सर्वप्रथम, एक गोष्ट मला आवडली! त्यांनी लोकांना 'दक्ष' राहण्याची सूचना दिली. आणि म्हणूनच एक कर्तव्यदक्ष, मराठी, मुंबईकर नागरिक या नात्याने मला त्यांनाही 'दक्ष' राहण्याचा सल्ला द्यायचा मोह आवरता आलेला नाही. त्यांनी 'दक्ष' का राहावं ते सांगतो..
राज ठाकरे यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर दादर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात आजही मोठ्या प्रमाणात हफ्ता घेऊन फुटपाथ भाड्याने वाटला जात आहे, ज्यात बहुतांश बंगाली (की बांगलादेशी?) मुसलमान आहेत. आणि, हे राज ठाकरे यांना माहीत आहे..
हफ्तेखोरांचा म्होरक्या जमाल शेख याचे नाव अग्रस्थानी असून त्याचे भागीदार शमशुद्दीन व सिकंदर यांच्याकडून स्थानिक मराठी फेरीवाल्यांना टार्गेट करून त्यांना हाकलून त्या जागी बंगाली मुस्लिम फेरीवाले बसवण्याचे काम करतात, आज दादरमध्ये स्टेशन परिसरात 80% फेरीवाले बंगाली मुसलमान आहेत..
याच हफ्तेखोरांमध्ये स्थानिकांच्या तोंडून मनसेच्या 'अभिषेक गुप्ता' या वॉर्ड अध्यक्षाचे नाव सातत्याने येते. हा 'भैय्या' वॉर्ड अध्यक्ष अभिषेक गुप्ता महिन्याला लाखों रुपयांच्या उलाढालीत शामिल असल्याचे स्थानिक सांगतात, याबाबत राज ठाकरे यांना माहिती नसेल? अशक्य..
या ठिकाणी हफ्तेखोरीमुक्त दादर करण्यासाठी भाजपच्या अक्षता तेंडुलकर व जितेंद्र राऊत यांनी शमशुद्दीनवर जोरदार प्रहार केल्यानंतर मुख्य आरोपी जमाल हा राज ठाकरे यांच्याच बंगल्यावर गेला होता याबाबत राज ठाकरे यांना माहीत नसेल? अशक्य..
मनसेचे पदाधिकारी स्वप्निल कारभारी यांच्या दादरमध्ये चितळे एक्स्प्रेस शेजारी फुटपाथवर लागणाऱ्या धंद्यावर गरीब, गरजवंत मराठी बेरोजगार नाहीत तर वर नमूद केलेलेच मुसलमान कामगार आहेत याची कल्पना राज ठाकरे यांना नसेल? अशक्य..
'कृष्णकुंज' परिसरातच स्थानिकांचा प्रचंड विरोध असतानाही ठिकठिकाणी बेकायदेशीर श्वारमा विक्रीचे प्रमाण वाढले आहे, ज्यावर भाजप लढा देत आहे, ते राज ठाकरे यांना माहीत नसेल? हे श्वारमा विक्रेते कोण आहेत त्यांना माहीत नाही? अशक्य..
भाजपच्या अक्षता तेंडुलकर दादर सारख्या परिसरात वाढत्या बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात व त्यांना अभय देणाऱ्या पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात मागील तीन वर्षांपासून लढा देत असताना मनसे नेमकी त्याच मुद्द्यावर काय करत होती हे राज ठाकरे यांना माहीत नसेल? अशक्य..
भाजपच्या आक्रमक कृतीमुळे जमालला रंगेहाथ खंडणी घेताना अटक झाली, पालिकेचे अधिकारी राजन कांबळे यांची बदली झाली, शमशुद्दीनला तर अक्षता तेंडुलकर या वाघिणीने भररस्त्यात चोप दिला, पालिकेचे लिपिक चंद्रकांत वाघमारे यांच्या विरोधात अजूनही लढा सुरू आहे हे राज ठाकरे यांना माहीत नाही? अशक्य..
माहिम चर्च बाहेर दर बुधवारी सर्व नियमांना फाट्यावर मारून संपूर्ण फुटपाथवर शांतिप्रिय लोकांचे मार्केट भरते, कोट्यवधीची उलाढाल होते, प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते आणि त्यातून 'कट' कोणाला मिळतो हे राज ठाकरे यांना माहीत नाही? अशक्य..
