15 تغريدة 94 قراءة Jan 26, 2023
अडानीचा Game तसा सोपा आहे..
फक्त ६ टप्प्यात सांगायचा प्रयत्न करतो..👇
Step १ - आपल्या कंपनीचा IPO करायचा.
IPO केला म्हणजे आपल्या कंपनीचे किमान २५% शेअर्स मार्केटमध्ये देवाणघेवाण होते..आणि ती देवाणघेवाण किती किमतीला होते त्यावर पूर्ण कंपनीची किंमत ठरते.
#म
Step २ - IPO त शेअर विकून आलेले पैसे मॉरिशस किंवा केमन आयलंड सारख्या कमी/ शून्य व्याजदर असलेल्या देशातल्या आपल्या किंवा आपल्याच कोणाच्या कंपनीच्या अकाउंटवर घ्यायचे.
म्हणजे सरकारला कराचा एक नवा पैसा द्यायला नको..😐
>>एकाच दिवशी तयार केलेल्या अडानीच्या ?खोट्या कंपन्या 👇
Step ३ - हा करमुक्त पैसा २ पद्धतीने वापरायचा..
१) त्याच देशात नवनवीन कंपन्या तयार करायच्या आणि त्यात हा पैसा वळवायचा आणि त्याने भारतातल्या आपल्याच कंपन्यांचे IPO केलेले शेअर्स विकत घ्यायचे..पण इतके शेअर एकच कंपनी घेत असेल तर शंका येऊ शकते म्हणून-
>> पैसा कसा वळवला असू शकतो👇
२) रा मार्ग वापरायचा - ह्यातील काही पैसा त्या देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांना द्यायचा..आणि त्यांना फक्त अडानीच्या कंपन्यात गुंतवणूक करायला सांगायची..!
>>Normally म्युचुअल फंड किमान २०-३० कंपन्यांत गुंतवणूक करतात..पण ह्या ५ फंड 👇 नी फक्त अडानीच्या कंपनीचेच शेअर्स विकत घेतलेत.
Step ४ - ह्या टप्प्यापर्यंत खूप शेअर्स ह्या ?खोट्या कंपन्यांनी विकत घेतल्याने, अडानीच्या शेअर्सची कृत्रिम टंचाई निर्माण होते आणि मग शेअर्सची किमंत आपोआप वाढायला लागते.त्या वाढत्या किमतीचा ट्रेंड तयार होतो..आणि एकदा का तो झाला की आणि मग ट्रेडर्स पण ह्या वाहत्या गंगेत उडी घेतात..!
कोणत्याही ट्रेडरचा फंडा असतो की जोपर्यंत शेअर्सची किंमत एका विशिष्ट प्रमाणात खाली येत नाही तोपर्यंत ते काही शेअर्स विकत नाही..म्हणून मग ह्या टप्प्यात अडाणीचे काम फक्त हे असते की शेअर्सची किंमत त्या विशिष्ट किमती (support खाली) खाली येऊ द्यायची नाही..आणि एकदा का असे झाले की -
शेअर्सची किंमत वाढत जाते..वाढतच जाते..अशाने मग LIC व भारतीय म्युचुअल फंड सारख्या मोठ्याना पण ह्या गर्दीत उडी मारावीच लागते..त्यांच्याकडे अमाप पैसा असतो..ते असेल त्या किमतीला शेअर विकत घेतच राहतात..आणि मग होतो स्फोट..शेअर्सच्या किमतीचा..न् अदनीचे शेअर्स वर्षात १०-२०+पट वाढतात !
Step ५ - ह्या टप्प्यात अडानी शेअरच्या किंमतीला काहीचच करत नाही..कारण आतापर्यंत ट्रेण्ड तयार झालेला असतो..शेअरची किंमत चॅनलमधे वाढत जात असते..अशा वेळी अदानी मग ह्या ?फुगवलेल्या शेअरची किमंत दाखवतो आणि ते शेअर तारण (Pledging) ठेऊन कर्ज घ्यायला सुरुवात करतो..लाखो कोटीची कर्ज..
ह्या कर्जाच्या पैशातून तो खरेदी करत सुटतो..सरकार..सॉरी..सरकारी कंपन्या..जमीन..बंदरे..विमानतळ.. माणसांची नीतीमत्ता(?!)..माणसे(?!).. सगळं सगळं..जे जे काही विकणे आहे ते ते सर्व तो विकत घेत सुटतो..व शेअर मार्केट मात्र ह्या गोष्टींना बिझनेसचा मोठा Win मानत शेअर्सचा भाव वाढवतच राहते..!
आणि मग कालपरवापर्यंत भारतातल्या पहिल्या १००त कसाबसा बसू शकेल असा अडाणी जगातील पहिल्या ५ श्रीमंत लोकांत जागा मिळवतो..तो वाढलेल्या शेअर्सच्या किमतीवर..सरकारी बँकाच्या कर्जावर..सरकारी LIC ने पडेल त्या किमतीला घेतलेल्या शेअर्सच्या बळावर..!
आता इथून पुढे काय ??
👇👇👇
ते माहीत नाही..पण जगातल्या जवळपास सगळ्या Scam मध्ये होते तसे ते इथेही होऊ शकते..👇
कोणीतरी आधीच श्रीमंत असलेला अजून जास्त श्रीमंत होईल..गरीब असलेला अजून गरीब होईल..फक्त LIC च्या जीवावर रिटायर होऊ पाहणारे काही मध्यमवर्गीय त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशाला मुकतील..काही बँका
ज्यानी शेअर्सच्या तारणावर मोठ्ठं कर्ज दिले त्या तारणवाल्या शेअर्सची किंमत घसरल्याने बुडतील..मोठ्या SBI सारख्या बँकात NPA तयार होतील..ते NPA बुडीत काढण्यासाठी पेट्रोल डिझेल महाग ठेवले जाईल..अन् महागाई वाढत जाईल..श्रीमंत अजून श्रीमंत होत जाईल आणि गरीब अजूनच गरिबीत लोटला जाईल..!
जे म्हणतात..आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत नाही म्हणजे आम्ही safe आहोत..त्या लोकांना पण अडाणी बुडाला तर चटका नक्कीच बसेल..इतका पैसा LIC ने ह्या शेअर्समध्ये ओतलाय..इतकी कर्ज सरकारी बँकांनी दिलीत..अर्थव्यवस्था म्हणजे पत्तांचा बंगलाच जणू..एक पत्ता जागचा हलला अन् खेळ संपला..😐
टीप - हंडनबर्ग रिसर्च नावच्या एका प्रतिष्ठित संस्थेने अडाणी ग्रुप मधील फेरफार ह्यावर ३३ हजार पानांचा रिपोर्ट तयार केलाय..त्याचा ~ ५० ट्विटचा सारांश वाचून वरील १३ ट्विटचा कोणालाही समजेल असा मराठी थ्रेड लिहायचा प्रयत्न केला आहे तरी त्यात काही त्रुटी (imperfections) असू शकतात..🙏
ज्यांना जास्तीत जास्त accurate माहिती पाहिजे त्यांनी हा रिपोर्ट किंवा त्यांचा ट्विट थ्रेड वाचवा..👇👇👇
१५/१५

جاري تحميل الاقتراحات...