जर आपली सीट बिनतिकीट प्रवासी किंवा वेटिंग टिकटधारकाने घेतली असेल तर त्यांच्याशी वाद घालण्याची आवश्यकता नाही. भारतीय रेल्वेने या समस्येवर सोडवणुकीसाठी विशेष सुविधा दिली आहे, यात ३ पद्धती आहेत.
पहिली : १३९ वर कॉल करा आपला PNR सांगा आणि तक्रार नोंदवा पण कॉल वेटींग वर राहिला तर..?
पहिली : १३९ वर कॉल करा आपला PNR सांगा आणि तक्रार नोंदवा पण कॉल वेटींग वर राहिला तर..?
दुसरी पद्धत:
तक्रार नोंदवण्यासाठी, सर्वप्रथम railmadad.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन आपला मोबाइल क्रमांक नोंदवा, आणि प्राप्त झालेला ओटीपी कोड सबमिट करा. त्यानंतर आपला पीएनआर किंवा तिकीट क्रमांक टाका. तक्रारीचा प्रकार निवडा, जसे की सीटची समस्या, सुरक्षा, वैद्यकीय मदत इत्यादी.

महिला प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहे, ज्यामध्ये रेल्वेच्या महिला कर्मचारीच त्यांच्या मदतीसाठी येतात. तसेच दिव्यांगजन प्रवाशांसाठी सुद्धा खास सुविधा आहेत.
त्यामुळे तक्रार नोंदवा.
तिसरी पद्धत: मोबाईल काढा ट्विटर X चालू करा, फोटो असल्यास फोटो टाका आणि ट्विट करा.
त्यामुळे तक्रार नोंदवा.
तिसरी पद्धत: मोबाईल काढा ट्विटर X चालू करा, फोटो असल्यास फोटो टाका आणि ट्विट करा.
या ट्विट मध्ये RailwaySeva आणि RailMadad या अधिकृत हॅण्डलला टॅग करा आणि पोस्ट करा, तुमची तक्रार नोंदवली जाते आणि तुम्हाला कॉल करून माहिती घेतली जाते.
मदत वेळेत मिळते का?
मदत वेळेत मिळते का?
हो तुम्ही तक्रार नोंदविल्यानंतर अर्धा तास तरी सीट जवळच रहा सीट सोडू नका, टीसी आणि RPF १०-१५ मिनिटांत तिथे येतात आणि तुम्हाला मदत करतात, मी स्वतः देखील २-३ वेळा अश्या प्रकारे, मदत घेतली आहे त्यामुळे ही माहिती शेअर करा आणि सर्वांचा प्रवास सुखकर करा.
جاري تحميل الاقتراحات...