Omkar Pawar, IAS
Omkar Pawar, IAS

@omkar2121

10 تغريدة 19 قراءة Dec 08, 2022
मी, यूपीएससी, आणि माझं कुटुंब
माझी आई❤️
१.मी जेंव्हा स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आईला का कुणास ठाऊक पण मी BDO(गट विकास अधिकारी) व्हावं असं वाटतं होते. तिला त्यांच काम काय असते याची पण काही कल्पना नव्हती . त्याचं झालं असं होत की १९९४ साली (१/n)
आमच्या घरच्यांनी दुसऱ्याचे शेत करायला घेतले होते. तो व्यक्ती BDO होता. तिने बघितलेले ते सर्वात उच्च सरकारी अधिकारी होते. त्या काळात त्यांचा रुबाब बघून सगळेच हरखून जायचे. माझी आई पण त्याला अपवाद नव्हती. ग्रामीण भागात लोकांना सरकारी नोकरी म्हणजे खूप मोठी गोष्ट होती.(२/n)
म्हणून मग ज्या दिवशी माझा IAS चा निकाल लागला तेव्हा मी आईला हेच सांगितले की हे BDO सारखं च काम असते😀😀(३/n)
२. आमची बागायती शेती आहे. मग बऱ्याच वेळा आई भाजीपाला घेऊन पाचगणी च्या बाजारा मधे विक्री साठी जायची. कोणत्याही बाजाराची एक system असते. त्यात विक्रेत्यांच्या जागा फिक्स असतात. पण माझी आई कधीतरी बाजाराला जायची त्यामुळे जागेवरून खूप वाद व्हायचे. (४/n)
वरून पाचगणी नगरपरिषद चे कर्मचारी पण जागेवरून खूप त्रास द्यायचे. जेव्हा मी upsc चा अभ्यास चालू केला तेव्हा तिने विचार करून ठेवलेला की मी पास झालो की तिला माझ्या सरकारी पदाच्या जोरावर एक फिक्स जागा मिळवून देईल. आणि मग तिच्याशी वाद घालायची कुणाची हिम्मत होणार नाही..😀😀(५/n)
माझी आजी
माझी आजी आज ८१ वर्षाची आहे. तिने शाळेची पायरी पण चढली नाही. आजीचा मी सगळ्यात लाडका आहे. तिला असे कायम वाटत की मी तिच्या जवळच राहावं. मी दूर गेलो की तिला टेन्शन येतं. आमचे बऱ्यापैकी नातेवाईक मुंबई मधे असल्यामुळे मुंबई तिला secure वाटायचं (६/n)
म्हणून जेव्हा मी upsc इंटरव्ह्यू ला जायचो तेव्हा तिला हे सांगून जायचो की Delhi जास्त लांब नाहीय,जस्ट मुंबई च्या पुढे आहे.त्यामुळे मी लांब जातच नाहीय.पास झाल्यावर पण हेच सांगितले की कामाच ठिकाण हे मुंबईच आहे. तिच्या पुण्याईने असेल कदाचित की मला महाराष्ट्र cadre च मिळाल😀(७/n)
माझे आजोबा
माझे आजोबा हे आयुष्य भर माथाडी कामगार होते. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी हमाली चे काम सुरू केले. त्यांनी एका अशा कालखंडात(60s, 70s, 80s) मुंबई बघितली की तेव्हा मुंबई चे transition होत होत. तेव्हा च गुन्हेगारी जगत त्यांनीं जवळून पाहिले.(८/n)
त्याचाच परिणाम की काय म्हणून जेव्हा मी मसुरी ला ट्रेनिंग ला येत होतो तेंव्हा जवळ बोलावून एक advise दिली की प्रवासात कुणी अनोळखी व्यक्तीने दिलेलं chocolate अजिबात खाऊ नकोस. त्यात गुंगीच औषध असू शकते. 😀😀(९/n)
गावातली लोक साधी भोळी असतात. माझ्या प्रवासात गावकऱ्यांनी मला खूप support केला.माझा जन्म शहरात झाला असता तर कदाचित ह्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या नसत्या.मी जे काही आहे त्यात माझ्या कुटुंबाचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्या शिवाय हे सगळे शक्य च नव्हते.(१०/१०) end

جاري تحميل الاقتراحات...