आशीष माळी
आशीष माळी

@Garjana206

19 تغريدة 8 قراءة Apr 09, 2023
दोस्त खानाला आणि अब्दाली ला नायक मानणाऱ्या अफगाणिस्तानला तुम्ही भारताचे एकेकाळचे भाग असे म्हटलेले आवडत नसले तरी कडवे सत्य त्यांना स्वीकारावेच लागेल असे अनेक पुरावे आहेत. कंधार शहराचे नाव गांधार या प्राचीन राज्यावरून पडले आहे ज्याचा वेद आणि त्यानंतरच्या हिंदू साहित्यात उल्लेख
आहे.अफगाणिस्तान आज जरी वेगळा असला तरी इतिहास मध्ये अनेक पुरावे आहेत ,जे सांगतात कि हा भारताचा एकेकाळी भाग होते. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे ६ व्या शतकात बामियान मध्ये बांधलेल्या बुद्ध मुर्त्या ज्या तालिबानने २००१ मध्ये नष्ट केल्या. बुद्धाच्या स्ट्रक्चरल घटकांच्या कार्बन
डेटिंगने हे निश्चित केले होते की लहान मूर्ती (125 फूट) "ईस्टर्न बुद्ध इसवीसन ५७० मध्ये आणि मोठी मूर्ती म्हणजे "वेस्टर्न बुद्ध" 55 मीटर (180 फूट) इसवीसन ६१८ मध्ये बांधले गेले होते.या तुर्क शाही काळात गार्देझ गणपतीची मूर्ती हल्ली काबुल मध्ये सापडली en.wikipedia.org
बामयन हे जुन्या प्राचीन  सिल्क रोडवर आहे, जो हिंदू कुश पर्वत प्रदेशातून जातो,  सिल्क रोड ऐतिहासिकदृष्ट्या चीनच्या बाजारांना पाश्चिमात्य जगाशी जोडणारा एक जमीन मार्ग आहे. हे अनेक बौद्ध मठांचे ठिकाण होते,
आणि धर्म, तत्त्वज्ञान आणि कला यांचे एक संपन्न केंद्र होते. मठांमधील भिक्षू बामियान कड्यांच्या बाजूला कोरलेल्या छोट्या लेण्यांमध्ये संन्यासी म्हणून राहत होते.अफगाणिस्तान एकेकाळी गांधार म्हणून ओळखला जात असे.जर महाभारत वर विश्वास नसेल तर येझुडी वंशाच्या कुशाण घराणे भारतावर काही दशके
राज्य केले .त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला . मथुरा त्यांची राजधानी आणि त्यांचे राज्य अफगाणिस्तान पर्यंत पसरले होते . विमा काडपिशे चा मुलगा कनिष्क विशेष पराक्रमी निघाला . राजा कनिष्कचा पुतळा - जो आता अफगाणिस्तान आहे त्या काबुल संग्रहालयाच्या दारामध्ये उभा होता. या पुतळ्याचा डोके
आणि काही भाग आधीच नष्ट झालेला उरलेला भाग तालिबान्यांनी २००३ मध्ये नष्ट केला theguardian.com
अफगाणिस्तानचा शेवटचा हिंदू शासक हिंदू शाही राजवंश होता. en.wikipedia.org. खलिफा अल-मामुनच्या नेतृत्वाखालील अब्बासीदांनी इसवीसन ८१५  मध्ये तुर्क शाही राज्याचा पराभव केला. या पराभवानंतर, तुर्किक शाहला इस्लाम स्वीकारावा लागला  . त्यांना वर्षाला १५ लाख दिनार खंडणी द्यावी
लागायची आणि याच आर्थिक विवंचनेत हे तुर्क शाही संपले . यामुळे दुसऱ्या काबुल शाही घराण्याला मार्ग मिळाला. या नवीन राजवटीला अरबांनी "हिंदू शाही" म्हटले. याचा उल्लेख अल  मसुदी या प्रवाशाने ९ व्या शतकात लिहून ठेवले नाहीतर या विषयी आपल्याला कधीच माहिती नसती . या हिंदू शाहीने अनेक
