SDeshmukh
SDeshmukh

@SDesh01

10 تغريدة 3 قراءة Jan 04, 2024
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आले तरी जाणार नाही — शरद पवार
कोण आहेत हे शरद पवार??
महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील हुशार राजकीय व्यक्तिमत्व म्हणे..खरच???
वेळोवेळी राजकारण करून सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात कशा राहतील,आपलाच कसा फायदा होईल याची पुरेपूर जाण असणारा
नेहमी राजकीय महत्वकांक्षा बाळगणारा नेता.
जातीय तेढ निर्माण करताना नैतिकतेच्या मर्यादा खुबीने ओलांडणारा, वारंवार विशिष्ठ शांतिप्रिय समाजाचे लांगुलचालन करून आपले राजकीय हेतू साध्य करणारा
रामायण,महाभारत थोतांड आहे मात्र कुराणात सांगितलेलं अक्षर अन् अक्षर खरं आहे अशी विधाने करणारा.
मटन खाऊन मंदिरात जाणारा, आपल्या वयाच्या अर्ध्याहून लहान असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या माणसावर केवळ त्याची जात पाहून टीका करणारा,गरज नसताना त्यांची जात काढणारा, अनावश्यक पुणेरी पगडी-फुले पागोटा यांच्यावर विधान करणारा,१९९३साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात
स्वतः १२ वा बॉम्बस्फोट शांतिप्रिय समाजाच्या वस्तीत झाला असे खोटे बोलून स्वहित साधणाऱ्या संधीसाधू स्वभावाचा हा नेता.
मराठा आरक्षण स्वतः १५ वर्ष सलग सत्तेत असून झुलवत ठेवणारे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते आरक्षण दिले की यांचा स्वतः तिळपापड झाला
माझं काही जमलं नाही, पण मी तुझंही जमु दिलं नाही’ ही तद्दन मराठी खेकडावृत्तीच जर राजकारण्यांच्या यशस्वीतेचं मोजमाप करण्याचं एकक असेल तर होय, पवार जिंकतात. मुळात त्यांच्या या पायात पाय घालुन पाडायच्या छंदामुळेच ते कधी खरे नेते होऊ शकले नाहीत.
आपल्या राजकीय आयुष्यात शरद पवारांनी नेहमी वादग्रस्त विधाने करून स्वतःची दुतोंडी अशी प्रतिमा तयार केली वारंवार याला धोका दे, त्याच्या पाठीत खंजीर खुपस,वेगळाच पक्ष काढ, पुन्हा जुन्या पक्षात ये-जा चालू ठेव यामुळे देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव कायमचे अविश्वासास पात्र ठरले आहे
राज्यातील सत्तेत इतके वर्ष असताना केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील ठराविक भागांचाच विकास शरद पवारांनी केला, बाकी मराठवाडा, विदर्भ वाऱ्यावर सोडला त्यामुळे विकास पुरुष अशी प्रतिमा त्यांची कधीच होऊ शकली नाही
पवारांची विकासापेक्षा जिरवा-जिरवीच्या राजकारणाकडे त्यांची ओढ अधिक राहिली
आणि तीच त्यांना भोवलीसुद्धा. महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय समीकरणं नवी नाहीत, पण ती समीकरणं विषारी झाली ती शरद पवारांमुळेच. पवारांचे फायद्याचे मुल्य कमी आणि उपद्रव मुल्य जास्त आहे.
जोपर्यंत या जगात एकनिष्ठता, प्रामाणिकता, तत्वनिष्ठा,राष्ट्रप्रेम या गोष्टी अस्तित्वात आहेत
तोपर्यंत तुम्हीं कितीही उपाध्या मिरवा(चाणक्य, जाणता राजा, तेल लावलेला पहलवान) पण तुम्हीं भावीच राहणार हे नक्की…आता शरद पवारांनी पोक्तपणे वागणे गरजेचे आहे! क्षणिक राजकीय स्वार्थापोटी ते आपला आदर गमावत आहेत. वर त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की आता त्यांचे वय बघून तरी आदर द्यावा 😂
शेवटी आदर हा कमवावा लागतो तो मागुन मिळत नाही!!🙄
आणि शरद पवारांना जर खरोखर या वयातही जनतेतून आदर हवा असेल तर त्यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेला एक करण्याचे काम करावे…मग श्रीरामाच्या चरणी पापमार्जन करावे
#जय_श्रीराम🙏🏻🚩🙏🏻

جاري تحميل الاقتراحات...