Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

12 تغريدة 5 قراءة Mar 07, 2023
#Thread: शनिवारी काही कामानिमित्त रत्नागिरीला जाण्याचा योग आला. पुण्याहून प्रस्थान करण्याच्या आधीच ठरवले होते की काहीही झाले तरी दोन ठिकाणी जाऊन डोकं ठेवून यायचं.
रत्नागिरी - या शहराचे २० व्या व २१ व्या शतकातील भारताच्या राजकाराणावर तसेच समाजकारणावर अनेक उपकार आहेत.
१/१२
होय. कारण रत्नागिरी ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमि आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जात्युच्छेदक कार्याची समरभूमि.
२३ जुलै, १८५६ रोजी आजच्या टिळक आळीतील या वाड्यात जन्माला आलेला केशव गंगाधर टिळक पुढे जाऊन तत्कालीन भारताच्या…
२/१२
राजकारणातील सर्वोच्च नेता होईल असा कोणी विचार तरी केला असेल का? पण स्वकर्तृत्वाच्या व बुद्धिमतेच्या जोरावर केशव तथा बाळ ‘लोकमान्य’ झाले!
गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या भारतीयांना भारतीयत्वाची जाणीव करुन देऊन पुन्हा एकदा स्वराज्याची आठवण लोकमान्य टिळकांनी करुन दिली.
३/१२
नुसती आठवणच नव्हे तर त्या स्वराज्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. कोणी त्यांना लोकमान्य म्हणत असे तर कोणी टिळक महाराज.
मोहनदास गांधी लोकमान्यांना ‘Maker of Modern India’ असं म्हणत तर जवाहरलाल नेहरु स्वतःचा अभिमानाने ‘Tilkaite’ (टिळकवादी) उल्लेख करत असत.
४/१२
“माझ्यावर कितीही सकटं आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर मी पाय ठेवून उभा राहीन” - लोकमान्य चित्रपटातील हे वाक्य ऐकताना अंगावर शहारे येतात.
लोकमान्य खरंच असं म्हणाले होते की नाही हे मला माहीत नाही. पण लोकमान्यांच्या संपूर्ण आयुष्याकडे बघितले की कळून येते - …
५/१२
…या माणसाने कधी हार मानलीच नाही. प्रत्येक संकटातून मार्ग काढून आपली वाटचाल अविरतपणे चालूच ठेवली.
लोकमान्यांच्या पश्चात त्यांची गादी जर कोणी चालवली असेल तर ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी.
६/१२
काही लोकांच्या मते या दोन युगपुरुषांमध्ये गुरु-शिष्याचे नाते होते. आता गुरु-शिष्य म्हणजे सावरकरांनी टिळकांकडून दीक्षा वगैरे घेतली होती असा त्याचा अर्थ होत नाही.
अंदमान पर्वानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्तील लगेचचेच पर्व म्हणजे रत्नागिरी पर्व.
७/१२
अंदमान मधील शिक्षा भोगून झाल्यानंतर इंग्रजांनी सावरकरांना १९२१ साली रत्नागिरी च्या तुरुंगात हलवले.
पुढची २ वर्षे सावरकरांनी रत्नागिरीच्या तुरुंगात काढली. १९२३ साली त्यांना पुणे येथील येरवडा तुरुंगात हलवण्यात आले. १९२४ सालच्या जानेवारी महिन्यात इंग्रजांनी…
८/१२
…सावरकरांची सशर्त सुटका केली. इंग्रजांनी सावरकरांपुढे २ अटी ठेवल्या होत्या:
१. पुढील ५ वर्ष रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दींमध्येच रहिवास करायचा.
२. कुठल्याही राजकीय कार्यामध्ये भाग घ्यायचा नाही.
९/१२
सावरकरांना माहीत होते की त्यांच्या तुरुंगावासाने देशाला काही एक फायदा होणार नाही आहे. आणि म्हणून त्यांनी इंग्रजांच्या या अटी मान्य केल्या.
१९२४ ते १९३७ - रत्नागिरी पर्वाची ही १३ वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुंना संघटित करण्यासाठी घालवली.
१०/१२
आणि या १३ वर्षात त्यांनी केलेले जात्युच्छेक कार्य भारतातील समाजकारणात अद्वितीय ठरले.
याच अद्वितीय कार्याचा परमोच्च बिंदु म्हणजे रत्नागिरीतील हे पतित पावन मंदिर.
विष्णू-लक्ष्मी व भारतमातेच्या दर्शनासोबत मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रामदासांचे पण दर्शन झाले.
११/१२
समर्थ रामदास स्वामींनी १७ व्या शतकात ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही शिकवण महाराष्ट्राला दिली होती.
या मधूनंच प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या जात्युच्छेदक कार्यातून हिंदु तितुका मिळवला!
१२/१२

جاري تحميل الاقتراحات...