ashish dikshit
ashish dikshit

@DikshitAshish

18 تغريدة 12 قراءة Dec 15, 2022
भारताची लोकसंख्या बेसुमार वाढतेय का? त्याला मुस्लीम समाज जबाबदार आहे का?
भाजपच खासदार रवी किशन यांनी या आठवड्यात संसदेत लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडलं. अशा कायद्याची भारताला मुळात गरज तरी आहे का? की यामुळे नवे प्रश्न निर्माण होतील.
आकडे सांगणारा आजचा धागा 👇🏽
(१/१८)
रवी किशन यांनी हे खासगी विधेयक मांडताना म्हटलं की झपाट्याने लोकसंख्या वाढल्यामुळे भारतात दारिद्र्य आहे.
रवी किशन यांनी स्वतः ४ मुलांना जन्म दिला आहे. काँग्रेसने लोकसंख्या विधेयक आणलं असतं तर मी एवढी मुलं जन्माला घातली नसती, असं ते म्हणाले! 🙄
(२/१८)
उत्तर प्रदेश सरकार लोकसंख्या विधेयक आणत असून मुख्यमंत्री योगींनी चिंता व्यक्त केली आहे की एका विशिष्ट धर्माची संख्या वाढल्यामुळे समाजात असमतोल निर्माण होऊ शकतो.
त्यांनी मुस्लिमांचं नाव घेतलं नसलं तरी ते कुणाबद्दल बोलत आहेत हे सर्वांना ठाऊक आहे.🫣
(३/१८)
economictimes.indiatimes.com
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित, भाजप सरकारने नेमलेले खासदार राकेश सिन्हा राज्यसभेत असं विधेयक मांडताना म्हणाले, “मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा वेगाने वाढत आहे.”
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले, “आसामच्या मुस्लिमांना लोकसंख्या नियमंत्रणाची गरज आहे.”
(४/१८)
आधी मुळात भारताची लोकसंख्या बेसुमार वाढतेय का, हे तपासून पाहूया.
१९९३ साली एक भारतीय महिला ३.४ मुलांना जन्म देत होती. 👎🏾
२०२१ साली एक भारतीय महिला केवळ २.० मुलांना जन्म देत आहे. 👍🏾
ही माहिती भारत सरकारने अलीकडेच NFHS-5 मध्ये जाहीर केली.
(५/१८)
business-standard.com
एक महिला २.१ मुलांना जन्म देत असेल तर लोकसंख्या स्थिर होते. कारण ०.१ मुलं जन्मानंतर काही न काही कारणाने मरण पावतात.
म्हणजे १ आई आणि १ वडील मिळून २ मुलांना जन्म देतात. यथावकाश आईवडील वारले की मुलं त्यांना लोकसंख्येत रिप्लेस करतात. याला Replacement rate म्हणतात.
(६/१८)
पण भारत सध्या या Replacement rate (२.१) च्याही खाली गेला आहे. त्यामुळे भारताची लोकसंख्या कमी होण्याच्या दृष्टीने आपण पहिलं पाऊल टाकलं आहे.
यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि पश्चिमेतल्या माध्यमांनी भारताचं कौतुक केलं. जगाने सुटकेचा निःश्वास सोडला!
(७/१८)
economist.com
आता जन्मदर कमालीचा घटला असला तरी भारताची लोकसंख्या लगेच कमी होणार नाही.
कारण भारतीयांचं सरासरी आयुर्मानही वाढत आहे. त्यामुळे आधी जन्माला आलेले दीर्घ काळाने मरण पावतील.
२००० साली भारतीय व्यक्ती ६२ वर्षे जगायची. आता आपण ७० वर्षांचं आयुष्य जगतो. पुढे भारतीय ८० वर्षे जगतील.
(८/१८)
लॅन्सेट या विश्वासार्ह वैद्यकीय नियतकालिकानुसार भारताची लोकसंख्या संथ गतीने २०४८ साली १६० कोटींपर्यंत पोहोचेल.
पुढच्या ५० वर्षांत झपाट्याने ५१ कोटींनी कमी होईल आणि इ.स.२१००पर्यंत १०९ कोटींवर स्थिरावेल.
आजची भारताची लोकसंख्या १३९ कोटी आहे. त्यापेक्षा ३० कोटींनी कमी असेल.
