Kalpesh | कल्पेश
Kalpesh | कल्पेश

@Atarangi_Kp

10 تغريدة 2 قراءة Jul 21, 2024
शेअर घेण्याआधी कंपनीची बॅलन्सशीट तपासा असा सल्ला बरेच जण देतात,पण बऱ्याच लोकांना हेच माहीत नसतं की बॅलन्सशीट हा नक्की काय प्रकार आहे?
माहीत आहे पण त्यात बघायचं काय?
हातात बॅलन्सशीट आहे पण वाचायची कशी?
आज याबद्दलच समजून घेऊया.
थ्रेड पूर्ण वाचा आणि शेअर करायला विसरू नका.
#मराठी
साधारणतः कंपनीचे तीन प्रकारचे आर्थिक स्टेटमेंट असतात.
पहिली बॅलन्स शीट, दुसरी नफा आणि तोटा स्टेटमेंट आणि तिसरी कॅश फ्लो स्टेटमेंट.
हे तिन्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणतंही वगळू शकत नाही. तर आज सुरुवातीला आपण बॅलन्स शीट बद्दल बोलणार आहोत.
#FinancialStatements
बॅलन्स शीट ही एका आर्थिक वर्ष म्हणजेच १ एप्रिलपासून सुरू होऊन ३१ मार्च या कालावधीतील कंपनीची आर्थिक स्थिती दाखवते. जर मी आर्थिक वर्ष २०२४-२५ बद्दल बोललो, तर आर्थिक वर्ष २०२४-२५ कधी सुरू होईल?
१ एप्रिल २०२४ पासून सुरू होईल आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत चालेल.
#Finance #India
पूर्वी तुम्हाला ३१ मार्चला बॅलन्स शीट वर्षातून एकदाच पाहायला मिळायची. आता अलीकडे तुम्हाला बॅलन्स शीट वर्षातून दोनदा पाहायला मिळते. ३० सप्टेंबर आणि ३१ मार्च म्हणजे H1. जेव्हा सप्टेंबरमध्ये अर्धा वर्ष पूर्ण होतं तेव्हा तुम्हाला ३० सप्टेंबरची बॅलन्स शीट मिळते
#FinancialReporting
बॅलन्स शीट मुख्यतः तीन गोष्टी दाखवते: मालमत्ता, देणी आणि इक्विटी.
मालमत्ता म्हणजे कंपनीकडे असलेल्या सर्व गोष्टी जसे की रोख, मालमत्ता, उपकरणे इत्यादी. देणी (Liability) म्हणजे कंपनीचे कर्ज आणि इतर देणी. इक्विटी म्हणजे मालकांची हिस्सेदारी.
#Assets
उदा. जर टायटनची बॅलन्स शीट पाहिली तर त्यात त्यांच्या सर्व मालमत्तांचा समावेश आहे. जसे की दुकानातील सोनं, इमारती, उपकरणं इत्यादी. तसेच,देणी मध्ये कर्ज, पुरवठादारांना देणाऱ्या रक्कम. त्याचबरोबर, त्यांच्या इक्विटीमध्ये शेअरहोल्डर्सची हिस्सेदारी आणि रिटेन्ड अर्निंग्ज समाविष्ट असतात
बॅलन्स शीट वाचून, तुम्हाला कंपनीच्या आर्थिक स्थितीची कल्पना येते. कंपनी किती सुरक्षित आहे, तिचं कर्ज किती आहे, तिच्या मालमत्तेची किंमत किती आहे, इत्यादी गोष्टी तुम्ही बघू शकता. म्हणजेच असेट मध्ये तुम्हाला त्यांची पूर्ण मालमत्ता दिसेल तर liability मध्ये देणी
#InvestmentResearch
बॅलन्स शीट वाचताना काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्या.
जसे की कर्जाचे प्रमाण (Liability- Loan & Advances) , मालमत्तेची किंमत (Asset Valuation), रिटेन्ड अर्निंग्ज, इत्यादी. हे तुम्हाला कंपनीच्या आर्थिक आरोग्याची कल्पना देतात.
#StockMarket
जर कर्जाचे प्रमाण खूप जास्त असेल तर ती कंपनी असुरक्षित असू शकते. जर मालमत्तेची किंमत खूप जास्त असेल तर ती कंपनी सुरक्षित असू शकते. हे सर्व तपासून तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकता, सोबतच कंपनीचे मॅनेजमेंट जी आश्वासने देत आहेत ते पूर्ण करू शकतात का हे देखील दिसेल.
#DebtAnalysis
मित्रांनो ही बॅलन्स शीटची ओळख होती, त्यामध्ये असलेली तांत्रिक माहिती आणि ती काय दर्शवते हे सविस्तर समजून घ्यायला तुम्हाला आवडेल का? हो तर कमेंट मध्ये 'Yes' नक्कीच लिहा म्हणजे मला त्यावर सविस्तर लिहिता येईल आणि तुम्हाला हवी असलेली माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवता येईल.
धन्यवाद.

جاري تحميل الاقتراحات...