25 تغريدة 1 قراءة Apr 16, 2024
काल चीन मधील एका सिमेंट कंपनीचा शेअर शेवटच्या १५ मिनिटात ९९% नी पडला..🤯🟥🤯
ती कंपनी जर भारतात असती तर ती देशातील ३री सर्वात मोठी कंपनी ठरली असती..!
मग..असं काय झालं की हा शेअर अचानक इतका पडला / पाडला गेला..?!
जाणून घेऊ आजच्या ह्या थ्रेडमधून👇
#StockMarketअभ्यास
#मराठीच #म
उत्तर एका ओळीत सांगायचं तर - चीनमधील अनेक मोठे बिल्डर कर्जबाजारी झाल्याने तेथील सिमेंटची मागणी कमी झाली..म्हणून हा शेअर पडला असे म्हणता येईल !
पण..हे बिल्डर कर्जबाजारी झालेच कसे ?
ह्या प्रश्नाचं मूळ मात्र चीनच्या इतिहासात..मुळात चीन कम्युनिस्ट कसा झाला त्या गोष्टीत आहे..👇
२/n
पहिली गोष्ट जी अनेकांना माहीत नसेल ती म्हणजे..
भारतात जशी ब्रिटिशांनी वसाहत स्थापन केली तशी वसाहत चीनमध्ये कधीच..कोणाचीही नव्हती..!
काही भाग इतरांकडे होते..
जसे - हाँगकाँग >ब्रिटिश,
कंबोडिया > फ्रेंच इ
पण संपूर्ण चीनवर कधीही परकियांनी सत्ता केली नाही..🤯
न् ह्याची कारणे ३
+
१) चीन खूप मोठा (भारताच्या ~ ३पट) आणि भौगोलिक दृष्ट्या पोहोचायला अवघड भूभाग आहे.
युरोपातून जहाजाने पूर्वेला आलं तर आफ्रिका, आशिया खंड पार करून यावे लागते आणि
जमिनीवरून यायचं झालं तर हिमालय , गोबी वाळवंट ह्या अवघड गोष्टी पार करण्याशिवाय पर्याय नाही..😵
(प्रसिद्ध सिल्क रोड 👇)
२) असा मोठ्ठा प्रवास करून कोणी पोचलेच तर..त्यांना भेटतात असे लोक जे
शेकडो वर्षापासून स्वतःला चीन ह्या एकसंघ महकाय देशाचे / राज्याचे नागरिक मानतात..!
वरून काय तर हे लोक जाती धर्मांत विभागलेले नाहीत..🤯
थोडक्यात काय तर तिथे - फोडा आणि राज्य करा वापरता येत नाही..!
+
३) आणि ह्या सर्व लोकांवर राज्य करते ते काही शे वर्षांपासून राज्य करीत असलेले Qing राज्य..!
थोडक्यात काय तर - चीन खूप लांब होता..म्हणून मोठे सैन्य घेऊन जाणे अवघड..त्यात जुन्या स्थानिक सत्तेचा एकछत्री अमल असल्याने जिंकणे अवघड..न् जिंकले तर जनतेने त्यांना मान्य करणे अवघड..!
म्हणून
परकियांनी राजसत्तेतील अधिकाऱ्यांना.. अगदी राजालाही..पैसा,भेटवस्तू इ इ ची भुल घालून भ्रष्ट केले..
आणि त्यांना पाहिजे तश्या व्यापारातील करार पदरात पाडून घेतले..!
अशाने..राजा.. राजाचे भ्रष्ट लोक श्रीमंत झाले..पण..चीन आणि त्याचे नागरिक गरीबच होत गेले..!
अखेरीस..
+
१९१२ ला ४+ हजार वर्षाहून जास्त काळ चालत असलेल्या राजसत्ताक पद्धतीचा पाडाव झाला..!
पण तेव्हा..चीनमधील जनतेला पुढे काय ह्याची काहीही कल्पना नव्हती..म्हणून राजसत्ता उलटल्यानंतरही जनतेची परिस्थिती काही बदलली नाही..आणि राजकीय गोंधळ..गृहकलह वाढतच गेला..आणि अशातच..
१९१७ मध्ये..
+
रशियन राज्यक्रांती झाली.