(९/१८)
म्हणजे भारताची लोकसंख्या आपोआप कमी होणार आहे. सरकारने कायदे आणून आणखी कमी केली तर ते घातक ठरू शकेल. कसं ते पाहू.
सध्या भारतात विशीतल्या तरुणांची संख्या जास्त आहे. २०३० साली तिशीतल्यांची असेल. २०२५० साली पन्नाशीतल्यांची असेल. त्यानंतर साठी-सत्तरीतल्यांची वृद्धांची असेल.
(१०/१८)
याचा अर्थ असा की कायदा न आणताही भारतात येणाऱ्या काळात काम करु शकणाऱ्या तरुणांची चणचण भासणार आहे.
चीनने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणल्यामुळे तिथे कामगार कमी आणि वृद्ध जास्त, अशी स्थिती निर्माण होत आहे. त्याचा परिणाम अर्थिक विकासावर होईल, अशी त्यांना भीती आहे.
(११/१८)
लेखक, विश्लेषक व गुंतवणूकदार रुचिर शर्मा चिंता व्यक्त करतात की आता भारतात पुरेशी मुलं जन्माला येत नसल्यामुळे येणाऱ्या काळात भारताचा आर्थिक विकासाचा दर मंदावणार आहे.
पुरेसे कामगार नसल्यामुळे भारताला ८% दर टिकवता येणार नाही, असा त्यांचा अंदाज आहे.
(१२/१८)
ndtv.com
लोकसंख्या आपोआप कमी होत असताना भाजप नेते नियंत्रणाची भाषा का करत असावेत?
कारण उ.प्र.-बिहारमधली जोडपी अजूनही २ पेक्षा जास्त मुलांना जन्म देत आहेत.
(दुसरी बाजू- जादा तरुण असलेले बिहार-उ.प्र. इतर राज्यांना कामगार पुरवून देशांतर्गत समतोल राखतील, असं काही जाणकारांना वाटतं.)
(१३/१८)
भाजप-संघ सांगत आले आहेत की मुस्लिमांची संख्या बेसुमार वाढतेय. हे खरं आहे का, हे आता पाहूया.
भारतात मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक वेगाने वाढत होती, हे खरं आहे.
पण आता त्यांचा लोकसंख्या वाढीचा दर सगळ्यांत वेगाने खाली येतोय, हेही तितकंच खरं आहे.
(NFHS-5)
(१४/१८)
गेल्या २० वर्षांत हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीच्या दरातली तफावत वेगाने कमी होत गेली आहे.
आता फरक हिंदू विरुद्ध मुस्लीम असा कमी आणि उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा जास्त आहे.
बिहारमधल्या हिंदूंचा लोकसंख्या वाढीचा दर केरळमधल्या मुस्लिमांपेक्षा जास्त आहे.
(१५/१८)
किती मुलांना जन्म द्यायचा, हे ठरवण्यात महिलांचं शिक्षण व आरोग्य सुविधांची उपलब्धता महत्त्वाचे घटक ठरतात, असं जाणकार सांगतात.
भागवतांनी सांगितल्यावर जसे हिंदू जास्त मुलं जन्माला घालत नाहीत, तसंच मौलवी म्हणाले म्हणून मुस्लीम लोकसंख्या वाढवत नाहीत.
(१६/१८)
thehindu.com
आजूबाजूला पाहिल्यावर २ गोष्टी लक्षात येतात:
१- या पिढीत सर्वांना केवळ १ किंवा २ मुलं असतात. शेजारी-नातेवाईक सगळीकडे तुम्हाला हेच दिसेल. हिंदू असो वा मुसलमान. शहरी असो वा ग्रामीण.
२- पुण्या-मुंबईत वाढणारी गर्दी हा विकासाच्या असमतोलाचा प्रॉब्लेम आहे. बेसुमार वाढीचा नाही.
(१७/१८)
त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज आहे का, याबाबत तुमचं मत तुम्ही विचार करून ठरवा. विषय नीट समजून घ्या, व्हॉट्सअप फॉरवर्ड्सवर विश्वास ठेवू नका.
हा धागा थोडा लांब झाला, पण तरीही आवडला असेल/उपयुक्त वाटत असेल तर वर जाऊन एक नंबरचा ट्वीट जरूर रिट्वीट करा. 🙏🏾
(१८/१८)

جاري تحميل الاقتراحات...