ShriRaj Tripute
ShriRaj Tripute

@ShriRajTripute_

20 تغريدة 8 قراءة Jun 12, 2023
🧵 #थ्रेड
नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी मारल यांच न्यायालयात दिलेल स्पष्टीकरण:-
"मी माझे सारे धैर्य एकवटले आणि 30 जानेवारी 1948 रोजी बिर्ला हाऊस येथील प्रार्थनास्थळावर गांधीजींवर गोळ्या झाडल्या."
स्वतःचा बचाव करण्यासाठी एकही शब्द खर्च न करता, आपण गांधीजींवर गोळ्या झाडल्या-
असे प्रतिपादन नथुराम गोडसे यांनी भर न्यायालयात केले आणि देशातील एका अभूतपूर्व अशा खटल्याला सुरवात झाली. हत्या का केली? या प्रश्नाला उत्तर देताना नथुरामने सांगितले, "अशा गुन्हेगाराला (गांधी) कायद्याच्या चौकटीत आणता येईल अशी कोणतीही कायदेशीर यंत्रणा नव्हती आणि म्हणूनच मी गांधीजीवर-
गोळ्या झाडण्याचा अवलंब केला कारण माझ्यासाठी तो एकमेव उपाय होता"
खरे तर हा एक थंड रक्ताने केलेला खून (Cold-blooded Murder) होता, कायद्याच्या भाषेत! शेकडो लोकांच्या साक्षीने केलेल्या या खुनाला कोणत्याही साक्षी पुराव्याची गरज नव्हती!
तरीही, नथुराम गोडसे याने, 'आपण हे का केले?'
याबद्दल काही निवेदन करण्याची अनुमती न्यायालयाकडे मागितली.
कायदेशीर प्रक्रियेचा पुरेपूर फायदा करून त्याला ही अनुमती मिळाली देखील!
दिवसाढवळ्या खुन करणाऱ्या आरोपीला त्याची कारणे सांगण्याची आणि हत्येचे समर्थन करण्याची परवानगी दिली जाऊ शकते हे न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने-
आश्चर्यकारक आहे. पण त्याची त्यामागची कारणमीमांसा, त्याचा दृष्टिकोन जाणून घेणे न्यायालयाला आवश्यक वाटले, आणि म्हणून अशी जगावेगळी अनुमती दिली गेली. न्यायाधीश आत्मा चरण यांनी गांधींवरील वैचारिक हल्ल्याबाबत नथुराम गोडसे याला नऊ तास बोलण्याची मुभा दिली.
एकटेच अंतिम न्यायाधीश होते. काय बरोबर किंवा चूक… एकतर काँग्रेसला आपली इच्छाशक्ती त्यांच्या हाती सोपवावी लागली आणि त्यांच्या सर्व विक्षिप्तपणा, लहरीपणापुढे मान डोलवावी लागली… किंवा त्याच्याशिवाय पुढे जावे लागले… सविनय कायदेभंग चळवळीला मार्गदर्शन करणारा तो मास्टर ब्रेन होता…!
चळवळ यशस्वी होऊ शकते किंवा अयशस्वी; यामुळे अनोळखी संकटे आणि राजकीय उलथापालथी येऊ शकतात, परंतु महात्माजींच्या अविचारीपणात काही फरक पडू शकत नाही... बालिश, अविवेकीपणा आणि आडमुठेपणा…गांधीजी एकामागोमाग एक चूक करत होते.
….गांधींनी तर सिंधच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीपासून वेगळे होण्याला-
पाठिंबा दिला आणि सिंधच्या हिंदूंना जातीय लांडग्यांच्या हाती फेकून दिले. कराची, सुक्कूर, शिकारपूर आणि इतर ठिकाणी असंख्य दंगली झाल्या ज्यात फक्त हिंदूंनाच फटका बसला…
…ऑगस्ट १९४६ पासून मुस्लिम लीगच्या खाजगी सैन्याने हिंदूंची कत्तल सुरू केली… बंगालपासून कराचीपर्यंत हिंदूंचे रक्त-
वाहू लागले.… सप्टेंबरमध्ये स्थापन झालेल्या अंतरिम सरकारची मुस्लीम लीगच्या सदस्यांनी तोडफोड केली. परंतु ते ज्या अंतरिम सरकारचा भाग होते त्या सरकारशी ते जितके अविश्वासू आणि देशद्रोही होत गेले, तितकाच गांधींचा त्यांच्याप्रति मोह वाढतच गेला.
….आपल्या राष्ट्रवादाची आणि समाजवादाची-
फुशारकी मारणाऱ्या काँग्रेसने गुप्तपणे पाकिस्तानचा स्वीकार केला आणि जीनांची शरणागती पत्करली. भारताचे विभाजन झाले आणि भारताचा एक तृतीयांश भूभाग आपल्यासाठी परकीय भूमी बनला… 30 वर्षांच्या निर्विवाद हुकूमशाहीनंतर गांधीजींनी हेच साध्य केले होते आणि यालाच काँग्रेस पक्ष 'स्वातंत्र्य'-
