PaisaPani
PaisaPani

@PaisaPani

18 تغريدة 3 قراءة Aug 22, 2023
कर्जमुक्त होण्याचे सहा मार्ग
आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या कर्ज घेतल्याशिवाय शक्य होत नाहीत आणि म्हणूनच आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी कर्ज घेतो. मात्र या कर्जाचे मॅनेजमेंट व्यवस्थित केले नाही तर त्याचा डोंगर उभा राहतो.
#म #मराठी
त्यातून मार्ग काढणे कधीकधी अतिशय जिकिरीचे होऊ शकते. मग या कर्जाच्या डोलाऱ्याखाली अनेकदा कुटुंब देखील उध्वस्त होते. म्हणूनच आजच्या थ्रेडमधून आपण कर्जमुक्त होण्याचे सहा मार्ग पाहणार आहोत. #म #मराठी
पहिला मार्ग आहे तो म्हणजे डेट कन्सॉलिडेशन, म्हणजे तुमची जी कर्जे आहेत किंवा क्रेडिट कार्डवरचे बॅलन्स आहेत, ते तुम्ही एकाच कर्जात एकत्र करायचे. या एकाच कर्जाचा व्याजदर इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा कमी असेल. #म #मराठी
म्हणजे तुम्ही आता फक्त एकच कर्ज फेडायचा विचार करणार आहात. यामुळे तुम्हाला कर्जावर नियंत्रण मिळवणे एक प्रकारे शक्य होते. समजा तुमच्याकडे तीन क्रेडिट कार्ड आहेत. तिन्ही क्रेडिट कार्डवर प्रत्येकी 50 हजार रुपये बॅलन्स आहे. #म #मराठी
या तिन्ही क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट रेट 18%, 20% आणि 22% असा आहे. या केस मध्ये तुम्ही डेट कन्सॉलिडेट करण्यासाठी दीड लाखांचे कर्ज 10 टक्क्याने जर घेतलं तर तुम्ही तीनही क्रेडिट कार्डचे कर्ज क्लिअर करू शकाल. #म #मराठी
एक प्रकारे तुम्ही एकाच कर्जाचे हफ्ते फेडून इंटरेस्ट पोटी जाणारी काही रक्कम वाचवू सुद्धा शकता.
दुसरा मार्ग आहे डेट ऍव्हलाँच
यामध्ये तुम्ही ज्या कर्जाचा व्याजदर सगळ्यात जास्त आहे ते सर्वात आधी फेडता. #म #मराठी
हे करत असताना इतर कर्जांवर तुम्ही मिनिमम पेमेंट करत राहता. सगळ्यात जास्त व्याजदर असणाऱ्या कर्जाची परतफेड झाली की तुम्ही उरलेल्या कर्जापैकी ज्याचा व्याजदर जास्त आहे त्याची परतफेड करण्यावर फोकस करता. अशा प्रकारे एक एक कर्ज तुम्ही फेडून टाकता. #म #मराठी
वर पाहिलेल्या तीन क्रेडिट कार्डचे उदाहरण इथेसुद्धा वापरता येईल. तीन क्रेडिट कार्डच्या केस मध्ये तुम्ही आधी सगळ्यात जास्त म्हणजे 22% व्याजदर असलेल्या क्रेडिट कार्डचे कर्ज सगळ्यात आधी फेडाल. ते झाल्यानंतर तुम्ही २०% व्याजदर असलेल्या क्रेडिट कार्डचे कर्ज संपवावे #म #मराठी
आणि सगळ्यात शेवटी तुम्ही 18% व्याजदर असणाऱ्या कर्जाचे हप्ते फेडून टाकावेत.
तिसरा मार्ग आहे तो म्हणजे बॅलन्स ट्रान्सफर. म्हणजे जास्त व्याजदर असलेल्या तुमच्या कार्डावरचा बॅलन्स कमी व्याजदर असलेल्या कार्डावर ट्रान्सफर करणे. #म #मराठी
यामुळे तुम्हाला कर्जाच्या मुदलीची परतफेड वेगाने करणे शक्य होते. उदा. तुमचे क्रेडिट कार्ड तुम्हाला 18% व्याजदर आकारत असेल तर तुम्ही त्या कार्डवरचा बॅलन्स कमी व्याजदर  असलेल्या क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करू शकता. #म #मराठी
हे करताना तुमच्याकडे ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड आहे ती बँक बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा उपलब्ध करून देते का?  याची चाचणी करणे गरजेचे आहे. तसे नसेल तर तुम्हाला अगोदर बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा देणारे क्रेडिट कार्ड नव्याने घ्यावे लागेल #म #मराठी
आणि मग तुमच्याकडील क्रेडिट कार्डवरील बॅलन्स त्या नव्या क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करावा लागेल.
चौथा मार्ग आहे तो म्हणजे डेट काउन्सेलिंग. या मार्गामध्ये तुम्हाला काही प्रोफेशनल लोक कर्ज कसे कमी करावे? याबाबत मार्गदर्शन करतात. #म #मराठी
हे मार्गदर्शक तुमच्यासाठी कर्जमुक्तीचा एक प्लॅन बनवतात आणि त्यानुसार तुम्ही जर कर्जाची परतफेड करत गेलात तर लवकरात लवकर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळू शकते. काही प्रोफेशनल लोक #म #मराठी
हे तुमच्या वतीने बँकांशी किंवा क्रेडिट कार्ड कंपन्यांशी निगोशिएट करून तुमच्या कर्जावरील व्याजदर कमी करण्यासाठी देखील मदत करतात.
पाचवा मार्ग आहे कुठल्याही गोष्टीचे बजेट रेडी असणे. जेव्हा तुम्ही एखादे कर्ज घेता #म #मराठी
त्यावेळेस ते कर्ज परत फेडण्यासाठी तुमच्याकडे भक्कम असा प्लॅन असला पाहिजे. आपली महिन्याची कर्जाची हफ्त्याची रक्कम कशी फेडायची? याबाबत तुम्हाला बजेट आखता आले पाहिजे. असे केल्याने तुम्ही कुठे वायफळ खर्च करत आहात? याची तुम्हाला कल्पना येते.  #म #मराठी
ते खर्च कमी करून तुम्ही ती रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरू शकता. योग्य प्रकारे बनवलेले बजेट तुम्हाला कर्ज लवकरात लवकर कमी करण्यासाठी अतिशय फायद्याचे ठरू शकतो. #म #मराठी
सहावा मार्ग आहे तो म्हणजे इमर्जन्सी कॉर्पस निर्माण करणे. प्रत्येकाने आयुष्यात न सांगता येणाऱ्या इमर्जन्सीसाठी एक ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे पुरेसा इमर्जन्सी फंड नसेल तर खर्च करण्यासाठी तुम्हाला कर्जाची मदत घ्यावी लागू शकते. #म #मराठी
त्यामुळे तुमच्या अगोदर पासून सुरू असलेल्या कर्जाच्या परतफेडीवर परिणाम होऊ शकतो. साधारणपणे तुमच्या मासिक उत्पन्नाच्या सहा पट रक्कम इमर्जन्सी फंडसाठी ठेवावी असे अनेक तज्ञ सांगतात. #म #मराठी

جاري تحميل الاقتراحات...