'सिलॅबस'च्या बाहेरच्या गुगली टाकण्यात काका तरबेज आहेत. अस्तित्वात नसलेले नवनवीन मुद्दे 'मॅन्युफॅक्चर' करून सरकारला कसे घेरता येईल, यात काकांचा हातखंडाच आहे. असो!
ही राजकीय पोस्ट नसल्याने काकांचं कौतुक इथेच थांबवतो आणि थेट मुद्द्यावर येतो..(१)
ही राजकीय पोस्ट नसल्याने काकांचं कौतुक इथेच थांबवतो आणि थेट मुद्द्यावर येतो..(१)
राज्यात सध्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरु आहेत. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी अभ्यास करुन या परीक्षांना सामोरे जात आहेत. दुसरीकडे पूर्ण तयारी करुनही शिक्षण मंडळ परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे..(२)
अशात धाराशिवच्या एका शाळेतील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चुकीचा दहावीचा पेपर देण्यात आला. मराठी माध्यमांच्या मुलांना CBSC पॅटर्नचा इंग्रजीचा पेपर देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी चूक लक्षात आणून दिल्यावरही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बळजबरीने चुकीचाच पेपर लिहायला लावला..(३)
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा सर्व प्रकार त्यांच्या पालकांना सांगितला. यानंतर संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्रावरच तळ ठोकला व प्रशासनाकडे कारवाई करण्याची व पुन्हा परीक्षा घेण्याची त्यांनी मागणी केली आहे.. (४)
आता यात तुम्हीच बघा, मी थ्रेडच्या सुरूवातीला म्हटल्या प्रमाणे 'सिलॅबस'च्या बाहेरची गुगली टाकली विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांचे पालक चढत आहेत शिंदे सरकार व प्रशासनावर आणि विरोधकांसाठी अस्तित्वातच नसलेला मुद्दा 'मॅन्युफॅक्चर' झाला..(५)
جاري تحميل الاقتراحات...