प्रथा आणि हौस..!
आपल्याकडे काही गोष्टी असतात ज्या प्रथेत मोडतात आणि काही गोष्टी हौस किंवा फ्याशन म्हणून केल्या जातात . प्रथा कश्या पडल्या का पडल्या याच्या मुळात जायचं म्हटलं तर एखादं भलं मोठं पुस्तक व्हईल पण तूर्तास त्याची गरज नाही . आता नवरात्री याचच उदाहरण घेतलं तर
आपल्याकडे काही गोष्टी असतात ज्या प्रथेत मोडतात आणि काही गोष्टी हौस किंवा फ्याशन म्हणून केल्या जातात . प्रथा कश्या पडल्या का पडल्या याच्या मुळात जायचं म्हटलं तर एखादं भलं मोठं पुस्तक व्हईल पण तूर्तास त्याची गरज नाही . आता नवरात्री याचच उदाहरण घेतलं तर
आपली महाराष्ट्रीयन संस्कृती,प्रथा काय आहे ? नवरात्री म्हटलं की देवीची पूजा आली देवीचे नऊ दिवस उपास आले तिची भक्ती आली . आता पहिल्यापासून बघितलं तर आपल्याकडे घट बसवतात त्याच्यात पाच प्रकारचे धान्य टाकतात आणि त्याची पूजा केली जाते . ही झाली प्रथा परंपरा. आता आलो हौस
म्हणजे काय देवीची मूर्ती बसवणे..तिला रोज नवीन साडी नेसवणे आणि रात्री दांडिया ,गरबा असले कार्यक्रम . दांडिया गरबा आपली संस्कृती आहे का ? तर नाही आपली संस्कृती नाही . मग आपण का खेळायचे ? मौज हौस म्हणून ठीक आहे . पण आजकाल दांडिया आणि गरबा आपल्या प्रथा किंवा आपल्या संस्कृतीत
वरचढ होत आहेत . देवीचे नऊ दिवस वेगळे रंग हौस म्हणून केले जायचे आता हळू हळू त्याच रूपांतर प्रथा या सदराखाली होताना दिसत आहे . बऱ्यापैकी बायका त्याच अनुकरण करताना दिसतात . कहर म्हंजे आता घरात ही गणपती सारखी देवीची मूर्ती आणि सगळं बसवण्याचा घाट घातला जात आहे. ठीकिय तुम्ही तुमची
हौस करत आहात पण आजची तुमची हौस उद्या प्रथा बनणार नाही ना किंवा तुम्ही हौसेला प्रथेत रूपांतर तरी करत नाही आहे ना ?? हे बघायला हवं. आज दांडिया आणि गरबा जेव्हा आमच्यासारखी अडाणी ( तुमच्या दृष्टीतून )लोकं म्हणतात की ही हौस म्हणून ठीक आहे पण प्रथा होऊ देऊ नका तेव्हा
काही अत्यंत मोठे असणार देवीचे भक्त अंगावर यायला मागे पुढे बघत नाहीत . आपली संस्कृती आपली प्रथा आहे ..तू असं कसं म्हणू शकतो ..जेव्हा त्यांना आरसा दाखवला जातो की रे बाबा आपल्या लहान पणी का नव्हत हे सर्व ? तेव्हा उडती उत्तरे देऊन पळतीचा मार्ग तयार असतो . भेले मोठे लोक आणि
सिटी या ठिकाणी सगळं ठीक आहे ..तुमच्याकडे बक्कळ पैसा आहे तुम्ही करू शकता सर्व काही . पण मग प्रश्न येतो खेड्यातील जनतेचा..त्यांना नेमकं माहित ही नसतं की आपण हे का करतोय . सगळीकडे चालू आहे मग आपल्या गावातही हवं म्हणून मग बसवा देवी आणि मग अना ज्योत ..खेळा दांडिया गरबा
त्यात कहर म्हंजे काय भारी गाणी असतात त्यात ... काल एक गाणं लावलं होतं " जुम्मा चुम्मा दे दे .." त्या गाण्यावर यांचा गरबा आणि सगळं चालू होतं . अरे आपली संस्कृती काय आपण करतोय काय . करा करण्याबद्दल काय नाय पण मग त्याचा होणारा अतिरिक्त खर्च कोणाच्या बोकांडी बसवायचा ??
आहेच मग जनता .. काढा वर्गणी ..मोठे लोक पाचशे हजार दोन हजार द्यायला त्यांना काय वाटत नाही पण मग गावात रोजगार करून खाणारा रोजगारी जेव्हा दोन हजार वर्गणी देतो तेव्हा त्याच्या महिन्याच्या कमाईतील अर्धे पैसे गेलेलं असतात . नाय देईना तर वर्गणी कम्पल्सरी केलेली असते
नाही द्यावी तर देवाचा कार्यक्रमाला नाय म्हणायचं नसतं...झालं पाप असतं ना ते ... झालं गरिबाच्या खिष्याला कात्री लागण्याचे असच सुरू झालं ... बरं यातून किती चांगली कामे झाली ?? काही एक नाही ..देवीची सुबक मूर्ती आणि तिची होणारी पूजा इतकचं काय ते जरा उपयोगाचे .नाहीतर नुसता धांगड धिंगा
नऊ रंगाचे कपडे घालून फिरन आलं ,मग त्यासाठी परत पैसे कलर हवा ना शेजारीचीने साडी नेसली मग मला नको का ? झाला पैश्याचा खेळ सुरू .. परत रात्री गरबा आला मग त्यासाठी वेगळे कपडे आले ...धांगड धिंगाणा आला ..आता ही हौस म्हणती गोष्ट प्रथा म्हणून स्वीकारला सुरुवात झाली आहे ...
देवीने लवकरच अश्या टुकार प्रथा निर्माण करणाऱ्या लोकांना शिक्षा द्यावी ...अजून बरच आहे ..चप्पल पाळतात म्हणे ? कशाला तर नऊ दिवस देवीसाठी ..काय गरज आहे ? खरच आहे गरज चप्पल पाळण्याची .?? उपवास करा आता ते तर उपवास करणं म्हंजे तुमची देवावर असलेली श्रद्धा दाखवून देणं असं काम झालं आहे
कधी आपला समाज यातून बाहेर येयील काय माहित . देवाचं देवपण मानावं पण जेव्हा देवाच्या देवापणाला अंधश्रध्देच ग्रहण लागतं तेव्हा समाज एका अधोगतीकडे वाटचाल करायला सुरुवात करत असतो ...अंबाबाई तुझ्याकडं इतकंच साकड घालावं वाटतं की श्रद्धा राहू दे ग बाकीचे थोतांड जाळून खाक कर ..!
جاري تحميل الاقتراحات...