उजेड असं भयंकर दृश्य दिसू लागलं. अनेकांनी जे सापडेल ते घेऊन पलायन केलं. इनायतखान लपून बसला. वीरजीनं सगळं धन आपल्या कोठीत ++
पाच तारखेपासून मराठ्यांचा कहर सुरू झाला. शहरात आगीमुळं दिवसा अंधार तर रात्री लक्ख उजेड असं भयंकर दृश्य दिसू लागलं. अनेकांनी जे सापडेल ते घेऊन पलायन केलं. इनायतखान लपून बसला. वीरजीनं सगळं धन आपल्या कोठीत ++
लपून ठेवलै. बाकी आपल्या सोबत जेवढं म्हणून धन घेता येईल तेवढं घेऊन वीरजी इनायतखानाच्या गढीत लपून बसला. आठ तारखेपर्यंत सुरतेची बदसूरत झाली. शहरावर गिधाडं घिरट्या घालू लागली. तिकडं तिकडं जाळपोळ आणि लुटालूट. यातही एक नियम होता. बायका पोरांना हात लावायचा नाही. कुणी लावलाच तर मुंडकं ++
उडवलं जाई. दानशूर व्यापाऱ्यांना अभयदान होतं. त्यांच्या केसालाही धक्का लावला नाही. भांडीकुंडी, वस्त्रं, वस्तू अशा सर्व गोष्टी तिथंच गरीबांना वाटल्या जात. तिकडं तोबा गर्दी झाली. गोरगरीब लोक शिवाजी महाराजांच्या नावानं चांगभलं करु लागली. केवळ सोनं,चांदी, हिरे,माणकं, मोती, पवळे, ++
रेशमी गठाण, एवढंच जमा केलं जाई. वीरजीच्या घरातून पन्नास लाख अशरफी मिळाल्या. सहा हजार किलो सोनं जप्त झालं. त्याचं घर मराठ्यांनी इतकं उकरुन ठेवलं होतं की तिथं एक गढी होती यावरही कुणाचा विश्वास बसला नसता. पाच दिवस हा धुडगूस शहरात सुरू होता. दहा तारखेला सकाळी मराठ्यांचं सैन्य जसं ++
आलं, तसंच वाऱ्यासारखं निघून गेलं. जाताना वीरजीच्या घरातून पकडून आणलेल्या नोकरांना मुक्त करुन महाराज एवढंच म्हणाले,"तेरे मालिक को बोल, उखाड दिया..!"
मधल्या चार दिवसांच्या काळात एक चांगली गोष्ट झाली. व्हॅलेंटाईन यानं महाराजांचं समोरासमोर एक स्केच काढलं होतं. ते पुढं साडेतिनशे ++
मधल्या चार दिवसांच्या काळात एक चांगली गोष्ट झाली. व्हॅलेंटाईन यानं महाराजांचं समोरासमोर एक स्केच काढलं होतं. ते पुढं साडेतिनशे ++
वर्षे युरोपियनांनी सांभाळून ठेवलं. सन १९१८/१९ मध्ये वामनराव बेंद्रे इंग्लंडला गेले तेव्हा त्यांना पॅरीसच्या त्या चित्राची माहिती मिळाली. आणि त्याचा ठसा बनवून त्यांनी ते चित्र भारतात पाठवलं... आणि छत्रपतींची राजस सुकुमार छबी सगळ्यांना माहीत झाली...
क्रमशः.
- संजय कामनगावकर
क्रमशः.
- संजय कामनगावकर
جاري تحميل الاقتراحات...