सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन, भूगोलशास्त्रज्ञ, अनुवादक, लेखक, सैनिक, प्राच्यविद्याकार, कार्टोग्राफर, वांशिकशास्त्रज्ञ, गुप्तहेर, भाषाशास्त्रज्ञ, कवी, तलवारबाजी करणारे आणि मुत्सद्दी आणि इतर गुण होते
रिचर्ड बर्डन हा अफलातून व्यक्ती होता. .चार जणांशी एकाच वेळी डोळे मिटून तो बुद्धिबळ खेळत असे .त्याला अनेक विषयात ज्ञान होते .शिक्षणही पूर्ण न करू शकलेला हा प्राणी निव्वळ अद्भुत होता. नाईल नदीच्या उगमाचा शोध खर तर याच्याच नावावर असायला
हवा होता.युरोप ला गोरिला माकडाची ओळख याने करून दिली.हज करणारे जे निवडक पाच गैरमुस्लिम आहेत त्यातील हा एक होता. ईस्ट इंडिया कंपनी कामास होता भारतात आल्यावर त्याने मराठी गुजराथी,सिंधी ,मुलतानी अश्या अनेक भाषा शिकल्या .हा माणूस तर चालता चालता भाषा शिकून जातो अस एकाने वर्णन केले होते
एकदा बाबूलनाथ मंदिरात तो आपल्या पत्नीला घेऊन चालला असता त्याला ब्राम्हणाने अडवले तेव्हा त्याने तो इंग्रज नसून कोकणस्थ ब्राम्हण आहे हे मराठीत सांगितले इतकेच नव्हे तर त्याने संध्या कशी करतात तेही सांगितले की तो निरुत्तर झाला
एकदा आफ्रिकेत याने मदत मगितलेले दोन गुजराथी याला आपण आपल्या बरोबर नंतर लुटू अस आपापसात गुजराती मध्ये बोलत होते याने थेट त्यांच्याशी गुजरातीत बोलून तुमचं काय शिजतेय ते मला कळतंय हे तिथेच ठणकवल होत.
भारतात लवकरच बंडखोरी होईल हा अंदाज त्याने 1857 च्या उठवा आगोदर वर्तवला होता.त्याने काही माकड पाळली होती त्यातील एका माकडीणीचे नाव 'बायको' अस ठेवलं होतं तो त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत त्याने काही नोट्स ही काढल्या होत्या .एकंदरीत ईस्ट इंडिया वर खुप टीका केली
म्हणून त्याचे career पुढे गेलेच नाही . त्याला हिंदू मुस्लिम आणि शीख धर्माचा प्रचंड अभ्यास होता.
en.m.wikipedia.org
en.m.wikipedia.org
पण एका आगीत ते सर्व नष्ट झाले . हे कमी की काय त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या बायकोनं त्याची अनेक हस्तलिखित जाळून टाकली..
جاري تحميل الاقتراحات...