भारतीय नौदलाच्या ताफ्यात गेल्या आठवड्यात स्टेल्थ डिस्ट्रॉयर मुरगाव आणि पाणबुडी INS वगीर कार्यान्वित झाल्यामुळे नौदलाच्या समुद्रावरील नियंत्रण क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याआधी सप्टेंबरमध्ये नौदलाने स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका विक्रांत कार्यान्वित केली होती..(2)
चीनधार्जिण्या UPA 1 आणि 2 च्या काळात खाल्लेल्या मातीमुळे भारतीय नौदलाकडे सध्या चीनच्या ताफ्यापेक्षा कमी ताकद असली तरी, इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रामध्ये एक शक्तिशाली नौदल म्हणून उदयास येत असून हिंद महासागरातील कोणत्याही नौदलाला आव्हान देण्याची क्षमता झपाट्याने मिळवत आहे..(3)
आंतरराष्ट्रीय समुदाय भारतीय नौदलाच्या वाढत्या ताकदीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, ज्यावर QUAD, इंडो-पॅसिफिक डेमोक्रॅटिक अलायन्सची सागरी रणनीती अवलंबून आहे. चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला मोठे आव्हान उभे केले असताना, भारतीय नौदलाकडे काउंटर बॅलन्स म्हणून पाहिले जात आहे..(4)
इंडो-पॅसिफिक प्रदेशातील चार लोकशाही - भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका - QUAD गटांतर्गत एकत्र आले आहेत. अशात भारतीय नौदलाचे सशक्तीकरण, ताफ्यात होणारी वाढ व या क्षेत्रातील वाढत्या क्षमता QUAD च्या मूळ उद्दीष्ठांशी सुसंगतच आहे..(5)
आधीच आण्विक पाणबुडी अरिहंतने सुसज्ज असलेल्या, नौदलाकडे पाइपलाइनमध्ये आणखी दोन आण्विक पाणबुड्या आहेत. भारतीय नौदलाचे अणुऊर्जेवर चालणाऱ्या 100% स्वदेशी पाणबुड्या बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर युद्धपातळीवर काम सुरू आहे..(6)
भारतीय नौदलाने 2027 पर्यंत 200 युद्धनौकांचे उद्दिष्ट ठेवले आहे (सध्या 150 आहेत). जर आपण चीनशी तुलना केली तर त्यांच्याकडे 355 युद्धनौका आहेत. 2005-14 मध्ये त्यांनी ही मुसंडी मारली, जेंव्हा इकडे सोनिया-अँथनी जोडगोळी वाटोळं करत होती आणि काँग्रेस-चीनी कम्युनीच पक्ष MoU करत होते..(7)
हिंद महासागरात चीनच्या वाढत्या 'ग्रँड-मस्ती'मुळे व दक्षिण चीन समुद्रातील बेकायदेशीर दाव्यांमुळे भारतीय नौदलावर भारतीय सागरी व्यापाराच्या रक्षणाचीही जबाबदारी आहे. सध्या 46 युद्धनौकांचे बांधकाम सुरू असून मोदी सरकारने आणखी 55 जहाजे व पाणबुड्या बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय..(8)
भारतीय नौदल प्रकल्प 75I अंतर्गत आणखी 6 हंटर-किलर डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या विकत घेत आहे. प्रकल्प 75 अंतर्गत भारतीय नौदलाने आयएनएस कलवरी वर्गाच्या 6 स्कॉर्पीन पाणबुड्यांपैकी 5 पाणबुड्या कार्यान्वित केल्या असून, शेवटची सहावी पाणबुडी माझगाव डॉक, मुंबईत बांधली जात आहे..(9)
भारतीय नौदलाकडे 4 जर्मन HDW, 7 रशियन किलो-क्लास, 5 कलवरी क्लास फ्रेंच स्कॉर्पेन आणि 1 भारतीय अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी अरिहंत आहेच. P-75 पाणबुड्यांमुळे भारतीय नौदलाची लढाऊ क्षमता अशा वेळी वाढत आहे जेव्हा चीन हिंद महासागर क्षेत्रात पाय पसरत आहे..(10)
गेल्या आठवड्यात पाणबुडीविरोधी युद्ध जहाज अर्नाळा लाँच करण्यात आली. अर्नाळा जहाजे सामर्थ्यवान आहेत आणि चिनी पाणबुड्यांना भारतीय पाण्यात प्रवेश करण्यापासून रोखतील. अर्नाळा श्रेणीतील युद्धनौका लो-इंटेनसिटी सागरी ऑपरेशन्स करण्यासाठी सक्षम आहेत..(11)
अशा 8 पाणबुडीविरोधी जहाजांची ऑर्डर देण्यात आली आहे. प्रकल्प 15-B अंतर्गत विशाखापट्टणम जहाज गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय नौदलात शामिल झाले आहे. प्रकल्प 15-B अंतर्गत आणखी दोन विनाशक, इम्फाळ आणि सुरत बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यांत आहेत..(12)
क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो, 76 मिमी सुपर रॅपिड गन माउंट सारख्या प्रणाली युद्धनौकांना शत्रूच्या हल्ल्यांपासून वाचवू शकतात, तर ब्रह्मोस कोणत्याही शत्रूच्या युद्धनौकेला त्याच्या लोकेशन च्या 300 किमीच्या आसपास फिरू देत नाहीत. यातील जवळजवळ सगळ्याच गोष्टी आता भारत स्वतः बनवत आहे..(13)
भारतीय शिपयार्ड्समध्ये पाणबुड्या व युद्धनौकांचे बांधकाम व भारताने विकसित केलेली क्षेपणास्त्रे हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे आणि या क्षेत्रातील आत्मविश्वास द्विगुणित करणारे आहे. जय हिंद!
तरीही, 'मोदींनी काय केलं?' हा प्रश्न कोणी विचारला, तर सरळ जोड्याने मारा!
तरीही, 'मोदींनी काय केलं?' हा प्रश्न कोणी विचारला, तर सरळ जोड्याने मारा!
جاري تحميل الاقتراحات...