महाराष्ट्रात हल्ली नियमितपणे अवकाळी पाऊस पडतो, शेतीचं मोठं नुकसान होतं, शहरांत पूर येतो. अवकाळी पावसाला आता ‘नवं नॉर्मल’ म्हणून स्वीकारण्याची वेळ आली आहे का?
या क्षेत्रातले तज्ज्ञ प्रा. डॅन श्रॅग म्हणतात की अवेळी पाऊस, ढगफुटी वगैरे आता अटळ आहेत, किंबहुना वाढत जाणार आहेत. (१/१०)
या क्षेत्रातले तज्ज्ञ प्रा. डॅन श्रॅग म्हणतात की अवेळी पाऊस, ढगफुटी वगैरे आता अटळ आहेत, किंबहुना वाढत जाणार आहेत. (१/१०)
मी करत असलेल्या फेलोशिपमध्ये विविध क्षेत्रांतल्या तज्ज्ञांना ऐकण्याची/भेटण्याची संधी मिळते. प्रा. श्रॅग यांचे काही लेक्चर्स मी ऐकले आणि त्यांचे काही प्रबंध वाचले.
ते म्हणतात की कार्बन संकट टाळण्याची वेळ निघून गेली आहे आणि आता परिणामांना तोंड देण्यावाचून पर्याय नाही. (२/१०)
ते म्हणतात की कार्बन संकट टाळण्याची वेळ निघून गेली आहे आणि आता परिणामांना तोंड देण्यावाचून पर्याय नाही. (२/१०)
राष्ट्राध्यक्ष ओबामांनी हवामान बदलांवर उपाय सुचवणारी जी समिती स्थापन केली होती, त्यात प्रा.श्रॅग होते. या समितीने सांगितलं होतं की कार्बन उत्सर्जन कमी करणे (mitigation) हा आता उपायांचा दुय्यम भाग असावा. प्राथमिकता द्यावी ती परिणामांना सामोरे जाण्याची तयारीला (adaptation). (३/१०)
या समितीच्या अहवालाची लिंक खाली देत आहे. प्रा. श्रॅग म्हणतात की mitigation बद्दल राजकीय नेते आणि हवामान कार्यकर्ते बोलतात कारण त्यांना निराशादायक वातावरण निर्माण होऊ द्यायचं नाहीये. पण श्रॅग म्हणतात की भविष्य फारसं आशादायी नाहीये, हे वास्तव आहे. (४/१०)
obamawhitehouse.archives.gov
obamawhitehouse.archives.gov
त्यांचं म्हणणं पटतं कारण पॅरिस करारानुसार जगातलं कार्बन उत्सर्जन २०२५च्या आधी सर्वोच्च बिंदू गाठून मग घटायला हवं. तसं होण्याची सुतराम शक्यता दिसत नाहीये. जगातल्या सगळ्या मोठ्या देशांमधलं उत्सर्जन वाढतंच चाललंय. (तक्ता - iea.org) (५/१०)
unfccc.int.
unfccc.int.
गेल्या ४०० वर्षांत सुमारे सव्वा अंशाने सरासरी तापमान वाढ झाली आहे. त्यामुळे हवामानाचं नाजुक संतुलन ढासळून अतिपाऊस, अतिदुष्काळ, अतिउन्हाळा अशा टोकाच्या घटनांची वारंवारता वाढत आहे. अनिश्चितता (अकाळी) वाढत आहे. याचा दक्षिण आशियाला विशेष फटका बसणार आहे. (६/१०)
nyti.ms
nyti.ms
जाणकार सांगतात की सध्या ज्या गतीने कार्बन उत्सर्जन वाढतंय, ते पाहता पृथ्वीचं तापमान ३-४ अंशानी वाढू शकतं. त्यामुळे पृथ्वीवर येत्या ५०-१०० वर्षांत मोठा अनर्थ ओढावू शकतो. त्याची सुरुवात झाली आहे. निकट भविष्यात काय घडू शकेल, याचा अभ्यास सुरू आहे. (७/१०)
economist.com
economist.com
हा थ्रेड वाचून तुम्हाला निराश वाटू शकतं. पण हे सगळं लिहिण्याचा हेतू हा आहे की मराठी लोकांना कळालया हवं की पुढे काय वाढून ठेवलं आहे. आणि लोकांनी-सरकारांनी adaptation म्हणजे तीव्र होत जाणाऱ्या हवामान संकटांना समोरं जाण्याची जय्यत तयारी सुरू करायला हवी. (८/१०)
Adaptation - म्हणजे बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सर्व सरकारांनी पावलं उचलली पाहिजेत असं जागतिक आर्थिक संस्था सांगत आहेत. भारताने पण त्या दिशेने काही पावलं उचलली आहेत. पण ती अधिक वेगाने उचलावी लागतील, असं दिसतंय. (९/१०)
imf.org
imf.org
यापुढे महाराष्ट्रांतल्या शहरांत पूर येत राहणार, पश्चिम घाटांत भरपूर दरडी कोसळणार, अवकाळी पाऊस पडत राहणार, मुंबई-कोकणात चक्रीवादळं येत राहणार. पण या गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी जर विचारपूर्वक रणनीती आखली तर नुसकान नक्कीच कमी करता येईल. (१०/१०)
جاري تحميل الاقتراحات...