राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

12 تغريدة 52 قراءة Mar 06, 2023
सत्य घटनेवर आधारित :
अतिशय हुशारीने एक स्कॅम करण्यात आला. सर्व आरोपींमध्ये एक करार झाला की दर 3 दिवसांनी ते त्यांचे मोबाईल फोन, सिमकार्ड तोडून भट्टीत जाळून नष्ट करतील. डिजिटल पुरावा शिल्लक राहू नये आणि भविष्यात कोणीही कोणालाही ब्लॅकमेल करू नये हा हेतू होता..(१)
पण हा स्कॅम आधी वाटत होता, त्यापेक्षा खूप मोठा होता हे हळूहळू यातील लोकांना समजू लागले. खूप मोठा पैसा, अतिशय पावरफुल व खुनशी, व्हाईट कॉलर अर्बन नक्षली याचे सूत्रधार आहेत याची जाणीव अनेकांना होऊ लागली..(२)
ज्या स्केल वर हा खेळ सुरू होता, त्यात भविष्यात तोंडं उघडू नयेत म्हणून अगदी जीवाचीही रिस्क यात होती हे घोटाळ्यातील 'मिड-लेव्हल' आणि खालच्या लोकांना भीती वाटू लागली होती. अतिशय धूर्त लोकांशी पाला पडलाय व आता माघारही घेऊ शकत नाही अशी काहींची अवस्था झाली होती..(३)
या संपूर्ण गॅंग मधील तीन लोकं प्रचंड घाबरले होते. घाबरलेल्या या तिघांनी मग आपली बाजू काही प्रमाणात का होईना ती सेफ करण्यासाठी, आणि जर काही गडबड झाली तर भविष्यातील 'इन्श्युरन्स पॉलिसी' म्हणून आपल्यापुरता तो 'करार' बासनात गुंडाळला..(४)
मग या तिघांनी त्यांचे फोन आणि सिमकार्ड नष्ट करायचे बंद केले. सुत्रधाराला संशय येऊ नये म्हणून या तिघांनी मग त्याच मॉडेलचे दुसरे फोन व त्याच कंपनीचे दुसरे सिम घेऊन ते नष्ट केले, पण 'माल-मसाला' असलेले फोन व सिम मात्र सांभाळून ठेवायला सुरूवात केली..(५)
प्रमुख सुत्रधाराला या तिघांनी प्रत्येक वेळी खोटे तर सांगितलेच की त्यांनी त्यांचे फोन नष्ट केले आहेत, पण नष्ट करायची प्रक्रिया सामूहिक पद्धतीने होत असल्याने यांनी या टोळीने 6 महिन्यात बदलून नष्ट केलेले 500 फोन आणि सुत्रधाराने एकट्याने नष्ट केलेले 170 फोनही रेकॉर्ड करून ठेवले..(६)
त्यात चोरी करण्याच्या हेतूने बनलेल्या टोळीतही याकाळात गद्दारी झाली! आधीच जीवाची भीती असलेल्या या तीन लोकांना व्यवहारातही गद्दारी होण्याची जी भीती होती, तीही खरी ठरली. अर्बन नक्षली सुत्रधाराने चक्क 80 कोटींचा त्यांना चुना लावला होता..(७)
तिकडे तपास यंत्रणा कामाला लागली होती. त्यांना जरी खात्री होती की हजारो कोटींचा झोल झालेला आहे, सूत्रधार मात्र निश्चिन्त होता कारण त्याला वाटत होते की सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत.
फक्त एकच प्रॉब्लेम होता : बेईमानीच्या कामातही सुत्रधाराने इमान ठेवला नव्हता..(८)
अशात तपास यंत्रणेच्या हाती धोकेबाजी झालेले हे तीन सदस्य लागले! सगळे रस्ते बंद झालेले पाहून व कोणताही पर्याय नसल्याने या तिघांनीही तपास यंत्रणेशी सहकार्य करत सगळं सांगून टाकलं. तेवढंच नाही, त्यांच्या जवळचे सगळे फोन, सिम, चॅट, कॉल रेकॉर्डिंग, विडिओ रेकॉर्डिंग..(९)
सगळे पुरावे तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. तिघेही 'साक्षीदार' बनले. पण, सुत्रधाराची ट्यूब-लाईट मात्र पेटायला वेळ लागला. त्याला यातलं काही माहीतच नव्हतं. त्याच्या कार्यालयावर व लॉकर्सवर पडलेल्या रेड या त्याला गाफील ठेवण्यासाठी होत्या..(१०)
'रेड मध्ये काही मिळालं नाही' ची टिमकी वाजवत सूत्रधार बसला होता. याच काळात, तिकडे तपास यंत्रणेने नष्ट करण्यात आलेले सगळे डिजिटल पुरावे गोळा केले आणि मग सुत्रधाराला तपासासाठी बोलावले. सूत्रधाराला तर काहीच टेन्शन नव्हतं..(११)
सूत्रधार वाजतगाजत, फोटोशूट करत आणि मीडिया फुटेज खात, आईला भेटून, राजघाटावर जाऊन गांधीगिरी करत पोचला तेंव्हा तपास यंत्रणेने त्याचे स्वागत केले, पुरावे त्याच्या तोंडावर फेकून मारले आणि अटक केली.
तीन साक्षीदार : दिनेश अरोरा, अमित अरोरा, अर्जुन पांडे
सूत्रधार : मनीष सिसोदिया.

جاري تحميل الاقتراحات...