आशीष माळी
आशीष माळी

@Garjana206

12 تغريدة 2 قراءة Feb 26, 2023
युरोप गाजवणारा मराठी माणूस अबे फारीय
हा खालचा फोटो पणजी मध्ये मुख्य चौकात आहे.जगाला hypnotism ओळख देणारा.
सोळाव्या शतकात गोव्यात Candolim या बीच जवळ अनंत शेणॉय नामक एक गौड सारस्वत ब्राह्मण रहात होता. नंतर याचे धर्मांतर करण्यात आले आणि ख्रिस्त झाला. हा त्याचाच वंशज .त्याची आई
डिसोजा भाटकर घरातील . पूर्वाश्रमीचे त्यांचे आडनाव केंकरे.
पंधराव्या वर्षीच ऍबे फारिया आपल्या बापाबरोबर रोमला गेला आणि तिथे त्याने Theology या विषयावर डॉक्टरेट मिळवली. आपला एक प्रबंध त्याने पोर्तुगालची राणी मेरी हिला अर्पण केला आणि 'होली स्पिरिट'
या विषयावरील दुसरा प्रबंध पोप याला अर्पण केला. तो वाचून पोप एवढा impressed झाला, की ऍबे फारियाला प्रवचन देण्यासाठी त्याने 'सिस्टिन चॅपल' या त्याच्या निवासस्थानी पाचारण केलं. ऍबे फारियाची ही कीर्ती जेव्हा पोर्तुगालच्या राणी मेरीच्या कानावर गेली तेव्हा तिनेही त्याला प्रवचन
देण्यासाठी निमंत्रण पाठवलं.समोरचा मोठी माणसे आणि राणीला पाहून त्याची तोंडून शब्द फुटेना. त्याची ही अवस्था बघून समोरच बसलेला त्याचा बाप कोंकणी भाषेत ओरडला, "पुता, ही सोगळी भाजी रे ! कातर रे कातर ही भाजी !!" आपल्या मायभाषेतील हे शब्द ऐकताच ऍबे फारिया एकदम भानावर आला.
घाबरू नकोस, समोरचे श्रोते म्हणजे चक्क टाकळ्याची भाजी आहे असं समज आणि चिरायला सुरुवात कर !' 
यामुळे फारियाच्या डोके चालू लागले. आपल्या वडिलांनी उच्चारलेल्या कोकणी एका क्षुल्लक वाक्याने अशी काय जादू केली असेल, की ज्यामुळे आपली mindset बदलून गेली आणि आपण भयमुक्त झालो ?
आणि त्याला hypnotism च शोध लागला.ऑन द कॉज ऑफ ल्युसिड स्लीप इन द स्टडी ऑफ द नेचर ऑफ मॅन' हे या विषयावरील फ्रेंच भाषेतलं ऍबे फारियाचं गाजलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाची नंतर सर्व युरोपियन भाषांमध्ये भाषांतरे झाली
जेंव्हा हे बापलेक भारतात परत आले
तेंव्हा पोर्तुगीज चे अत्याचार बघून त्यांनी बंड केले त्याला आजही पिंटोचे बंड म्हणून ओळखतात.त्यात त्याने फ्रेंच आणि टिपू ची मदत घेतली
पण हे बंड फसले 47 जणांना पकडले त्यात 15 जणांना फाशी दिली अबे फारीय नंतर फ्रान्सनच मध्ये गेला पुढे फ्रेंच
राज्यक्रांती झाली त्यात अबे फेरीय च मोठा सहभाग होता.१७९५ साली उलथवून लावणाऱ्या दहा फ्रेंच पुढाऱ्यांमध्येही ऍबे फारियाचा समावेश होता. पुढे त्याला मार्सेलिस इथे अटक झाली आणि कुप्रसिद्ध शतोदीफतुरुंगातील एक त्याला बंद करण्यात आलं.
पुढे तुरुंगतुन सुटल्यावर तो पॅरिस इथे राहिला.तुरुंगातून सुटका झाल्यावर ऍबे फारिया पुन्हा पॅरिसला आला. १८११ साली फ्रान्स विश्वविद्यालयात तो तत्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नेमला गेला. हजारो मनोरुग्ण त्याने मानसोपचार करून बरे केले. कालांतराने मार्सेलिस येथील मेडिकल सोसायटीचा
सदस्य झाला.30 सप्टेंबर 1819 मध्ये हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला.त्याच्या नावाने लिस्बन मध्ये रोड आहे .नोबल विजेते अंटॉनिय मानिझ यांनी त्यांच्या विषयी प्रबंध लिहला.candolim मध्ये pinto house आजही आहे.
याचा गोवमध्ये शाळेत धडा होता बाकी इतिहासात स्थान नाही हे दुर्दैव.
शेणवी*

جاري تحميل الاقتراحات...