म्हणतो….
उपोषण सोडण्यासाठी गांधीजींनी घातलेल्या अटींपैकी एक अट अशी होती की हिंदू निर्वासितांनी व्यापलेल्या दिल्लीतील मशिदींवरील ताबा हिंदूंनी त्वरित सोडावा. पण जेव्हा पाकिस्तानातील हिंदूंवर हिंसक हल्ले झाले तेव्हा त्यांनी पाकिस्तान सरकारचा निषेध करण्यासाठी एक शब्दही उच्चारला-
नाही…
गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. पण जर तसे असेल तर त्यांनी देशाच्या फाळणीला संमती देऊन देशाशी अत्यंत विश्वासघातकी कृत्य केल्यामुळे त्यांनी आपले पितृ कर्तव्य चुकवले आहे… या देशातील लोक पाकिस्तानच्या विरोधासाठी उत्सुक आणि तीव्र होते. पण गांधीजी लोकांशी खोटा खेळ-
खेळले…
मला माहित आहे की मी केलेल्या या कृत्याने मी पूर्णपणे उद्ध्वस्त होईन, आणि लोकांकडून मला द्वेषाशिवाय दुसरे काहीही मिळणार नाही. पण जर मी गांधीजींना मारले तर त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय राजकारण निश्चितपणे व्यावहारिक सिद्ध होईल, बदला घेण्यास सक्षम असेल आणि सशस्त्र सैन्याने-
सामर्थ्यवान असेल. माझे स्वतःचे भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल यात शंका नाही, पण पाकिस्तानच्या घुसखोरीपासून देश वाचेल.
….मी म्हणतो की ज्या व्यक्तीच्या धोरणाने आणि कृतीने लाखो हिंदूंना उद्ध्वस्त केले, त्यांचा विनाश आणि विध्वंस घडवून आणला होता त्या व्यक्तीवर माझ्या गोळ्या-
झाडल्या गेल्या होत्या… अशा अपराध्याला कायद्याच्या कचाट्यात आणता येईल अशी कोणतीही कायदेशीर यंत्रणा नव्हती आणि या कारणास्तव मी त्या जीवघेण्या गोळ्या झाडल्या…
.. माझ्यावर दया दाखवावी अशी माझी इच्छा नाही… मी गांधीजींवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या. मी पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न-
केला नाही; किंबहुना पळून जाण्याचा विचार मी कधीच केला नाही. मी स्वत:ला गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला नाही... कारण, खुल्या कोर्टात माझे विचार मांडण्याची माझी उत्कट इच्छा होती. माझ्या कृतीच्या नैतिक बाजूबद्दलचा माझा आत्मविश्वास सर्व बाजूंनी झालेल्या टीकेमुळेही डळमळीत झालेला नाही.
यात काहीच शंका नाही की इतिहासाचे प्रामाणिक अभ्यासक माझ्या कृतीचे मूल्यमापन करतील आणि भविष्यात त्याचे खरे महत्व शोधतील.”
नथुराम गोडसे
हे आहे नथुराम गोडसेने न्यायालयात केलेलं निवेदन, अर्थात संक्षिप्त स्वरूपात, ज्यात त्याने 'आपण गांधींना का मारलं' याची कारणमीमांसा केली होती.
आजही पुण्यातील शिवाजीनगर येथील अजिंक्य डेव्हलपर्सच्या कार्यालयात नथुरामच्या अस्थी काचेच्या डब्यात जतन करून ठेवल्या आहेत. तसेच गोडसेचे काही कपडे आणि हस्तलिखित नोट्सही येथे ठेवण्यात आल्या आहेत. नथुराम गोडसे यांचे भाऊ गोपाळ गोडसे यांचा नातू अजिंक्य गोडसे यांनी सांगितले की, "या-
अस्थीचे सिंधू नदीत विसर्जन केले जाईल आणि जेव्हा त्यांचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हाच होईल." अजिंक्य म्हणाला, "ही माझ्या आजोबाची शेवटची इच्छा होती, याला अनेक पिढ्या लागतील, पण मला आशा आहे की ती एक दिवस पूर्ण होईल."
✍️ -राजेंद्र म्हात्रे
संदर्भ:- scroll.in

جاري تحميل الاقتراحات...