अमेय-🚩🐱खादाड बोका 🐱
अमेय-🚩🐱खादाड बोका 🐱

@Amey_1986

5 تغريدة 7 قراءة Jan 12, 2024
😂🤣
जवळपास २५ वर्षांपूर्वी अनिल कपूर, श्रीदेवी,ऊर्मिला मातोंडकरचा एक चित्रपट आला होता जुदाई..
त्यात उर्मिलाचे प्रेम आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या अनिल कपूर वर जडते..
विवाहित असलेल्या अनिल कपूरला मिळवण्यासाठी ती पराकोटीचे प्रयत्न करते..
त्यात यश येत नसल्याचे पाहून ती अनिलच्या पत्नी समोर १ कोटीचा प्रस्ताव ठेवते..
हा प्रस्ताव श्रीदेवी आनंदाने स्वीकार करते,आणि १ कोटीच्या बदल्यात..
आपला पती अनिल उर्मिलाच्या स्वाधीन करते,थोडक्यात विकते.
अशीच एक (सुखद) घटना भोपाळच्या वर्तमान पत्रात छापून आली आहे..😝
एका ५२ वर्षीय महिलेचा आपल्याच ४२ वर्षीय सहकर्मी वर जीव जडला..
दोन मुलांचा बाप असलेल्या या विवाहित पुरुषाला मिळवण्यासाठी..
तीने चक्क एक ६० लाखाचं दोन मजली घर,२७ लाखाची एफडी, एक प्लॉट,अशी आपली आयुष्यभराची कमाई..
जवळपास १ कोटी १० लाख रुपये एवढी संपत्ती..
त्या पुरूषाच्या बदल्यात देण्याचा प्रस्ताव, संबंधित पुरूषाच्या पत्नी समोर ठेवला..
आणि आश्चर्य म्हणजे हा प्रस्ताव त्या पुरुषाच्या पत्नीने मोठ्या आनंदाने स्वीकारला आहे..
.
१९९७ मध्ये त्या चित्रपटात अनिल कपूर १ कोटीला विकला गेला..
आणि वास्तवात भोपाळचा हा पुरूष १ कोटी १० लाखात विकला गेला आहे..
या घटनेवरून प्रमाणित होते की, महागाईच्या या काळात देखील..
.
*मागील २५ वर्षांत विवाहित पुरुषांच्या किमतीत फारसी वाढ झालेली नाही*
😔😔😔

جاري تحميل الاقتراحات...