राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

9 تغريدة Feb 28, 2023
सोशल मीडियावर लिहायला कोणतेही ठरलेले प्रोटोकॉल नाहीयेत. SMवरील लिखाणावर कोणती रेग्युलेटरी बॉडीही नाही. इकडे कोणीही उठून काहीही लिहू शकतो, हे खरं आहे. तरीही, गेल्या दशकभरात SMचा वापर आणि प्रभाव दोन्हीही मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने काही अलिखित नियम साधारणतः आपण सगळेच पाळतो..
जसं लिखाण वाढत जातं, तसं सर्वसाधारण वाचक काही प्रोफाइल/हँडल्स बद्दल मत बनवू लागतात. लेखकांची विशिष्ट शैली, विषयांवरील रिसर्च किंवा अभ्यास, विचारधारा अशा अनेक गोष्टींकडे बघून मग फॉलोवर्स त्या प्रोफाइल/हँडल्स भोवती गोळा होऊ लागतात..
यातील अनेक लोकं अशी असतात जे जीवनात यशस्वी असतील (किंवा नसतीलही!) पण त्यांना 'स्पॉट-लाईट' मिळालेला नसतो. त्यामुळे या आभासी दुनियेत मिळणारी प्रसिद्धी त्यांच्यासाठी आनंददायी व इतरांना हेवा वाटावी अशीच असते. कधीकधी तर यांना यांचे घरचेही विचारत नसतात, पण इकडे मात्र कौतुक होतं..
कोणाचं जर कौतुक होत असेल तर त्यात इतरांना वाईट वाटायची गरज नाही. चांगलं, माहितीपूर्ण लिहिलं तर कौतुक झालंही पाहिजे. पण कौतुक आणि प्रसिद्धी जशी या लोकांना नव्यानेच मिळत असते, तसं ते कौतुक आणि ती प्रसिद्धी हाताळणे हेही त्यांना जमलं पाहिजे.
आणि, नेमका इकडेच गोंधळ सुरू होतो..
प्रसिद्धी मिळाली, कौतुकाचा वर्षाव झाला, फॉलोवर्स वाढले की यातील काही लोकांच्या डोक्यात मवेगळीच हवा जाते! कोणी माज दाखवतात, कोणी उर्मटपणा दाखवतात तर काहींची विनम्रता गायब होते. इतकंच नाही, ज्या विचारधारेचा पुरस्कार करत फॉलोवर्स गोळा करतात, त्या विचारधारेशीच प्रतारणाही करतात..
याची पुढची स्टेप अशी असते की आपण वेगळे आहोत हे दाखवण्याच्या नादात ही लोकं मग काही तरी जिनियस असल्यागत कॉन्स्पिरसी थेअऱ्या मांडतात. यात हे तुमच्या-माझ्या सारख्या लोकांना नाही, तर थेट मोदी-शहा, फडणवीस यांनाच शिकवायला जातात.. आणि, (कदाचित नकळतपणे) विरोधकांचा अजेंडा पुढे रेटतात..
असं झालं की पंचाईत होते ती आपल्या सारख्या लोकांची. जसं जमतंय तसं तोडक्या-मोडक्या भाषेत आपलं मत मांडणारे माझ्या सारखे नवखे युजर्स ज्यांच्याकडून काही शिकत असतात, त्यांनीच जर माती खाल्ली तर आम्ही बघायचं कोणाकडे?
की, हेच ते 'ट्रोजन हॉर्स' आहेत.. ज्यांनी आपल्यालाच मूर्ख बनवलेलं आहे?
असो! आज हे सगळं लिहीत आहे कारण हल्लीच, आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने मोठे झालेले काही हँडल/FB प्रोफाइल अचानक आपल्याच नेत्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत, पक्षाला अडचणीत आणत आहेत आणि फॉलोवर्स गोळा करताना वापरलेल्या विचारधारेलाही शुगर-कोटेड तिलांजली देत आहेत!
माझ्या सारख्या सामान्य युजर ला हे सगळं दिसत होतं, तर यात मुरलेल्या लोकांना हे माहीत नसेल का? नक्कीच माहीत होतं. पण म्हणतात ना - first time is accident, second time is coincidence, third time is conspiracy!!
येत्या काही दिवसांत काही कारस्थानी लोकांचा बाजार उठणार आहे हे नक्की..😷

جاري تحميل الاقتراحات...