राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

11 تغريدة Feb 28, 2023
गेली अडीच दशके ठाकरे-शासित मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील लाखो घरांमधून व इंडस्ट्रीतून निघणारे रोजचे करोडो लिटर सांडपाणी गटर, खाड्या, नाले, नद्यांमधून थेट समुद्रात सोडून दिले होते. म्हणून बिचारे मुंबईतील लोकं अलिबाग, कोंकण, गोव्याला जाऊन समुद्राचा आनंद घेत होते..(१)
दादर, वरळी, गिरगावसह अनेक ठिकाणी समुद्रात सांडपाणी सोडण्यासाठी आऊटलेट बांधले की यांचं काम संपलं अशी वृत्ती होती यांची. त्यामुळे जलस्रोतांमध्येही मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण निर्माण झाले आहे. समुद्राचा आनंद जाऊद्या लोकांचा जीव धोक्यात टाकला आहे या ठाकरेंच्या बीएम'शी' कारभाराने..(२)
मुंबईतील सागरी प्रदूषणाबाबत केंद्रीय पर्यावरण विभाग, केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हरित लवादाने पालिकेला वेळोवेळी इशारा दिला. पण बाप-लेकाकडे बीएम'शी', राज्य सरकार आणि पर्यावरण मंत्रालय असूनही बापाला काळजी डास चावला तर कोण खाजवणार याची आणि लेकाला इंपोर्टेड दारूची..(३)
ED सरकार हे सगळं आता बदलत आहे. समुद्र तसेच खाड्यांमध्ये थेट सोडले जाणारे सांडपाणी आणि गाळ रोखण्याचा निश्चय ED सरकारने केला आहे. यासाठी सांडपाण्याचा प्रवाह वळवण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला जात आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी पालिकेने एक एक्सपर्ट सल्लागार कंपनी नेमली आहे..(४)
शासनकर्ते बदलताच प्रशासनानेही हा विषय गांभीर्याने घेतला असून या प्रस्तावाला पालिका आयुक्त व प्रशासकाने मंजुरी दिली आहे.
पश्चिम उपनगरातून अरबी समुद्र व मालाड खाडीत थेट सांडपाणी सोडणारे 27, ठाणे खाडीत 12, माहुल खाडी व शहरात 9 नाल्यांद्वारे समुद्रात सांडपाणी सोडले जाते..(५)
सांडपाणी समुद्रात सोडण्यापूर्वी ते मलनि:सारण वाहिन्यांमार्फत सोडणे अपेक्षित असते. जगातील सर्व प्रमुख शहरांमध्ये असं केलं जातं. ठाकरेंना माहीत नव्हतं.
हे सांडपाणी थेट समुद्रात न सोडता ते वळवून सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये नेण्यासाठी आता नवीन वाहिन्या उभारण्यात येणार आहेत..(६)
सिवेज ट्रीटमेंट व्यतिरिक्त अशा डजनभर उपाययोजना किमान एक दशक सातत्याने केल्या नंतर मुंबईकरांना समुद्राचा आनंद घेण्यासाठी अलिबाग आणि गोव्याला जावं लागणार नाही. एवढा सत्यानाश ठाकरे शासित बीएमशी ने करून ठेवला आहे. तेही, याच कारणासाठी तुमचे-आमचे करोडो रुपये 'ऑन-पेपर' खर्च करून..(७)
पैसे खर्च केले, पण कोणाच्या घश्यात घातले कोणास ठाऊक! कारण, मुंबईतील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करणे, सांडपाण्यातून घनकचरा, प्लास्टिक समुद्रात मिसळल्यामुळे पर्यावरणाची हानी झाल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेस 2020 मध्ये 30 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता..(८)
30 कोटी दंड वेगळा. शहरातून रोज समुद्रात सोडल्या जाणाऱ्या 85 ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याचा झोल VJTI च्या अहवालात नमूद आहे. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत दर महिन्याला ₹4.25 कोटी दंड केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास भरण्याचा आदेश आहे!..(९)
ठाकरेंच्या तीन पिढ्यांना सगळं काही आणि आयतं देणाऱ्या मुंबई शहराचं वाटोळं ठाकरेंनीच केलं आहे. प्रादेशिक/भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर भावनिक राजकारण करणारे देशात अनेक नीच पक्ष आहेत पण ज्यांची मतं खायची त्यांचंच वाटोळं करायचं हा जर निकष असेल तर ठाकरे सेना पहिला क्रमांक पटकावेल..(१०)
आज वाईट वाटलं तरी स्पष्टच सांगतो - मुंबईचं वाटोळं होण्यात ठाकरे यांचं जेवढं योगदान आहे त्यापेक्षा जास्त, 'खोलून मारली' की जाब विचारण्याऐवजी 'स्पिरिट ऑफ मुंबई' म्हणत ठाकरे सेनेचा भ्रष्टाचार व नियोजनशून्य कारभार सहन करणाऱ्या सामान्य मुंबईकरांचेही योगदान तेवढेच आहे.
जय महाराष्ट्र!

جاري تحميل الاقتراحات...