।। अभिषेकी ।।
।। अभिषेकी ।।

@Late_Night1991

6 تغريدة 10 قراءة Jun 28, 2023
आपल्याला कुठे 'थांबायचं' आहे याचं उत्तर वेळीच शोधलं पाहिजे. निरोप कधी घ्यायचा हेही समजलं पाहिजे. खूप खोल गुंतत जाणं हे मनासाठी हानिकारक असतं. आयुष्यभर टिकेल असं काहीच असू नये, असत नाही! मन रमेना झालं किंवा खूप काही मिळवलं आहे असं वाटत असेल तर लागलीच थांबावं.
नवनवीन आयाम फिरायचे असतील तर जुने कुठेतरी थांबवलेच पाहिजेत. अनंत सुखाची ओढ प्रत्येक जीवाला असते. त्यासाठी जुन्या आठवणीत रमून कसं चालेल!
ज्यादिवशी वाटेल, आता खूप कमावलं त्यादिवशी काम थांबवावं.
ज्यादिवशी वाटेल की खूप जग फिरलो, मग स्थिरस्थावर व्हावं.
ज्यादिवशी वाटेल की आता छंद जोपासत असताना मजा येत नाही, त्यादिवशी छंद बदलावेत.
ज्यादिवशी वाटतं की मैत्रीतील रस संपला, त्यादिवशी मित्र बदलावा.
ज्यादिवशी वाटतं की नात्यात प्रेम उरलं नाही त्यादिवशी त्या व्यक्तीशी नवं नातं जोडावं.
लहानपणी जेवता जेवता पोट भरलं की आपण आईला सांगून ताटावरून उठायचो तर आपले उरलेले घास आई खायची, किंवा चालता-चालता पाय दुखू लागले की वडिलांना सांगितलं की वडील आपसूकच कडेवर उचलून घ्यायचे; इतकं साधं नाही का होऊ शकत हे सर्व.?
एका सुंदर प्रवासाचा शेवट आदळआपट करून, भांडून, त्रागा करून कशाला करायचा.? त्यापरिस खुल्या दिलाने सांगावं 'प्रवास इथपर्यंतचाच होता, आता नवीन मार्गी लागतो!' आणि सुटावं...
~ बॅटमॅन चित्रपटात शेवटी एका नदीच्या किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये बसल्यावर आल्फ्रेड दुरूनच ब्रूसकडे बघतो आणि हातातील पेला उंचावतो तो प्रसंग निरोपाचा सुखद क्षण वाटतो. त्यावरूनच सुचलेलं...
#जर्जर

جاري تحميل الاقتراحات...