राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

16 تغريدة Feb 28, 2023
'ज्या उद्देशाने नोटबंदी केली होती, ती असफल!'- काँग्रेस.
यांना दर चार-आठ महिन्यांनी नोटबंदीची आठवण येते आणि मग हे मोदींच्या नावाने खडे फोडतात. यातच नोटबंदी यशस्वी झाली की नाही हे लक्षात येतं! परंतु, आज मी काँग्रेसशी सहमतही आहे. उद्देश (पूर्णपणे) सफल झाला नाही हे सत्य आहे.. (१)
नोटबंदी पूर्णपणे सफल नव्हती असं मला वाटायला दोन कारणे आहेत. त्यातील एक केवळ'परसेप्शन'शी संबंधित आहे तर दुसरे कारण म्हणजे मोदी सरकारची हतबलता!
मोदी सरकारने नोटबंदी केली तेंव्हा 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये फक्त 'डुप्लिकेट नोटा' किंवा ब्लॅक-मनी एवढाच विषय नव्हता.. (२)
2013 मध्ये (अर्थात UPA सरकार केंद्रात सत्तेत असताना) माहितीच्या अधिकारा अंतर्गत (RTI) मिळालेल्या माहिती मध्ये असे उघडकीस आले होते की RBI च्या वॉल्ट मध्ये जमा झालेल्या नोटांची संख्या नोटा छापण्याच्या प्रेसमध्ये छापलेल्या नोटांच्या एकूण संख्येपेक्षा अधिक होती.. (३)
कोट्यावधी रुपये जे 'ऑफिशियली' कधी मुद्रित झालेच नाहीत, ते रहस्यमयरित्या भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या वॉल्ट मध्ये मात्र सातत्याने येत होते! लक्षात घ्या, छापखाने (सेक्युरिटी प्रेस) कोणताही 'स्टॉक' ठेऊ शकत नाही कारण पैसे धारण करण्यासाठी कोणतीही व्हॉल्ट प्रेस मध्ये नसतेच.. (४)
जेवढ्या नोटा इंडियन सेक्युरिटी प्रेस मध्ये जेंव्हा कधी छापल्या जातात, त्या थेट RBI च्या तिजोरीत ट्रान्सपोर्ट होतात. म्हणजे RBI कडील नोटांचा हिशोब आणि सेक्युरिटी प्रेसने छापलेल्या नोटांची टोटल यात एकही नोट ची तफावत कुठल्याही परिस्थितीत होऊ शकत नाही.. (५)
या 'घोस्ट नोट्स' ची माहिती RTI मधून देणाऱ्या UPA सरकारने कधी यामागचं रहस्य तपासले नाही. RBI च्या वॉल्ट मध्ये नोटा फक्त सरकारी सेक्युरिटी प्रेस मधूनच येऊ शकतात. मग या अतिरिक्त, पण प्रेसच्या हिशोबात न दाखवलेल्या नोटा कोणाच्या आदेशानुसार व कोणासाठी छापल्या जात होत्या?.. (६)
'भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रण' ही RBI ची संपूर्ण मालकीची सहायक कंपनी भ्रामक माहिती देत ​​असे. दोन वेगवेगळ्या RTI (10.11.2011 आणि 24.12.2011) मधून, एकाच काळात छापलेल्या नोटांबद्दल च्या महितीत तब्बल 4608 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या असलेल्या 72.782 दशलक्ष नोटांचा फरक होता!.. (७)
वरील माहिती ठराविक काळाबद्दल ची आहे. या RTI बद्दल ची मी दिलेली माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे, जी मी अगदी सहज गूगल वर शोधू शकलो. परंतु, 2005 ते 2014 मधील वेगवेगळ्या काळातील सगळी माहिती एकत्र केली तर ही आकडेवारी तब्बल 2.5 ते 3 लाख कोटी रुपयांच्या वर जाऊ शकते.. (८)
