जगाच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात श्रीमंत माणूस , विश्वगुरू भारत , डॉलरचा देश अमेरिका आणि मी ; एक सामान्य नागरिक !
#StockMarketअभ्यास #मराठीच #म
आज जगात सर्वात जास्त गरिबी असलेल्या आफ्रिका खंडात आजपर्यंतचा सर्वात श्रीमंत माणूस होऊन जावा ह्यासारखा विरोधाभास दुसरा नसावा..!
आणि ह्या विरोधाभासाचे नाव होते - मानसा मुसा !
जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांची यादी
'fortune' हे नियतकालिक दरवर्षी प्रसिद्ध करीत असते..अश्या ह्या नियतकालिकाने ह्या चौदाव्या शतकात होऊन गेलेला पश्चिम आफ्रिकेतील ' माली ' ह्या देशाचा राजा आजच्या पैशांत किती श्रीमंत होता ह्याचे वर्णन ' Unquantifiable ' म्हणजेच संपत्ती मोजताच येणार नाही इतका तो श्रीमंत होता असे वर्णन केले होते..😜🤯🤑 असो..
आजचा हा थ्रेड म्हणजे त्याच मुसाच्या एका गोष्टीवर..👇
१/n

हा मुसा ' माली ' साम्राज्याचा राजा होता. हे साम्राज्य सोन्याच्या खाणी, गुलाम आणि हस्तिदंत इ चा व्यापाराने भरपूर श्रीमंत झालं होतं. चौदाव्या शतकात म्हणजे जेव्हा भारतात सोन्याचा धूर निघत होता तेव्हा जगातील ~ अर्धे सोन्याचे उत्पादन हे माली साम्राज्य करत होतं..!
पण ह्या साम्राज्याची..त्यांच्या ह्या अपार श्रीमंत राजाची..फार कोणाला माहिती नव्हती आणि ह्याचीच मुसाला खंत होती.म्हणून आपले नाव जगभर व्हावे म्हणून त्याने ' हज ' यात्रा करत करत विपुल प्रमाणात दानधर्म (सोन्याच्या रूपात ) करायचे ठरवले.
आणि त्याने केलेही तसेच..६० हजार गुलाम.. तेवढेच उंट ( हे फक्त सोने वहायला ) ,१२ हजार सैन्य आणि बाकी दरबारी इतका मोठा लवाजमा घेऊन तो प्रवासाला निघाला..वाटेत त्याने अनेक ठिकाणी गोर गरीबांना सोने फुकट वाटले.त्याने त्याची किर्ती वाढली.पण ही प्रसिध्दी तो जेव्हा इजिप्तला पोचला त्यामानाने काहीच नव्हती..👇
२/n

त्याकाळी इजिप्त हे मोठे व्यापाराचे, दळणवळणाचे केंद्र होते..पूर्वेकडून आशिया खंडातून येणारे व्यापारी , उत्तरेच्या युरोप खंडातून येणारे व्यापारी आणि सबंध आफ्रिका खंडातून हज ला जाणारे यात्रेकरू या सर्वांनी इजिप्त त्यातही राजधानी कैरो नेहमी गजबजलेला असायचे.
आणि अशा ह्या १३२४च्या कैरोमध्ये मुसा ने चांगला महिनाभर मुक्काम केला..आणि ह्या मुक्कामात त्याने इतके सोने वाटले इतके सोने वाटले/खर्च केले की..; मुसा.. माली साम्राज्य , त्या साम्राज्याची राजधानी- सोन्याची नगरी ' टिंबक्टू ' ह्यांची किर्ती जगभर पसरली..!
हे इतके सोने इजिप्तमध्ये आल्याने तिथले सर्वच लोक श्रीमंत झाले..सगळीकडे आनंदीआनंद झाला..पण तो आनंद फार काळ टिकला नाही..मुसा पुढील वर्षी हज वरून परत जात होता तेव्हा त्याला तिथली व्यवस्था कोलमडलेली दिसली..व्यापार बंद होताना दिसले. त्याचे कारण तेव्हा त्याला कळले का नाही माहीत नाही पण त्याचे कारण मुसा ने वाटलेले सोने..त्यामुळे अचानक आलेली श्रीमंती होती हे आज कळून चुकले आहे.
पण हे असे कसे होऊ शकते ? 👇
३/n

पण हे असे कसे होऊ शकते ?
मुसाने कैरोत येऊन सोने वाटायला.. त्याच्यासोबतच्या लाखभर लोकांसाठी अन्न पाणी इ साठी सोने खर्च करायला सुरूवात केली तेव्हा झालं असं की..
ज्या लोकांकडे ते सोनं गेलं..त्यांनी ते अर्थातच विकायला काढलं आणि मिळणाऱ्या पैशातून खर्च करायला सुरुवात केली..आणि हा अचानक मिळालेला पैसा जसा जसा खर्च होऊ लागला तसा तसा तो पैसा अर्थव्यवस्थेत म्हणजे लोकांत पसरू लागला..थोडक्यात मूसाच्या सोन्यामुळे फक्त राजधानी कैरोतच नाही तर पूर्ण इजिप्तमध्ये श्रीमंती आली..!
जे लोक आधी घासाघीस करून..स्वस्तातले सामान घेऊ पाहत होते ते लोक आता सांगेल त्या किमतीला आणि मोठ्या प्रमाणत सामान चीज वस्तू घेऊ लागले..अशाने एकंदरच रोजच्या सामानाच्या वस्तूपासून ते जमिनी , हत्ती घोडे उंट..त्याकाळी जे काही असेल त्या सगळ्यांची किंमत वाढली..आणि ह्या अशा किंमत वाढण्याला आज पण Inflation/ महागाई म्हणतो..!
ह्या तशा सोप्या वाटणाऱ्या महागाईला इतके कंगोरे आहेत की विचारू नका..👇
४/n

