мιℓιи∂....❤️
мιℓιи∂....❤️

@Milind0915

5 تغريدة 1 قراءة Mar 24, 2024
मी इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये छान छान गोष्टीद्वारे रामायण,महाभारत मधल्या गोष्टी शिकलो
इयत्ता तिसरी मध्ये फुले, अंबेडकर,शाहू,गांधी, मौलाना आझाद,नेहरू सह जमशेदजी टाटा, स्वामी विवेकानंद,सुभाषचंद्र बोस,महर्षी कर्वे,दयानंद सरस्वती,२०१४ पूर्वी चे वीर सावरकर आणि अनेक थोरांची ओळख झाली
इयत्ता चौथीमध्ये संपूर्ण इतिहास शिकलो, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा.
पाचवी मध्ये सिंधू संस्कृती, हडप्पा बद्दल शिकलो . त्याचबरोबर मौर्य साम्राज्य, ग्रीक आक्रमण ह्या बद्दल शिकलो. शक, कुशाण हेसुद्धा .
सहावीमध्ये जैन , बौद्ध, वैदिक इतिहास
वेद , उपनिषद्, त्रीपिटक. पाली अर्धमागधी
शौरसेनी भाषांतील साहित्य ह्यांची तोंड ओळख झाली. चोल, चेरा, पांड्या, सातवाहन, गुप्त, हर्श्र्वर्धन शिकलो.
सातवीमध्ये मध्ययुगीन इतिहास सुरू झाला.त्यात उत्तर भारतातील राजपूत राज्ये, अफगाणिस्तानातून आक्रमणे, दक्षिणेतील यादव राज्ये , विजयनगर साम्राज्य, आसाम मधील आहोम
साम्राज्य ह्या बद्दल शिकलो.
आठवीमध्ये मुघल साम्राज्याचा इतिहास सुरू झाला, आणि त्याचबरोबर युरोपातील प्रबोधन चळवळसुद्धा.
नववीमध्ये मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश, फ्रेंच डच वसाहतींचा इतिहास शिकलो. अमेरिकन, फ्रेंच, आणि रशियन राज्यक्रांती बद्दल शिकलो.
दहावीमध्ये युरोपातील
साम्राज्यवाद,पहिले आणि दुसरे महायुध्द,भारतीय स्वातंत्र्यलढा, भारतातील प्रबोधन आणि सामाजिक क्रांतीचा इतिहास शिकलो
तर जो कोणी तुम्हाला "आम्हाला शाळेत फक्त मोगलांचा इतिहास शिकवला"असं रडगाणे गात छाती फोडून गळा काढत असेल, तर समजून घ्या तो भिकारी दलिंदर आयुष्यात कधी शाळेत गेलाच नाही.

جاري تحميل الاقتراحات...