मग मोदी सरकार का गप्प आहे? दोन कारणे -
परसेप्शन : नोटबंदी फेल झाली कारण 99.6% नोटा परत बँकेत आल्या. फॅक्ट ही आहे की सरकारने 500-1000 च्या नोटा स्वीकारणे वेळीच बंद केले नसते तर 99.6% नाही, सरकारने अधिकृतपणे छापलेल्या एकूण मूल्याच्या 135% (ओरिजिनलच) नोटा परत आल्या असत्या!!.. (९)
गम्मत बघा, वरच्या 35% नोटा डुप्लिकेट असल्याचे सिद्धच होऊ शकत नव्हते, कारण त्या सेक्युरिटी प्रेस मध्येच छापल्या गेल्या होत्या पण फक्त छपाईच्या हिशोबात मोजल्या गेल्या नव्हत्या - ज्या थेट RBI मध्ये जात होत्या व RBI च्या वॉल्ट मधून सरकारी सुरक्षेतच पुढे.. (१०)
सरकारकडून अधिकृत छापलेल्या नोटा व त्याच्या मूल्याच्या वर एक जरी नोट परत आली असती, तरी या सगळ्यात RBI या संस्थेच्या रेप्यूटेशन ची वाट लागली असती आणि RBI सहित इंडियन सेक्युरिटी प्रेस, भारत सरकार आणि 'भारतीय रुपया' या सगळ्यांची क्रेडीबिलिटीच संपली असती!.. (११)
मोदी PM झाले तेंव्हा प्रणबदा राष्ट्रपती होते. चिदंबरम व प्रणबदा UPA काळात फाइनांस मिनिस्टर होते. RBI प्रमाणे राष्ट्रपती भवनही एक इंस्टिट्यूशन (संस्था) आहे जीची क्रेडिबिलिटी जपणे आवश्यक होते! देशाच्या राष्ट्रपतींची भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशी न करण्याची 'हतबलता' मी म्हणत होतो.. (१२)
बाकी, या झोल मध्ये 'नेपाळ रूट' मोठ्या प्रमाणात वापरला गेला होता. नोटबंदी च्या आधी नेपाळ मध्ये भारतीय चलनात सपूर्ण व्यवहार होत असत. 500 आणि 1000 च्या लाखो नोटा नेपाळ च्या बँकांमध्ये नोटबंदी च्या काळात जमा झाल्या. नोटबंदी घोषित होताच तिकडच्या बँकांनी त्या जमा करून घेतल्या.. (१३)
पण बदलून देण्यासाठी मोदी सरकारने नवीन नोटा नेपाळला दिल्याच नाहीत. मोदी सरकारने नेपाळ ला काही काळ आशेवर ठेवलं की भारताची गरज भागली की तिकडच्या नोटा बदलून देऊ. नेपाळ (आणि नोटा जमा करणारे) गाफील राहिले. ही रक्कम हजारो कोटींच्या घरात होती. मग मोदींनी एक दिवस त्यांना थेट कोलले.. (१४)
पण आश्चर्यकारक बाब म्हणजे, नोटबंदीच्या काळात नेपाळी बँकांकडे 500 आणि 1000 च्या नोटा ज्यांनी जमा केल्या, त्यातील कोणीही त्या बदलुन मिळवण्यासाठी त्यानंतर समोर आले नाहीत.. आणि नेपाळी बँकांचेही नुकसान झाले नाही. नेमकं नुकसान झालं कोणाचं मग? कोणाचे पैसे डुबले मी सांगायला नको.. (१५)
तात्पर्य असं की, नोटबंदी तर यशस्वी झाली! पण 'पूर्णपणे' यशस्वी झाली असं म्हणता येणार नाही. कारण, युपीए काळात प्रचंड मोठा 'नोट छपाई झोल' तर झालाच होता (त्याच UPA ने RTI ला दिलेल्या माहितीनुसार), पण दुर्दैवाने झोलर त्यातून वाचले - हे नोटबंदीचं अपयश मी मानतो..😊
(समाप्त).

جاري تحميل الاقتراحات...