राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

4 تغريدة 1 قراءة Feb 28, 2023
आज संकष्टी आहे -
रेडी गणपती, वेंगुर्ला
घटना तशी खूप जुनी, तब्बल 46 वर्षापूर्वीची. सदाशिव कांबळी आपलं काम संपवून, ट्रक थांबवून, रेवती बंदरा जवळपास विश्रांतीला थांबला.. (१)
त्याला एक अनोखं स्वप्न पडलं, बाप्पा त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाला, तू इथेच खोदायला घे, तुला माझी मूर्ती मिळेल." तो दिवस होता 18 एप्रिल 1976. दोन दिवस सलग खोदल्यावर खरोखरच बाप्पाचे कान दिसू लागले.. (२)
पुढे महिनाभर खोदकाम चालू ठेवले आणि 1 मे 1976 या दिवशी सहा फुटाचा बाप्पा सापडला. जांभ्या दगडातील मूर्ती बसलेल्या स्थितीत असून द्विभुज आहे. पुढे अजून खोदल्यावर दगडी मूषक मिळाला. हा शुभसंकेत समजून जिथे बाप्पा सापडला तिथेच मंदिर बांधायचे ठरले.. (३)
मंदिर छोटसं असून आतमध्ये देवदेवतांच्या मूर्ती तसेच गणेशाच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित चित्र आहेत. एकुणातच मंदिर आणि परिसर स्वच्छ व प्रसन्न करणारा आहे. हा बाप्पा स्वयंभू असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी ख्याती आहे.
गणपती बाप्पा मोरया..🙏
#धर्मोरक्षतिरक्षितः

جاري تحميل الاقتراحات...