Aditya_Nerlikar
Aditya_Nerlikar

@nerlikar_adi

24 تغريدة 16 قراءة Dec 01, 2022
जोतिबा फुले हे माझे शाळेत असल्यापासून ते त्यांचे साहित्य अभ्यासेपर्यंत आदर्श होते; मात्र फुलेंचे साहित्य वाचल्यानंतर माझे फुल्यांविषयीचे मत बदलले. माझे फुलेंबद्दल मत बदलण्याच्या कारणाचे स्पष्टीकरणही मी येथे सप्रमाण देतो.
छत्रपती शिवराय हे अखिल महाराष्ट्राचे दैवत आहे. शिवरायांबद्दल एकही अपशब्द मराठी माणसाला सहन होत नाही. याचप्रमाणे वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळ असल्याने तो संप्रदाय उभे करणारे व वाढवणारे
संतही आपल्याला शिवप्रभूंइतकेच वंदनीय असल्याने संतांबद्दल कुणी काढलेले अनुचित उद्गारही खऱ्या मराठी माणसाला सहन होत नाहीत.
फूलेंनी त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकांमध्ये (शेतकऱ्याचा आसूड व गुलामगिरी) ब्राह्मणांसोबतच हिंदू धर्म, हिंदू देवदेवता व संत यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत.
मी सुरूवातीला फुलेंचे #गुलामगिरी हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा त्यात मला बऱ्याचशा गोष्टींमध्ये विसंगती पाहायला मिळाली. बौद्ध धर्माला भारतातून हद्दपार करण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी ब्राह्मणी कावा केल्याचे फूले म्हणतात.
आद्य शंकराचार्य हे ब्राह्मण असल्यामुळे शंकराचार्य कारस्थानीच असतील असे ब्राह्मण्याबद्दल पुर्वग्रहदुषित मत असलेल्यांना वाटणे साहजिकच आहे; मात्र मी शंकराचार्यांचे सगळे साहित्य पुर्वीच वाचलेले असल्याने मला फुलेंच्या बोलण्यातील फोलपणा लगेच जाणवला.
दुसरे असे की, भारत देशावर भारताबाहेरील इस्लामी शासकांनी ज्या स्वाऱ्या केल्या त्या स्वाऱ्यांमागील त्यांचे हेतू हे मुख्यतः इस्लामचा प्रसार व भारतातील देवळांमधील संपत्ती बळकावणे हे होते.
मात्र फूलेंचे मत आहे की, येथील बहूजनांना ब्राह्मणांच्या ब्रह्मकारस्थानातून सोडवण्यासाठी इस्लामी राज्यकर्त्यांनी येथील देऊळे फोडली. म्हणजेच फुल्यांना येथील ब्राह्मण शत्रू वाटतात; परंतु बाहेरील इस्लामी राज्यकर्ते कल्याणकारी वाटतात.
ह्या इस्लामी शासकांनी भारतील देवळे फोडण्याबरोबरच येथील स्त्रियांवर अत्याचारही केले. मग ते अत्याचारही बहूजनांना ब्राह्मणांच्या कारस्थानातून सोडवण्याचा भाग होते असे फुलेंच्या तर्कानुसार म्हणायचे का ?
संत ज्ञानेश्वरांविषयी फुले म्हणतात की, इस्लामी राज्यकर्त्यांनी येथील बहूजनांना ब्राह्मणांच्या कटातून सोडवण्यासाठी बाहेरून आलेल्या इस्लामी राज्यकर्त्यांबद्दल जनतेच्या मनात इस्लामविषयी रोष निर्माण व्हावा म्हणून ज्ञानेश्वर व मुकुंदराज ह्या ब्राह्मणांनी भागवत बखरीतील
(भागवत पुराणातील) काल्पनिक भाग उचलून ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ लिहून लोकांच्या मनात म्लेंच्छाविषयी रोष निर्माण केला.
फुलेंच्या ह्या बोलण्यात सरळसरळ इस्लामी राज्यकर्ते हे कल्याणकारी असून येथील ज्ञानेश्वरांसारखे संत (जे केवळ जातीने ब्राह्मण असल्यामुळे) बहुजनांचे शत्रू असल्याचे दिसून येते.
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भागवतातील काल्पनिक कथांवर आधारित नसून तो गीतेचे मराठीतील भाषांतर आहे याबद्दल फुले पूर्ण अज्ञानी असल्याचे येथे दिसून येते.
