15 تغريدة 3 قراءة Aug 06, 2024
बटरफ्लाय इफेक्ट आणि कोसळलेला सेन्सेक्स
७०च्या दशकात लोरेंझ नावाचा एक भन्नाट गणितज्ञ, गणिताच्या आधारे हवामानाचा अंदाज बांधायचा प्रयत्न करत होता.
तेव्हा त्याच्या लक्षात आले की पृथ्वीचे हवामान इतक्या नाजूक संतुलनावर चालते की कोण्या एका दूर देशात - 🧵
१/n
#StockMarketअभ्यास #म
एका फुलपाखराने जरी अवेळी पंख फडफडवले तरी जगात दुसरीकडे वादळ येऊ शकते आणि ह्या एकमेकांवर खूप जास्त अवलंबून राहणाऱ्या गोष्टींच्या प्रभावाला त्याने नाव दिले - बटरफ्लाय इफेक्ट !
न् आज ~तेच झाले..म्हणजे बघा हां..👇
परवा जपानच्या रिझर्व्ह बँकेने त्यांचे व्याजदर ०.२५% ने वाढवले काय न्
आज जगभरचे मार्केट पडले काय ?!🤯
आता हे कसं झालं हे कळण्यासाठी तुम्हाला इतकं माहीत पाहिजे की -
कोणत्याही देशाच्या रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की
देशाबाहेरचा पैसा देशात न्
देशात खेळणारा पैसा एफडी इ वाटे बँकेत येतो !
थोड्क्यात व्याजदर वाढले की चलन थोडे मजबूत होते👇
३/n
आणि उलट केले की देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते पण चलन दुबळे होते.
आता ९० च्या दशकातल्या जपानच्या स्टॉक मार्केटचा बुडबुडा फुटल्यानंतर
(त्याचीच गोष्ट 🧵 मध्ये 👇)
४/n
x.com
जपानमध्ये प्रचंड मंदी आली आणि देशाला चालना देण्यासाठी म्हणून गेली ३० वर्ष जपानने त्यांचा व्याजदर
~ 0% ठेवला होता.
म्हणजे गेली ३० वर्ष जपानमध्ये कर्ज
~ 0% नी मिळत होती आणि बँकेत एफडी करायची म्हटली तर व्याज देणे सोडाच उलट पैसे कापले जात होते..🤯
इतकचं काय
खरं वाटणार नाही पण
५/n
एकवेळ अशीही होती जपानच्या बँका लोकांनी कर्ज घ्यावं म्हणून पैसे देत होत्या..😂🤯
थोड्क्यात negative व्याजदर..!🤑
( Btw भारतालाही बुलेट ट्रेनसाठी जपानने असेच कर्ज दिले आहे..😅 )
असो..
तर ह्या पडलेल्या व्याजदरांचा..फुकटच्या पैशांचा फायदा जगभरचे गुंतवणूकदार घेत होते.
म्हणजे
६/n
जपान मधून शून्य % व्याजदराने कर्ज घ्यायचे आणि त्याच पैशांची
उदा. भारतात ६% ने एफडी करायची.
आणि कर्जाची वेळ संपत आली की ती एफडी मोडायची..काही न करता झालेला ६% फायदा खिशात टाकायचा आणि जपानला त्यांचे पैसे परत करायचे..easy money..🤑
आणि ह्यालाच 👆 म्हणतात - Yen Carry Trade !
७/n
आता..हे सगळं इतकं सोपं असू शकत नाही..नाही का ?
खरं तर ते वाटतं तितकंच सोपं आहे.(किंबहुना होतं..गेली २०-३० वर्ष तरी)
फक्त एक गोष्ट झाली नाही पाहिजे ती म्हणजे Yen ची (जपानच्या चलनाची) किंमत वाढली नाही पाहिजे..!
उदा - समजा १० ₹ म्हणजे १०० येन असं गणित आहे.
आणि
८/n
एखाद्यानं १०० कोटी येन चं कर्ज घेतलं आणि भारतात रुपयात बदलून १० कोटींची ६% ने एफडी केली.
आता जर जपानच्या रिझर्व्ह बँकने व्याजदर वाढवले आणि त्यांचे चलन मजबूत बनल्याने १०₹ ला समजा फक्त ९० च येन मिळायला लागले तर..
येन वाढला ~१०% ने आणि व्याज मिळणार ६% च म्हणजे हे वरचे ४%
९/n
कर्ज घेणाऱ्याला जास्तीचे भरावे लागणार..😰(Margin call)
पण..आता तुम्हाला वाटेल..ह्याचा आणि स्टॉक मार्केटचा काय संबंध ?!
आणि संबंध असायला पण नको होता पण
हा संबंध असायचे कारण आहे - हाव..फुकटच्या पैशाची हाव..!
खरं होतं काय तर लोकांना एफडीचे फुकटचे ६% पण कमी वाटतात न्
१०/n
मग ते जगभरच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात..जिथे पैसे अजूनच जास्त वेगाने वाढू शकतात..आणि इथेच आज घात झाला असा अंदाज आहे..!
परवापर्यंत जपानची रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवणार ह्याचा अंदाज अनेकांना होता..म्हणून येन जुलै पासूनच मजबूत होत होता..अनेकांची तयारीही होती त्यासाठी
११/n
पण ती वाढ ०.०१% वरून ०.१०% इतकी म्हणजे १० पट अशी असेल असे वाटत होते..पण.. जपानने तो दर अचानकपणे आणि अनपेक्षितपणे ०.२५% वर नेला आणि लगेचच येन मजबूत व्हायला लागला.
ज्यांचे देणे जपानला होते..त्यांना तोटा स्वीकारून जपानला पैसे करावे लागतात का काय असे वाटू लागले न् म्हणून
१२/n
जगभरच्या गुंतवणूकदारांनी घाबरून जगभर शेअर विक्री करायला सुरुवात केली..आणि मग नेहमीचं एकाचं बघून दुसरा विक्री करत राहिला..आणि म्हणूनच जगभरच्या शेअर मार्केटमध्ये लाल रंग पसरलाय..!
आता..हे सगळं झालं मग आता आपण गुंतवणूकदार काय करू शकतो ? ?
३ पर्याय आहेत -
१३/n
१) बहुतेक सर्व नियमित SIP करणारे SIP चालू ठेऊ शकतात..उलट मार्केट सुरुवातीच्या काळात जितकं लाल असेल तितकाच फायदा आपल्याला नंतर होईल.
२) शक्य असेल तर ह्या 🧵 प्रमाणे खालच्या पातळीला मार्केट आलं तर थोडीशी जास्तीची SIP करू शकतो.
x.com
३) काहीही न करता मार्केट काय करते ह्यावर लक्ष ठेवू शकतो आणि मार्केट वर जायला लागेल तेव्हा आपले पैसे गुंतवू शकतो.
फक्त ह्यासाठी जास्तीचा वेळ आणि डोकं खर्च करावं लागेल इतकचं..😅✌️

جاري تحميل الاقتراحات...