नंतर खंडणीखोरीत अटक झालेला जमाल जर राज ठाकरे यांच्या घरापर्यंत पोचत होता आणि वहिनी साहेबांना भेटत होता (ज्याचा फोटो जमालने FB वर टाकला होता), तर सगळ्यात आधी कोणी 'दक्ष' राहण्याची गरज असेल तर ती स्वतः राज ठाकरे यांनी! लोकांना ब्रम्हज्ञान देणारे राज ठाकरे 'कोरडे पाषाण'? अशक्य..
मग हे चाललंय तरी काय? 'दुपारी उठायचं, संध्याकाळी भाषण ठोकायचं' हे पार्ट-टाईम राजकारणी करू शकतो. पण, खरा गेम काय आहे? 'लाव रे विडिओ' मधून कंत्राटी प्रचार करून झाल्यावर, आता जुनं कंत्राट 'रिनिव्ह' व्हावं किंवा दुसरीकडून कंत्राट मिळावं या 'व्हॅक्युम' मध्ये केलेलं हे भाषण होतं..
'मराठी', 'काँग्रेस', 'राष्ट्रवादी', 'मविआच्या अडीच वर्षां'वर चकार शब्द नव्हता. होता? 'जावेद अखतर सारखे मुसलमान मला पाहिजेत' म्हणत 'गुड मुस्लिम-बॅड मुस्लिम' थोतांड पुढे रेटलं. यांना अब्दुल कलाम नाही आठवले, ना त्यांच्या क्लिप दिसल्या! सर्जरी नंतर डॉ.ऑर्थो वापर जास्त झालाय वाटतं..
बरं, इतकी वर्ष कोणीही बोट न लावलेलं प्रतापगडावरील थडगं ज्यांनी भुईसपाट केलं, त्या DF-शिंदेना उपदेश दिले आणि वर एखाद-दुसरं माहीम-सांगली प्रकरण काढून हिंदुत्ववाद्यांनाच 'ज्वलंत कॉस्मेटिक हिंदुत्व' च्या ग्राईप-वॉटरचे डोझ पाजले! 'ज्वलंत कॉस्मेटिक हिंदुत्व' हाच तो कालचा 3D चित्रपट..
'ज्वलंत', कारण वक्तृत्वाच्या जोरावर सनसनाटी आणि 'फोबिआ' दोन्ही निर्माण करतात, 'कॉस्मेटिक' कारण मूळ मुद्दा आला की यांचं घर असलेल्या दादरमध्ये काय चाललंय तिकडे कानाडोळा करतात, 'हिंदुत्व' कारण कोणाची मते फोडायची आहेत यांना 'लाव रे विडिओ'च्या वेळीही ठाऊक होतं आणि आताही नीट ठाऊक आहे..
वर दिलेली माहिती : माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त मुंबई (कायदा व्यवस्था), पोलिस सहआयुक्त(परिमंडळ 4 व 5), महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे भाजपने दाखल केलेल्या तक्रारींमधील मजकुरात आहे. हे राज ठाकरे यांना माहीत नसेल? अशक्य!
एकूणच काय, तर कालचा राज ठाकरे यांचा 3D चित्रपट पुढे 'इकडून नाही तर तिकडून' कुठून तरी एखादं पॅकेज कन्फर्म व्हावं यासाठी हिंदुत्वाची शाल पांघरून केलेला संतुलित आटापिटा होता, 'ये रॉन्ग नम्बर है' म्हणावा असा एक स्टंट होता. सावधान रहे, सतर्क रहे!
गोंधळलेल्या हिंदुत्ववाद्यांना सेक्युलर जमातीच्या दावणीला बांधायचा प्लॅन माहीम, सांगली प्रकरणावर ताबडतोब कारवाई करून DF-शिंदे यांनी फेल केला. जड अंतकरणाने का होईना, साहेबांकडे दुपारी झोपेतून उठल्यावर कारवाईचे स्वागत करण्याशिवाय पर्याय नव्हता.
आता? आता गोल-पोस्ट बदलतील. वेट & वॉच!
आता? आता गोल-पोस्ट बदलतील. वेट & वॉच!
جاري تحميل الاقتراحات...