Rajesh K🚩हिंदु तितुका मेळवावा🚩(मोदी का परिवार )
Rajesh K🚩हिंदु तितुका मेळवावा🚩(मोदी का परिवार )

@RajeshKaprekar

7 تغريدة 6 قراءة Apr 14, 2023
"तुटक्या नाकाचा कोसाजी आणि प्लास्टिक सर्जरीचा शोध"
प्लास्टिक सर्जरी हि भारतात जन्माला आली आणि ती सर्रास पणे वापरली जात होती या विषयी एक रोचक गोष्ट वाचनात आली
१७९४ साली तिसरे म्हैसूर युद्ध ब्रिटिश आणि टिपू मध्ये झाले त्याप्रसंगी टिपूच्या सैनिकांनी ब्रिटिशांचा अन्नसामग्री घेऊन
जाणारा एक ट्रक पकडला.
कोसाजी नावाचा मराठी माणूस हा ट्रक चालवत होता.
क्रूर टिपूने त्याचे नाक कापले आणि युद्ध संपल्यावर त्याला सोडले
एक ब्रिटिश डॉक्टर त्याला वैद्यकीय उपचार द्यायला आला पण कोसाजीने त्याची मदत नाकारली आणि एक स्थानिक कुमार नामक पारंपरिक वैद्यकी करणाऱ्या माणसाकडे गेला.
ब्रिटिशांनी त्याची मस्करी केली कि तो आधुनिक डॉक्टरकडे न जाता एका वैदूकडे जातो आहे
कोसाजी म्हणाला हा वैदूच माझे तुटके नाक परत बसवेल कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही हा स्थानिक वैदू वीट भट्टीचे काम करायचा त्याने कोसाजीच्या कपाळावरून थोडीशी त्वचा काढली आणि ती तुटक्या नाकाला जोडली
कोसाजीचे नाक पहिल्यासारखे झालेच पण त्याच्या कपाळावरची त्वचा हि परत आली ब्रिटिश डॉक्टरने हा चमत्कार पाहिला आणि ह्या घटनेचे चित्र काढून लंडन ला पाठवले ते पाहून जोसेफ कॉन्स्टंटाइन कारपु हा भारतात आला वैदू कुमार बरोबर राहिला हि शल्यकला शिकला आणि लंडनला परत गेला
त्याने लंडनला जाऊन कथितदृष्ट्या जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी केली ते वर्ष होते १८१४
हे ऑपरेशन कारपू ऑपरेशन म्हणून ओळखले गेले
पण भारतातल्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या वैदू कुमारला हि शल्यचिकीत्सा कशी जमली तर त्याची पाळेमुळे जातात २५०० वर्षे
पूर्वी जेव्हा सुश्रुत या शल्यचिकीत्सकाने जगाला प्लास्टिक सर्जरी ची देणगी दिली त्याचा सुश्रुत संहिता ग्रन्थ त्यासाठीच प्रसिद्ध आहे
या नाक जोडलेल्या कोसाजीचे चित्र आज हि ब्रिटिश म्युझियम मध्ये पहायला मिळते
आधुनिक विज्ञानासाठी नाकाने कांदे सोलणाऱ्या पाश्चात्य जगाला तुटक्या नाकाचा कोसाजी आणि वैदू कुमार हि २५०० वर्षांपूर्वीच हे सुश्रुताचे ज्ञान आत्मसात केलेल्या भारताने मारलेली चपराक आहे

جاري تحميل الاقتراحات...