The Mahrattas 卐
The Mahrattas 卐

@TMahrattas

27 تغريدة 107 قراءة Oct 12, 2023
Asmani Sultani - Acts of Gods and Kings.
Asmani Sultani means Acts such as that of God or of the Kings, which is the nature of a calamity against which no plebeian can take countermeasures.
Many treaties & other documents refer to this condition as breaking point of legitimacy.
There are apparently only 2 books in the whole of the Saint literature of India which describe the situation of common man in a contemporary historic sense.
This Asmani Sultani is about Swami Ramdas' exploration of India during peak of famine and Turko-Afghan Mleccha tyranny.
प्रबंध पहिला
बहुसाल कल्पांत लोकांसी आला । 
महगें बहु धाडी केली जनांला । 
कितीयेक मृत्युसी ते योग्य जालें । 
कितीयेक ते देश त्यागुनी गेले ॥ १ ॥
कितीयेक ग्रामे चि ते वोस जाली । 
पिके सर्व धान्ये च नाना बुडाली। 
कितीयेक धाडिवरी धाडी येती । 
द्वया सैन्यकाचेनी संव्हार होती ॥ २ ॥
कितीयेक ते मेघ ही मंद जालें । 
अनावृष्टी स्थळोस्थळी लोक मेले। 
कितीयेक अन्नाविसी भ्रष्ट जालें। 
कितीयेक लोकीं जळीं प्राण दिल्हे ॥ ३ ॥
कितीयेक ते तांब्रबंदी च गेले । 
कितीयेक मारहाष्टबंदी निमाले । 
कितीयेक ते छंद ना बंद नाही । 
कितीयेक बेबंद ते ठाई ठाई ॥ ४ ॥
कितीयेक ते धान्य लुटोनि नेती । 
कितीयेक ते पेंव खाणोनि नेती । 
कितीयेक ते पुरीले अर्थ नेती । 
किती पुरीली सर्व पात्रेची नेती ॥ ५ ॥
किती पंथ देशात ते नासले हो । 
कितीयेक पंथात ते मारिले हो । 
कितीयेक पंथात ते लुटीले हो । 
किती दांडगी ते बहु कुटीले हो ॥ ६ ॥
कितीयेक ते घ्राणकर्णेचि घेती । 
किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविती । 
किती मोट बांधोनी ते मुडविती । 
पिछोडेची बांधोनी हीरोनि नेती ॥ ७ ॥
किती पोट फाडुनी ते मारीताती । 
वृथा चोर अर्थाविसी प्राण घेती । 
कितीयेक सौदागरा बुडविती । 
कितीयेक ते काफिले लुटिताती ॥ ८ ॥
किती गुज्रिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या । 
किती शांमुखी जाहाजी फाकवील्या ।
 कितीयेक देशांतरी त्या विकील्या । 
किती सुंदरा हाल होवोनि मेल्या ॥ ९॥
किती कोकणामाजी ते लोक गेले । 
फळे काकड्या भक्षिता रोग जालें । 
पिडा पायले पोट फुगोनि मेले ।
किती किर्र म्हणोनि फिरोनी मेले ॥ १० ॥
प्रबंध दुसरा
जन बुडाले बुडाले पोटेविण गेलें ।
बहु कष्टले कष्टले कितीयेक मेले ।
वीसा लोकांत लोकांत येकचि राहिले ।
तेणें उदंड उदंड दुःख चि साहिले ॥ धृ०॥
काही मिळेना मिळेना मिळेना खायाला ।
ठाव नाही रे नाही रे नाही रें जायाला ।
हौस कैंची रे कैची रें कैची रें गायाला ।
कोठें जायें रें जायें रें जावें रें मागायाला ॥ १ ॥
शेत पिकेना पिकेना पिकेना उदंड | 
कष्ट करुनी करुनी होत आहे भंड। 
अवघें जाहाले जाहाले जाहाले थोतांड | 
दुनिया पाहाता पाहाता उदंड जालीं लंड ॥ २ ॥
देश नासला नासला उठे तोचि कुटी । 
पिके होताची होताची होते लुटालुटी । 
काळाकरिता जिवलगा जाली तुटातुटी ।
अवघ्या कुटुंबा कुटुंबा होते फुटाफुटी ॥ ३ ॥
कैचा आधार आधार नाही सौदागर । 
काही चालेना चालेना उदीम व्यापार । 
सर्व सारिखे सारिखे जाला येकंकार ।
काळ कठीण कठीण कैसा पावें पार ॥ ४ ॥
नलगे हासावें हासावें सगट सारिखेचि । 
लोक तुटले तुटले संसाराची ची ची । 
जर्नी इजती हुरमती पाहो जाता कैची । 
दुनिया जाली रे जाली रे जाली रे बळाची ॥ ५ ॥
धान्ये माहाग माहाग जैसे ही मिळेना । 
कैसे होईल होईल होईल कळेना । 
काय होणार होणार होणार टळेना । 
पुण्य गेले ₹ गेले रे काहींच फळेना ॥ ६ ॥
पाऊस पडतो पडतो उदंड पडतो। 
नाहीतरी उघडे उघडे अवघा उघडतो । 
पीळ पेचाचा पेचाचा प्रसंग घडतो । 
लोक उधवेना उधवेना औघा च दडतो ॥ ७ ॥
सुडके पटकर पटकर न मिळे पांघराया। 