आपण कधी मुंबईला गेलो की तिथे सर्व महाग वाटते..कारण महागाई..मुंबईत अनेक भारतीय कंपन्यांची मुख्यालये आहेत..तिथे भारतातून लोक येतात..ते भारतातून पैसा कमावतात..आणि खर्चही करतात..थोड्क्यात काय कुठेही त्या जागी आधी उपलब्ध नसणारा पैसा आला की महागाई वाढते..!
आजकाल सरकार हायवे वर हायवे बनवत आहे..त्यासाठी लागणाऱ्या जमिनी लोकांनी विकाव्या म्हणून चांगलाच भाव देखील मोजत आहे..पण त्याने होतं काय..ह्या जमिनी विकल्याने गावात अचानक नवा पैसा येतो..आणि तो त्या लोकांनी खर्च केल्याने गावात पैसा खेळू लागतो..त्यातले काही त्या पैशाने पुन्हा जमिनी घेऊ बघतात..म्हणजे विकत घेणारे लोक वाढले..पण जमिनी तर तेवढ्याच असणार म्हणून मग जमिनींचे भाव वाढतात..त्या किमती पाहून अजून काही जण जमिनी विकतात आणि हे चक्र चालूच राहतं..!
गावात सुरू झालेल्या नवीन आयटी पार्कमधले डॉलरमध्ये पैसा कमावणारे कामगार किंवा नवीन आलिशान सोसायटीतले लोक पण एक प्रकारे
' मुसा ' च आहेत.
आणि ह्याने लोकांकडे पैसा येतच जाणार..लोक वरचेवर जास्त खर्च करत जाणार..ह्याने GDP ८.४% काय तर १३.४% ही जाणार..पण..सोबत हे विसरले नाही पाहिजे की ह्याने महागाईही वाढतच जाणार..!
आता..प्रश्न असा पडू शकतो की..लोकांचा जास्त खर्च म्हणजे जास्त GDP आणि जास्त GDP म्हणजे प्रगती..मग प्रगती होत असताना मुसा ने सोने वाटल्याने इजिप्तची अर्थव्यवस्था कोलमडलीच कशी ? 👇
५/n

आता..प्रश्न असा पडू शकतो की..लोकांचा जास्त खर्च म्हणजे जास्त GDP आणि जास्त GDP म्हणजे प्रगती..मग मुसा ने सोने वाटल्याने अर्थव्यवस्था कोलमडली कशी ?
वर सांगितलेलं सोनं..श्रीमंती..खर्च..महागाई हे चक्र जोपर्यंत मुसा जोपर्यंत इजिप्त मध्ये होता तोपर्यंतच चालू राहू शकतं..जेव्हा मुसा तिथून पुढच्या प्रवासाला लागला..तेव्हा तिथे नवं सोनं यायचं बंद झालं..आणि मागणी अचानक कमी झाली..आणि मागणी कमी झाली की अर्थव्यवस्थेतील भाव जसे अचानक कोसळले..तशी अचानक गरिबी / मंदी आली..!
आज आपण परकीय गुंतवणूक आली की जल्लोष करतो..पण त्या गुंतवणुकीच्या पैशांतून जर आपण आज उद्या ती यायची बंद झाली तरी पैसा कमवायची उपाययोजना करून ठेवली नाही तर आपली गतही १३२४ च्या इजिप्तसारखी होऊ शकते..!
थोडक्यात काय तर जी अर्थव्यवस्था परकीय पैशांवर अवलंबून असते ती तो पैसा बंद झाला की कोसळते
आणि
कोणत्याही जागी अचानक नवीन पैसा ओतणारा..अगदी सरकार पासून ते परकीय गुंतवणूकदारांपर्यंत ' मानसा मुसा ' च असतो..!
पण..पण..पण.. 👇
६/n

पण..पण..पण..
सध्या तरी आपण मंदीच्या युगात नाही तर महागाईच्या युगात आहोत..
आणि आज वाढलेली महागाई ही मुख्यतः आजपर्यंतच्या इतिहासातील जगातील सर्वात श्रीमंत देश (आधुनिक ' मानसा मुसा ') - अमेरिका आणि त्याने कोरोना काळात वाटलेले सोने/पैशामुळे आहे..!
त्यावर कोरोना काळात लिहिलेल्या थ्रेडची ही लिंक..👇
आणि ह्या आजच्या वाढत्या महागाईवर मी - एक सामान्य माणूस कशी मात करू शकतो ते पुढच्या थ्रेड मध्ये..😅🖖

جاري تحميل الاقتراحات...