रशिया, चीन हे तसे शेजारी..दोन्ही देशातील बहुतांश जनता राजाच्या
त्रासामुळे गरीब झालेली..त्रासलेली
त्यामुळेच की काय पण..मार्क्सवादी विचार चीनमध्ये पसरले..आणि आजच्या चीनवर राज्य करणाऱ्या ' चिनी कम्युनिस्ट पार्टी CCP ' चा १९२१ मध्ये उदय झाला..आणि..
+
पुढच्या ३०च वर्षात..
ही पार्टी
देशांतर्गत इतर राजकीय विरोधक..
देशाची विभागलेली आर्मी..
जपानचे दुसऱ्या महायुद्धातील चीनवरचे आक्रमण आणि अतिक्रमण
अशा एक न् अनेक संकटांचा सामना करून शेवटी १ ऑक्टोबर १९४९ ला
चीनमध्ये कामगार ,शेतकरी अश्या कष्टकऱ्यांची साम्यवादी सत्ता स्थापन करतेच..!
आणि त्यांचा नेता असतो..माओ झेडाँग.. जो ह्या विजयानंतर इतका प्रसिद्ध होतो की, साम्यवादी (Communist)आणि माओवादी (Maoist) हे दोन्ही जणू समानार्थी शब्द बनून जातात..!
हा माओ सत्ता येताच..देशातील सर्व जमिनी व उद्योग हे सरकारी मालकीचे करतो म्हणजे सर्व प्रकारची खाजगी मालकी रद्द करतो..🤯
आणि म्हणून १९४९ नंतर चीन मध्ये सरकारी जमिनीवर..सरकारी इमारतीत..समान पद्धतीच्या घरांचे वाटप सुरू होते..!
पण..हे असे झाले तरी..देश तर गरीबच होता..त्यात संपत्तीचे समान वाटप करूनही गरिबी काही संपत नाहीच..उलट..सगळ्यांना फुकट घरे,काम देण्याच्या नादात चीन गरीबच होत जातो..आणि..अशा वेळी
हटवादी साम्यवादी धोरणे लागू करणारा माओ चीनला अजूनच गरीब करून १९७६ साली मरण पावतो..!
आणि मग उदय होतो..' डेंग ' चा..हा साम्यवादी असला तरी..ह्याला देश मुळातच गरीब असल्याने परकीय गुंतवणूक/पैसा देशात आणल्याला पर्याय नाही हे कळून चुकलेले होते..आणि मग ह्यातूनच उदय होतो तो - SEZ चा-
+
डेंग चीनसारख्या साम्यवादी देशात असे भाग तयार करतो -
जिथे उभारल्या गेलेल्या उद्योगांना अनेक वर्ष कमी कर / कर द्यावा लागणार नाही..जे भाग अगदी भांडवलवादी देशासारखे चालतील पण
तेथील कामगार मात्र साम्यवादी देशातला..गरीब ,कमी पैशात जास्त काम करणारा मेहनती कामगार असेल...!
थोडक्यात -
+
हे भाग उद्योगांसाठी..नफा कमावण्यासाठी नंदनवन असतील..🤑
SEZ ची कल्पनाच ८०च्या दशकात नवीन असल्याने अनेक श्रीमंत पाश्चात्त्य देशांनी चीनमध्ये गुंतवणूक करून उद्योग उभारले..त्यामुळे लाखोंना रोजगार मिळाला..आणि हे सर्व लोक ह्या SEZ जवळ स्थलांतरित होऊ लागले.. अन् ह्या सर्व लोकांच्या
+
घरांचा प्रश्न सोडवणे एकट्या सरकारला शक्य होणार नाही हे कळल्याने शेवटी ९० च्यात दशकात चीनने खाजगी घरांना मान्यता दिली..!
पण..शेवटी घरेच ती..त्यांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने घरांच्या किमती प्रचंड वाढल्या..पुढील काही वर्षांत चीनचा GDP जो धावला..त्यात ह्या रिअल इस्टेट
+
क्षेत्राचे मोठे योगदान होते..ही इतका प्रचंड वाढीचा दर पाहून ह्या क्षेत्रातही प्रचंड प्रमाणात परकीय गुंतवणूक कर्जाच्या स्वरूपात आली..!