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत भक्तीमार्गाचा सर्वाधिक पुरस्कार केलेला असून भक्तीच्या बाबतीत जात धर्म वर्ण पंथ यांना किंमत नसल्याचे
मात्र फुलेंना ते न दिसता जे ज्ञानेश्वरांनी केलेच नाही ते कसे दिसले ? याचा अर्थ नेमका काय समजायचा ? फुले ज्ञानेश्वरांविरूद्ध तुकोबांनाही उभे करू पाहतात. फुलेंना तुकाराम एवढ्याच साठी प्रिय वाटतात कारण ते एका शेतकरी कुटुंबातील होते.
फुलेंचे मत आहे की, तुकाराम नामक एका शेतकरी कुटुंबातील साधूने अक्षरशून्य शिवाजी राजांच्यासोबतीने बहुजनांचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला.फुलेंनी येथे शिवरायांना अक्षरशून्य राजा असे संबोधन वापरले आहे, तिकडे मी आपले पुन्हा लक्ष वेधतो.
फुले तुकोबांना ज्ञानदेवांविरोधात तसेच ब्राह्मणांविरोधात उभे करून त्यांची बहूजनांचे कैवारी अशी जी प्रतिमा उभी करू पाहतात, यात काहीही तथ्य नाही. कारण तुकोबा स्वतः ज्ञानदेवांविषयी "ज्ञानियांचा गुरू राजा महाराव" असे आदराचे उद्गार काढतात.
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट - फुले शिवरायांना #अक्षरशून्य असल्याचे म्हणतात. शिवराय खरोखरच अक्षरशून्य होते का ? केवळ रामदास स्वामी व गागाभट्टांवर (जे जातीने ब्राह्मण होते) टिकास्त्र डागण्यासाठी फुलेंनी शिवरायांना अक्षरशून्य हे विशेषण लावले आहे.
मग फूल्यांच्या म्हणण्यानुसार शिवराय खरोखर अडाणी होते असे आपण मानणार का ?
एकीकडे "सहा सोनेरी पाने" ह्या पुस्तकात सावरकरांनी "शिवाजीचे राज्य म्हणजे #काकतालिय_योग" असा नुसता शब्द वापरल्यामुळे सावरकरांना शिवद्रोही ठरवणारे पुरोगामी फुलेंनी
शिवरायांना #अक्षरशून्य_राजा म्हटल्यावर फुलेंना शिवद्रोही म्हणतील का ? उलट लबाड पुरोगाम्यांनी आजपर्यंत फुलेंनी शिवरायांबद्दल वापरलेले हे शब्द पद्धतशीरपणे झाकून ठेवले. सावरकरांचे साहित्य वाचून त्यातील चूका शोधणाऱ्या पुरोगाम्यांनी 'गुलामगिरी' हे पुस्तक वाचलेले नाही असे समजावे का ?
हेच पुरोगामी लोक विरोधी मत असणाऱ्यांशी चर्चा करताना वारंवार समग्र फुले वाचण्याचा सल्ला देत असतात, हे आपण ध्यानात घ्या.छत्रपती शिवराय व ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंतचे सर्व संत हे मराठी माणसाचे सर्वात मोठे आदर्श असून इतर लोक त्यानंतरच्या आदर्शांच्या रांगेत येतात.
मग ते फुले असो अथवा इतर कोणी. जर ह्या लोकांमधील कुणीही शिवराय अथवा संतांबद्दल असे अनुचित उद्गार काढत असेल तर असा माणूस कितीही मोठा असला तरी आमच्या लेखी तो आदराला पात्र असू शकत नाही.
हा लेख वाचल्यानंतरही ज्यांना फुलेच कसे बरोबर हे पटवून द्यावे वाटत असेल अशांच्या मनात शिवप्रभूंबद्दल व संतांबद्दल असलेल्या आदरापेक्षा स्वतःच्या पुर्वग्रहांना, मनातील ब्राह्मणद्वेषाला अधिक मोलाचे स्थान असल्याचे समजून घ्या.
#टीप - अतीशहाण्या पुरोगाम्यांनी येथे ज्ञान पाजळण्याआधी शिवरायांना अक्षरशून्य राजा हे विशेषण का वापरले याचे स्पष्टीकरण द्यावे.
स्क्रीनशॉटमधील परिच्छेद हा #शेतकऱ्याचा_आसूड ह्या पुस्तकातील आहे.
G.j.ह्यांच्या wlla वरून प्रकाशित करण्यात आले आहे
@Chh_Udayanraje @YuvrajSambhaji ह्यावर काय बोलणार

جاري تحميل الاقتراحات...