11 تغريدة 6 قراءة Aug 31, 2023
आरोग्य विम्याबद्दल वाचताना महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेवर एक भारी सर्व्हे हाती लागलाय - आरोग्य सर्वेक्षण २०२१
त्यातली काही महत्त्वाच्या निरीक्षणं 👇
१) विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी वय जसे वाढते तशी कमी होत जाते आणि मुलींची हजेरी मुलांपेक्षा तशी कमी आहे..😐
#म
#मराठी
२) लग्नाचं सरासरी वय ~ २० वर्ष आहे..पण २०-४९ वर्ष वयोगटातील
११% स्त्रिया आणि ३०% पुरुष यांचं एकदाही लग्न झालेलं नाहीये..🤯
#Gender_Inequality
#SexRatio
३) महाराष्ट्राचा fertility rate म्हणजेच प्रजनन दर हा १.७ आहे.
लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे २ पेक्षा कमी प्रजनन दर असेल तर त्या देशाची /राज्याची लोकसंख्या कमी होते.
पण राज्याची लोकसंख्या तर रोज वाढतेच आहे..मग कारण -
परप्रांतीयांचे लोंढेच असणार..😱🤯😐
४) प्रजनन दर जाती धर्माने तर बदलतोच आहे..पण रिपोर्ट सांगतो की -
प्रजनन दरावर (प्रती स्त्री किती मुले) सर्वात जास्त प्रभाव शिक्षणाचा पडतो..❤️
अशिक्षित स्त्री प्रजनन दर - २.३
५ वी - २.२
९ वी - २.१
१० वी - १.८
१२ वी + - १.६
५) ९० % महिला आणि ८७% पुरुष ह्यांच्या मते कुटुंबाचा आकार ४ पेक्षा मोठा नसायला पाहिजे.
७५% कुटुंबांना किमान एक मुलगा पाहिजे..😐
Details 👇
६) गरोदरपणात महिलांची काळजी (किमान ४ वेळा तपासणी) घेण्यात धाराशिव / उस्मानाबाद जिल्हा मुंबईच्याही पुढे आहे..
आणि परभणी हा डोंगराळ आदिवासी भाग समजला जाणाऱ्या नंदुरबार, गडचिरोली पेक्षाही खाली शेवटच्या क्रमांकांवर आहे..!
७) सिंधुदुर्ग,नागपूर , चंद्रपूर आणि मुंबई ह्या जिल्ह्यात सर्व बाळांचा जन्म हॉस्पीटल मध्येच होतो..
तर..
जळगाव ,परभणी ,धुळे, नंदुरबार इथे अजूनही मोठ्या प्रमाणात बाळे हॉस्पीटल मध्ये जन्म घेत नाहीत..😐
८) लहान मुलांना सर्व मूलभूत लसी देण्यात गडचिरोलीने राज्यात एक नंबर आणि परभणीने पून्हा शेवटच्या क्रमांक मिळवलाय..!
वाईट गोष्ट अशी की अजूनही राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यात सर्व बाळाना सर्व लसी दिल्या जात नाहीत..😐
९) सधन आणि समृद्ध महाराष्ट्रात
दर ५ पैकी २ मुले (५ वर्षाखालील) काही ना काही प्रमाणात कुपोषित आहेत..😐
१०) सधन आणि समृद्ध महाराष्ट्रात
५४% स्त्रिया
२२% पुरुष
६९% लहान मुले
यांना अनेमिया आहे..म्हणजे शरीरात रक्त कमी आहे..योग्य तो आहार घेत नाही किंवा मिळत नाही किंवा परवडत नाही..😐
११) पुरोगामी महाराष्ट्रातील लग्न झालेल्या दर १० पैकी ~ ३ स्त्रियांना घरी मारहाण झालेली आहे..🤬
कधीही दारू न पिणाऱ्या नवऱ्याने बायकोला मारहाण करायचे शक्यता दारू कधीतरी किंवा रोज पिणाऱ्या नवऱ्यापेक्षा किमान ३ पटींनी कमी आहे..🔥🔥🔥
मुली उगाच निर्व्यसनी नवरा शोधत नाहीत..😬

جاري تحميل الاقتراحات...