नकट्या😼
नकट्या😼

@Pujari_Birsidha

3 تغريدة 9 قراءة Aug 18, 2023
वडिलांनी मुलाला वीज बिल जमा करण्यासाठी पैसे दिले...मुलाला काय वाटलं काय माहीत त्याने त्या पैश्याचे लॉटरीचं तिकीट घेतले.बापाने विचारले.. " वीज बिल भरलं का ?कारण उद्या बिल जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. लेकराने घाबरून सांगितले...नाही त्या पैशाने घेतली लॉटरीची तिकिटे,
कारण "आपण जिंकू शकतो लॉटरीमध्ये नवीन चमकदार बोलेरो कार" बापाने लय मारला ! दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी घराचे दरवाजे उघडले तेव्हा समोर नवीन चमकत बोलेरो गाडी उभी होती! संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आले. सर्वजण एकमेकांकडे आश्चर्य आणि उत्सुकतेने पाहत होते.
मुलाच्या डोळ्यात सर्वात जास्त अश्रू आले आणि तो खूपच अस्वस्थ दिसत होता..... कारण ती बोलेरो गाडी वीज खात्याची होती.... आणि ते विजेची लाईन कापायला आले होते. बापाने पुन्हा लय मारला! म्हणून गरजेच्या कामांसाठी बिनकामाच्या पोरांच्या भरोशावर राहू नका आणि वेळेवर वीज बिल जमा करा.😅😹

جاري تحميل الاقتراحات...