Kalpesh | कल्पेश
Kalpesh | कल्पेश

@Atarangi_Kp

8 تغريدة 135 قراءة Mar 28, 2023
आधार कार्ड १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक जुने आहे?
तर वेळीच आधार कार्ड अपडेट करा, विनाकारण च्या चार्जेस / लेट फी पासून वाचा !!
पत्ता आणि नाव यात काहीही बदल नसेल तरीसुद्धा अपडेट करणे आहे बंधनकारक !!
प्रोसेस साठी पूर्ण थ्रेड नीट वाचा 👇
🧵 १/n
#मराठी #Aadhar #आधार
आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी फेब्रुवारी २०२३ मध्ये युआडीएआयने महत्वाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून एजन्सीने केली, यामध्ये त्यांनी म्हटलंय कि तुमचं कार्ड (Issue Date) जर १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला तुमचा पत्ता आणि ओळख अपडेट करावी लागेल म्हणजेच त्यासंबंधीचे
डॉक्यूमेंट्स वापरकर्त्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने पुन्हा सबमिट करावे लागतील.
जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स अपडेट करता तर तुम्हाला ₹.५० आणि ऑनलाईन करता तर ₹.२५ सेवा शुल्क भरावे लागते, पण आनंदाची गोष्ट हि कि ऑनलाईन सेवा १४ जून २०२३ पर्यंत पूर्ण मोफत राहील.
प्रक्रिया
१. सर्वप्रथम आधार कार्ड (UIDAI) च्या वेबसाईट किंवा अँप वर जा.
२. लॉगिन वर क्लीक करून , आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाकून SEND OTP वर क्लीक करा.
३. तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक सहा अंकी OTP मिळेल तो टाकून लॉगिन करा.👇
४. पुढच्या पेज वर सर्वात शेवटी डॉक्युमेंट अपडेट चा पर्याय तुम्हाला दिसेल.
५. पुढे दोन पेज वर कोणते डॉक्युमेंट्स हवे हे येईल ते वाचून त्यांना नेक्स्ट करा.
६. पुढे तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता दिसेल तो तपासून टिक करून नेक्स्ट करा.👇
७. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला येईल तिथे JPG, PNG आणि PDF फॉरमॅट मध्ये ५ MB पर्यंत फाईल तुम्ही अपलोड करू शकता.
८. आयडी प्रूफ आणि पत्ता यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील याची पूर्ण लिस्ट इथे दिसेल त्यातील कोणताही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता.
९. जस के तुम्ही पॅनकार्ड सिलेक्ट केलं तर ते अपलोड वर क्लिक करून अगोदर काढलेला फोटो तुम्ही टाकू शकता किंवा कॅमेरा पर्याय घेऊन फोटो काढू शकता.
१०. अश्या प्रकारे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करा.
नंतर ओके वर क्लिक करून सबमिट करा.
त्यानंतर एक एक्नॉलेजमेन्ट रिसिप्ट मिळेल ती
डाउनलोड करून ठेवा, त्याखाली तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्टेज ला आहे हे दिसेल. ७ दिवसांत तुमचे डॉक्युमेंट'स व्हेरिफाय केले जातात.
लींक साठी बायो चेक करा / गुगल करा.🧐
टिप : सेवा मोफत आहे तोपर्यंत करून घ्या नंतर सेवा शुल्क आणि लेट फी लागली तर ओरडू नका.
🧵८/८
#AdhaarCard #Update

جاري تحميل الاقتراحات...