शक्ति नाही ₹ नाही रे कॉपट कराया। 
वाट फुटेना फुटेना विदेसि भराया। 
अवधी बैसलों बैसलों बैसलों मराया ॥ ८ ॥
यायेला लेकुरें लेकुरें सांडोनिया जाती । 
भीक मागती मागती तिकडेची मरती । 
रांडा पोरांच्या पोरांच्या तारांबळी होती ।
मोल मजुरी भिकारी होऊनि वाचती ॥ ९ ॥
बरं होईल होईल लागलीसे आस । 
बरें होईना होईना आसेची निरास । 
काळ आला रे आला रे जाहाले उदास । 
काही केल्यानें केल्यानें मिळेना पोटास ॥ १० ॥
नदी भरता भरता घालुनिया घेती । 
वीखं घेऊनी घेऊनी उदंड मरती। 
अग्नि लाऊनी लाऊनी जळोनिया जाती । 
मोठी फजिती फजिती सांगावें तें किती ॥ ११ ॥
येक पळाले पळाले दुरी देशा गेले । 
बहु कष्टले कष्टले तेथे नागवले । 
फिरोनी आलें रें आलें रें घरीच लोक मेले । 
कोठें उपाय दिसेना कासाविस जालें ॥ १२ ॥
उदंड चाकरी चाकरी मिळेना भाकरी । 
लोक निलंड निलंड काढोनि नेती पोरी । 
न्यायें बुडाला बुडाला जाहाली सिजरी । 
पैक्या कारणे कारणे होतें मारामारी | ॥ १३ ॥
कोण्ही वाचला वाचला तो सर्वेचि नागवला । 
उदीमा गेला गेला रें तो मध्येंचि मारिला ।
काही कळेना कळेना कोणाचें कोणाला । 
येतो येकाकी येकाकी अकस्मात घाला ॥ १४ ॥
येतों ये पाहुणा पाहुणा लौकरी जाईना । 
अन्न खातो ₹ खातो रें थोडें ही खाईना । 
उदंड वाढिलें वाढिलें तहीं तो धाईना ।
गर्यो बोलतो बोलतो कोठे चि माईना ॥ १५ ॥
लोक झीजले झीजले झडेसीच आलें । 
दारी बैसले बैसले उठेनासे जालें । 
ईरे नाही नाही रें बुद्धीने सांडिलें । 
अन्ना कारणे कारणे उदंड धादावले ॥ १६ ॥
लोक खाती रे खाती रे तेथेचि हागती । 
राती उठती उठती भडाभडा वोकीती । 
उदंड घेतले घेतले अखंड उचक्या देती । 
कर्पट ढेकरें ढेकरें राऊत सोडिती ॥ १७ ॥
राहे वस्तीस वस्तीस चोरीतो यस्तांस | 
खोटा अभ्यास अभ्यास हाणी महत्वास । 
परी तो सांडेना सांडेना ठकीतो लोकांस । 
पुढे ठके रैं ठके ₹ ठके अवेवास ॥ १८ ॥
लोक भलेंसें दीसती खेटरे चोरीती ।
वस्त्र धोतरे पातरे लपउनी पळती ।
कोठे धरिती मारिती महत्वा हारीती।
काये करिती करिती यायेट संगती॥१९॥
दास म्हणे रे भगवंता किती पहासी सत्व ।
काय वाचोनी वाचोनी ने परते जिवीत्व । 
किती धरावें धरावें धरावें ते सत्व । 
जालीं शरीरे शरीरे शरीरे निसत्व॥ २० ॥
प्रबंध तिसरा
पनाळागडी फार महर्ग जालें ।
बहु विस्व तेणें गुणें वाज्य आलें । 
कधी देव पावेल काही कळेना । 
कदा धुंडिया येक दाणा मिळेना ॥ १ ॥
गुर्रे विकीली सर्व वस्त्रे च पात्रे । 
भटे विकीली सोवळी वोली यस्खें । 
कधी देव पावेल काही कळेना । 
कदा धुंडिल्या येक दाणा मिळेना ॥ २ ॥
किती विकीली जेन झोरें चवाळी ।
किती धाबळा माळ चंबू गबाळी । 
कधी देव पावेल काही कळेना । 
कदा धुंडिल्या येक दाणा मिळेना ॥ ३ ॥
किती उखळे मुसळे सुप पाट्या । 
किती विकिले झाडुनी कुंप काट्या । 
कधी देव पावेल काही कळेना । 
कदा धुंडिल्या येक दाणा मिळेना  ॥ ४ ॥
कितीयेक जाती किती खल्लवते । 
नहीं ते नव्हें काम काहीच फते । 
कधी देव पावेल काही कळेना । 
कदा धुंडिल्या येक दाणा मिळेना ॥ ५ ॥
कितीक तर्वार ढाला कटारा। 
कितेकी सुऱ्या कातऱ्या त्या अपारा। 
कधी देव पावेल काही कळेना । 
कदा धुंडिल्या येक दाणा मिळेना ॥ ६ ॥
कितेकी च सिलें च भाले विकिले । 
कितेकी किती उंट घोडे विकले। 
कधी देव पावेल काही कळेना । 
कदा धुंडिल्या येक दाणा मिळेना ॥ ७ ॥
कितेक मुद्या कुडक्या त्या विकील्या । 
कितेकी किती आगइया त्या विकील्या ।
कधी देव पावेल काही कळेना । 
कदा धुंडिल्या येक दाणा मिळेना ॥ ८ ॥
स्त्रियांचे अलंकार नानापरीचे। 
किती थोर थोरांची त्या सुंदरीचे । 
कधी देव पावेल काही कळेना । 
कदा धुंडिल्या येक दाणा मिळेना ॥ ९ ॥
असे संकटी रक्षिलें तां दिनासी । 
किती आठवु प्रत्ययो तो मनासि । 
धरुनि करी उतरिले अनाथा । 
लिळे पार तां पावविले समर्था ॥ १० ॥
The End.

جاري تحميل الاقتراحات...