Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳

@RohanMagdum7

21 تغريدة 1 قراءة Jan 06, 2024
नमस्कार मित्रांनो...!
1) आज आपण फ्रीलान्सिंग म्हणजे काय?
2) त्याचप्रमाणे फ्रीलन्सिंग करण्याकडे आजची तरुणाई का ओढ घेत आहे ?
3) आणि काही महत्त्वपूर्ण वेबसाइट्स , जिथे आपण फ्रीलान्सिंगची कामे करून खूप चांगला इन्कम मिळवू शकता याबद्दलची माहिती आपण थ्रेड स्वरूपात पाहू. (Part 1)
Thread 🧵#weareforyou365
आज सर्व जग डीजिटल होत चाललं आहे, त्यामुळे तरुण पिढी देखील डिजिटल स्वरूपात काम करण्यास उत्सुक आहे.
स्वतःकडे असलेल्या स्किलनुसार, हव्या त्या लोकेशननुसार काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे भरपूर तरुणांचा फ्रीलान्सिंग करण्याकडे ओढ वाढत आहे.
मित्रांनो आज आपण पाहतोय, खूप साऱ्या कंपन्यांमध्ये मंदीच्या इफेक्टमुळे त्याचप्रमाणें कॉस्ट कटिंग च्या नावाखाली खूप सार्‍या नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागत आहे.
आजच्या काळात प्रत्येकाला मनासारखी हवी ती नोकरी मिळणे हे कठीण काम बनले आहे.
त्यामुळे आपण फ्रीलान्सिंगचा योग्यरित्या वापर करून,आपण पारंगत असलेल्या स्किलनुसार काम करून खूप चांगला इन्कम मिळवू शकता.
फ्रीलान्सिंग म्हणजे एक प्रकारची स्वयंसेवा म्हणजे यामध्ये आपला कोणीही बॉस नसतो आपणच आपल्या कामाचे बॉस.
तर मित्रांनो हा एक असा प्लॅटफॉर्म आहे,ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्किलनुसार आणि आवडीनुसार काम करण्याची खूप चांगली संधी मिळते.
आणि त्या केलेल्या कामाच्या मोबदल्यात चांगले असे भरघोस असा मोबदलाही मिळतो.
फ्रीलान्सिंग मध्ये कोणतीही व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार केव्हाही काम करू शकते फक्त दिलेल्या डेडलाईन ची काळजी घेणे आवश्यक असते.
तसेच यामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मोठ्या ऑफिसची गरज नाही. तुम्ही जे काम करत आहात ते अचूक असणे महत्त्वाचे आहे.
यासाठी तुमची डिग्री किंवा सर्टिफिकेशन काय आहे हे महत्वाचे नाही, तर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला नक्कीच भरघोस असा मोबदला मिळेल.
तर नेमकं फ्रीलांसिंग म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात अंदाज आलाच असेल, तर फ्रीलान्सर म्हणजे एक अशी व्यक्ती जी स्वतःचे कौशल्य वापरून नेमून दिलेले काम करत असते.
फ्रीलान्सिंगचे काम ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते.
तुम्ही करत असलेले काम कौशल्यपूर्ण म्हणजेच डिफेक्ट लेस असेल तर नवनवीन क्लायंटस कडून तुम्हाला आणखीन खूप सारे नवीन काम मिळण्याची चांगली संधी असते.
तर मित्रांनो आपण पुढच्या थ्रेडमध्ये फ्रीलान्सर कसे बनावे?
याचे आणखी काय फायदे आहेत?
फ्रीलान्सिंग चे तोटे काय आहेत?
आणि आणखीन फ्रीलान्सिंग साठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहू.
आता आपण काही महत्वपूर्ण आहे वेबसाइट्स पाहू जे तुम्हाला फ्रीलान्सिंगसाठी खूप फायदेशीर ठरतील.
1) Upwork
2) Toptal:
3) Outsourcely
4) Working Nomdas
5) SolidGigs
6) 99Designs
7) PeoplePerHour
8) Fiver
9) Freelancer
जर हा थ्रेड हेल्पफुल वाटत असेल, तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
अशाच आणखीन महत्वपूर्ण माहिती आणि थ्रेडससाठी
@RohanMagdum7
या ट्विटर हँडल ला फॉलो करा.
धन्यवाद..!

جاري تحميل الاقتراحات...