राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

4 تغريدة Feb 28, 2023
मोदी सरकारचे 'नॉर्थ-ईस्ट' यश :
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून फुटीरतावादी हिंसाचारात 74%, सुरक्षा दलांवरील हल्ल्यांमध्ये 60% आणि ईशान्येकडील नागरिकांच्या मृत्यूमध्ये 89% घट झाली आहे. या कारवायांमध्ये सहभागी असलेले 8000 तरुण आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत..(१)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षांत या प्रदेशाला 50 हून अधिक वेळा भेट दिली असून 74 मंत्र्यांनीही 400 हून अधिक वेळा या भागाला भेट दिली व स्थानिक विषयांवर संवेदनशीलता दाखवत येथील समस्यांवर तोडगा काढत विकास कामांना गती दिली..(२)
मोदी सरकारने पुढाकार घेऊन 2019 मध्ये नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा, 2020 मध्ये ब्रू समुदाय व बोडो गटाशी आणि 2021 मध्ये कार्बी समुदायातील बंडखोर संघटनांसोबत शांतता करार करण्यात आले. आसाम-मेघालय आणि आसाम-अरुणाचल प्रदेश सीमा विवाद जवळपास मिटला आहे..(३)
2014 पासून, या प्रदेशासाठी 4 लाख कोटींहून अधिक तरतूद करण्यात आली. हा भाग पूर्वी अशांतता, बॉम्बस्फोट, बंद इत्यादींसाठी ओळखला जात असे, परंतु गेल्या 8 वर्षांत येथे शांतता प्रस्थापित झाली आहे. NE मधील सातही राज्यांत आज भाजप किंवा NDAची सरकारे अशीच नाही बनलेत! वेल-डन मोदी सरकार.

جاري تحميل الاقتراحات...