राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

6 تغريدة Feb 28, 2023
सुप्रीम कोर्टाने आज नोटबंदी चा मोदी सरकारचा निर्णय वैध ठरवला. जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने अजून 4 महत्वाच्या गोष्टी निकालात काढल्या, प्रामुख्याने ज्या मुद्द्यांवर एक-दोन नाही तर तब्बल 58 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. ते 4 मुद्दे असे..(१)
केंद्र सरकार बँक नोटांच्या सर्व मालिका बंद करू शकते?
ऑर्डर : केंद्राचे अधिकार केवळ "एक" किंवा "काही" मालिकांच्या बँक नोटांच्या विमुद्रीकरणापुरती मर्यादित असू शकत नाही. बँक नोटांच्या एक, काही किंवा सर्वच मालिकांसाठी असे करण्याचे अधिकार केंद्राला आहे..(२)
नोटाबंदीसाठी आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) कायद्यांतर्गत सरकारला संरक्षण आहे का?
ऑर्डर : RBI कायद्यामध्ये संरक्षण आहे की अशा अधिकाराचा वापर केंद्राला बोर्डाच्या शिफारशीनुसार करावा लागेल. असे संरक्षण मोडीत काढता येत नाही..(३)
निर्णय प्रक्रियेत काही त्रुटी आहेत का?
ऑर्डर : 8 नोव्हेंबर 2016 च्या नोटबंदी अधिसूचनेत निर्णय प्रक्रियेतील कोणत्याही त्रुटी नाहीत..(४)
बनावट चलन आणि काळा पैसा नष्ट करणे आणि औपचारिक अर्थव्यवस्थेला बळकट करणे यासारख्या उद्देशांसाठी नोटा बंदी हा एकमेव पर्याय होता का?
ऑर्डर : केंद्र सरकारचा निर्णय उद्दिष्ट आणि त्यासाठी वापरलेले साधन यांच्यातील "वाजवी दुवा" होता. नोटाबंदीने उद्दिष्ट साध्य केले..(५)
खूप लोकं देव पाण्यात बुडवून बसले होते. पण 8 नोव्हेंबर 2016 रोजीच्या मोदींच्या निर्णयाने त्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' झालेला आहे! आजचा निकाल नक्कीच त्यांचे नैराश्य वाढवणारा आहे.
तरीही काही लोकं त्यांना सुप्रीम कोर्टापेक्षा जास्त कळतं अशा आविर्भावात बडबड करतील. त्यांना बोलू द्या..

جاري تحميل الاقتراحات...