वर्ष अफगाणिस्तानला अरबी आक्रमणापासून थोपवले पण दुर्दैव म्हणजे या वीरांची नावे अजून हि माहित नाही .तुर्क आणि हिंदू शाहींनी 670 ते 1000 पर्यंत अफगाणिस्तानवर राज्य केले ते त्यापैकी एक आहेत ज्यांनी 350 वर्षे अरबला पराभूत केलेमहाराणा प्रताप यांचे प्रख्यात पूर्वज बप्पा रावल यांनी
इसवीसन ७१२ मध्ये गझनीला अरबांपासून परत घेतले आणि आपल्या पुतण्याला अफगाणिस्तानचा राजा म्हणून मुकुट घातला. त्यामुळे होय. इसवीसन ८३५ ई.स.मध्ये राजपूतांचे राज्य होते.त्याच काळात अफगाणिस्तानात सापडलेले एक राजपुतांचे दैवत एकमुखलिंगा मूर्ती सापडली जी आता न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन
म्युझियम ऑफ आर्टमध्ये विसावली आहे.metmuseum.org.तुर्क शाही लोक जरी भारतीय वंशाचे नसले तरी त्यांच्यावर भारताचा पुष्कळ प्रभाव होता . एका चिनी प्रवाशी हुई चाव en.wikipedia.org याने लिहून ठेवले कि हे तुर्क राजे स्वतःला ब्राम्हण समजतात विशेष म्हणजे ते बुद्ध
धर्माचे अनुयायी होते.मुघलांच्या काळात काबुल आणि कंदाहार हे मुघलांचे अनेक प्रमुख प्रांतापैकी एक होते . इथे इराणी आणि इतर टोळ्यांच्या आक्रमण मुळे इथे जायला कोणी तयार नसायचे . औरंगझेब ने मराठ्यांकडून मार खाण्याअगोदर इथे अफगाणिस्तान मध्ये काही युद्ध हरला होते. शिवाजी महाराजांचा
काळात मराठ्यांचा सेनापती नेतोजी पालकर मुघलांच्या तावडीत सापडून जेंव्हा कुलीखान झाला औरंगझेब ने नेतोजी पालकर याना याच प्रांतात पाठवले होते . मराठ्यांनी पण अटक पार झेंडा लावला.नंतरच्या काळात अफगाणिस्तान ची इंग्रज बरोबर ३ युद्धे झाली पण इंग्रजांना यश नाही आले मागच्या काही दशकात
रशिय,अमेरिकाला यश नाही मिळाले .रंजितसिंग ने काही भागात १८ व्य शतकात ताबा मिळवला पण शिखांनी नंतर लगेच गमावला भारतीय राजांनी महाभारत काळापासून मूल्य आणि नैतिकतेचे पालन केले,जेव्हा ते अरब आक्रमणकर्त्यांशी लढले तेव्हा ते कमकुवत बिंदू बनले.अबू जैद (इसवीसन ८००-९०० आसपास अरब प्रवासी).
तिसऱ्या शतकातील सापडलेल्या मुर्त्या
(अफगाणिस्तान)
कंधार हा राजपुतांचा देश आहे"
अल मसुदी (इसवीसन ९३५)
याच मासुदिने भारतातील खगोलशास्त्र ज्ञान अरब कडे नेले. आज अरब जे स्वतःला त्याकाळातील खगोलशास्त्र विशेष माहिती असल्याचे टेंभा मिरवतात त्या मागे खर तर अल मसुदिने इथून नेलेले ज्ञान च कारणीभूत ठरते.
इसवीसन पूर्व ४ त्या शतकात (२४०० वर्षांपूर्वी) इथे ग्रीक भाषेतील शिल्पे आणि लेख आढळतात . हे सर्व लेख फक्त अशोक राजा विषयी आहे .
कंधार हा राजपुतांचा देश आहे"
अल मसुदी (इसवीसन ९३५)

جاري تحميل الاقتراحات...