आणि असे जेव्हा होते..तेव्हा सामान्य नागरिकही ह्यापासून फायदा घ्यायला मागे पडत नाही.. बिल्डिंग तयार व्हायला लागली की फ्लॅट बुक करायचा आणि बनली की
की वाढीव किमतीला विकायचा हे चक्र चालू करतो..त्याने गरजेपेक्षा जास्त मागणी तयार होते..आणि किमती अजूनच वाढत जातात..!
आणि ह्या सर्वात चीनचे सरकारही मागे नव्हते..चीन साम्यवादी असल्याने चीनने घरे तर खाजगी मालकीची केली..पण जमिनी अजूनही सरकारी मालकीच्याच होत्या.. इतकंच काय तर त्यावर
+
उभारलेल्या बिल्डिंग आणि घरांची मालकी फक्त ७० वर्षासाठीच होती..आणि त्यानंतर पुन्हा घरे घ्यावी लागत होती..!
थोडक्यात काय तर..ही घरांची मागणी..त्यामुळे होणारा खर्च..त्यातून येणारा कर..हे सतत नेहमीसाठी चालू राहील ह्याची पूर्ण काळजी चिनी सरकारनं घेतली होती..!
पण..शेवटी मागणीच ती-
+
कधीतरी कमी होणारच होती..आणि ती तशी झालीच..!
चीनचा एकच मूल हा नियम म्हणा..किंवा लोकसंख्येचे वाढते वयोमान म्हणा ह्यामुळे हळू हळू ती मागणी कमी व्हायला सुरुवात झाली..आणि मागणीचा आणि त्यासाठी घेतलेल्या परकीय कर्जांचा कृत्रिम फुगवटा चीनला घेऊन बुडणार असे संकेत..
+
बिजींगला..म्हणजेच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भेटू लागले..आणि म्हणून २०१७ च्या भाषणात पहिल्यांदा ते ' घरे ही राहण्यासाठी असावीत..त्यांचा सट्टा बाजार बनवू नये ' असे बोलले.
आणि तेव्हापासून त्यांनी चीनच्या बिल्डर कंपन्यांना अजून जास्त कर्ज घ्यायला बंदी घातली.
पण..२०२० येता येता..
+
घरांची मागणी बऱ्यापैकी कमी झाली होती..आणि कोरोनाने ही कमी झालेली मागणी कधी वाढणारच नाही ह्यावर जणू शिक्कमोर्तबच केले..!
आणि चीनची सर्वात मोठ्या कंपन्या पैकी एक ' Evergrande ' बुडीत निघाली..👇
जर इतकी मोठी कंपनी..ती पण रिअल इस्टेट म्हणजे चीनच्या सर्वात पैसेवाल्या क्षेत्रातील
+
बुडू शकते तर..चीनचे चांगले दिवस भरले असे अनेक गुंतवणूकदारांना वाटायला लागले..म्हणून गेल्या ५ वर्षात चीनचे शेअर मार्केट पडतच चालले आहे..!
आज..चीनचे घरांचे हे रिअल इस्टेट मार्केट..जे त्यांच्या GDP चा ~३०% भाग आहे ते कोसळले आहे..घरांच्या किमती ह्या गेल्या १० वर्षातल्या
+
सर्वात कमी आहेत.
आणि हे सर्व होत असताना तीच घरे बांधण्यासाठी लागणाऱ्या सिमेंट इ च्या कंपनी कशा वर जातील..?!
म्हणूनच चीनची सिमेंट कंपनी जिने स्वतःचेच शेअर तारण ठेऊन कर्ज घेतले होते,
तिच्या शेअरची किंमत एका ठराविक किमतीखाली आल्याने कर्ज दिलेल्या बँकेच्या कॉम्प्युटरने
+
सगळे पैसे मिळत नाही तोपर्यंत सतत शेअर विकल्याने ~ ४००₹ वर असलेली शेअरची किंमत १५ मिनिटात ४ रुपयांवर आणली..🤯🤑🤯 (Margin Call !)
तर ही होती..चीनची गोष्ट..!
अशीच मागे जपानची गोष्टही लिहिली होती..ती वाचायची असल्यास लिंक 👇
२५/२५
🙏

جاري تحميل الاقتراحات...