आयुष्य हरलेला माणूस
आयुष्य हरलेला माणूस

@Lostman4ever

6 تغريدة 22 قراءة May 11, 2023
…६८५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मंगूडयाच्या गावकुसाची भिंत ढासळली अन त्यात पंढरपूरसह पंचक्रोशीतून बांधकामासाठी पकडून आणलले वेठबिगार मजूर त्याखाली चिरडून मरण पावले, त्यातील इतरांच्या सोबत एक मजूर होता चोखामेळा. आयुष्यभर कायम अपमान वाट्याला आलेला, नाकारला गेलेला...
खालच्या (१/६)
जातीचा म्हणून येथील कर्मठ धर्माच्या ठेकेदारानी या प्रतिभावंत संत कवीला दर्शनासाठी मंदिराच्या पायऱ्या चढू दिल्या नाहीत. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विठू माऊलीला डोळे भरून पाहत दर्शन घेण्याच स्वप्न उराशी बाळगून आयुष्य जगणारा चोखामेळा त्या दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला…(२/६)
मला नेहमी वाटते चोखोबाला त्या दगड मातीच्या कोसळत्या भिंतीखाली खाली मरताना जेवढया वेदना झाल्या नसतील तेवढया वेदना बडव्यांचा मार खाताना झाल्या असतील,
"धाव घाली विठू……"
अशी आर्त किंकाळी नक्कीच जास्त वेदनादायी असेल, चोखोबाच त्यावेळीच वेदनेने ओरडणे पाहून सोयराबाई, कर्ममेळा (३/६)
यांना सुद्धा किती वेदन होत असतील, त्यांच्या वेदनाना कुणीच वाली नसावा…
हे भयंकर आहे…
चोखोबांच्या मृत्यूनंतर आज जवळजवळ ७०० वर्षांनंतर सुद्धा जातीपातींच्या खोट्या अभिमानात काही जण मग्न आहेत.
संत चोखोबांच्या स्मृतीना अभिवादन करुन फक्त भागणारे नाही, तर या जातीय चिखलातून बाहेर (४/६)
पडायला सुरुवात तर करायला हवी, जात व्यवहारातून गेली, तशीच ती मनामनातून ही नाहीशी व्हायला हवी…
चोखोबाच काय मेल्या नंतरही त्याच्या अस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या!! पंढरपूरला जाणारा प्रत्येक निरपेक्ष मनाचा वारकरी माझ्यालेखी चोखोबांच…त्या प्रत्येकात मी माझ्या चोखोबाला शोधत (५/६)
राहतो…त्यांची सेवा करतांना मला चोखोबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते…
चोखोबांच्या आवडीचे काम आपणही करत राहूया! (६/६)
#चोखोबा_ते_तुकोबा
#एक_वारी_समतेची
#संतचोखामेळा
#स्मृतिदिन
@Shirish36205110 @AjaatShatrruu @GaneshSurase3 @garg_trupti @Me_Dhulekar @THE_WALAMBA @Kailassuryawan

جاري تحميل الاقتراحات...