Krishna Sunil Varpe
Krishna Sunil Varpe

@VarpeKrishna

7 تغريدة 1 قراءة May 13, 2023
आयुष्यात आपण खूप काही गोष्टी ठरवतो. काही पूर्ण होतात मात्र बऱ्याचदा ठरवूनही काही गोष्टी पूर्ण होत नाहीत. नुकतंच वाचन करत असताना मला रॅाबिन शर्मा या लेखकाचा एक फॅार्म्युला सापडला, जो आपल्याला आपलं रखडलेलं काम/ध्येय गाठण्यासाठी मदत करतो.
-फक्त संपूर्ण थ्रेड काळजीपूर्वक वाचा……
रॅाबिन शर्मा यांनी ‘द 5AM क्लब’ नावाचं एक पुस्तक लिहिलंय. आपल्या ध्येयापासून आपलं लक्ष विचलित होऊ नये आणि आयुष्यात आपण भरपूर यश मिळवावं, यासाठी त्यांनी या पुस्तकात खूप चांगले फॅार्म्युले सांगितले आहेत.
त्यातलाच एक सर्वात प्रसिद्ध असलेला फॅार्म्युला म्हणजे 90/90/1 फॅार्म्युला…
तुमचं सर्वात महत्त्वाचं काम,
तुमचं सर्वात महत्त्वाचं ध्येय…
जे तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं…
जे तुमच्यासाठी सर्वोच्चस्थानी असेल…
जे तुमच्यासाठी सर्वात मोठं असेल…
त्याला नंबर 1 बनवा…
तुमच्या दिवसाच्या सुरुवातीची 90 मिनिटं तुम्ही, या तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवा.
कोणत्याही परिस्थितीत ही 90 मिनिटं फक्त याच कामासाठी वापरली जायला हवीत.
कुठलीही हयगय नको, चालढकल नको, दिरंगाई नको… एकदा पक्कं ठरवून टाका…
हे सर्व सलग 90 दिवस करायचं आहे,
एकही दिवस स्कीप करायचा नाही,
की कोणता बहाणा शोधायचा नाही.
हेच सर्वात अवघड आहे.
कारण एक दोन दिवस तर कुणीही करु शकतं,
पण सलग 90 दिवस देणं सोपं नव्हे.
…मात्र तुम्हाला जर हे जमलं…
तर मात्र कमाल-कमाल-कमाल होऊ शकते…
वरील दिलेल्या सर्व गोष्टी काटेकोरपणे केल्या तर 3 महिन्यांनंतर- तुम्ही तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कामासाठी एकूण 135 तास दिलेले असतील…
हा खूप पुरेसा वेळ आहेः
-काहीतरी नवीन शिकण्यासाठी…
-एखादं रखडलेलं काम पूर्ण करण्यासाठी…
-पैशाचा नवा मार्ग तयार करण्यासाठी…
या किंवा अशाच…
काहीही असो…
आयुष्यात 90/90/1 हा फॅार्म्युला कधी विसरु नका. तुम्हाला या फॅार्म्युल्याची मदत व्हावी हीच इच्छा…
थ्रेड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शिवाय रिट्विट करायला विसरु नका. अशाच चांगल्या माहितीसाठी मला फॅालो करा.
-अभिनंदन!!! तुम्ही एक चांगला थ्रेड वाचला आहे.

جاري تحميل الاقتراحات...