'जर घाण साफ करायची असेल तर स्वतः गटारात उतरावंच लागतं!'. 2011 च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले @annamalai_k यांनी 8 वर्षे विविध ठिकाणी क्रिमीनल्स व माफिया यांना ना सळो की पळो करून सोडल्यावर जनसेवेचे व्रत खऱ्या अर्थाने पुढे नेण्यासाठी राजकारणात उडी घेतली आणि भाजप जॉईन केली..
अण्णामलाई कुप्पुस्वामी यांनी दक्षिण बंगळुरूमध्ये पोलीस उपायुक्त असताना भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला होता. अण्णामलाई यांना कर्नाटकात आजही सिंघम अण्णामलाई असे म्हटले जाते. आता ते तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत..
अण्णामलाई यांच्या प्रवेशने तामिळनाडूच्या राजकारणात सगळंच बदलले आहे. जयललिता आणि करुणानिधी यांच्या जाण्याने निर्माण झालेली तामिळनाडूतील राजकीय पोकळी आज अण्णामलाई भरून काढत आहेत - तेही पेरियारवाद, प्रादेशिक अस्मितेचा अतिरेक, जातीवाद आणि हिंदुद्रोही राजकारणाच्या छाताडावर पाय ठेवून!
आज तामिळनाडूत खुंटलेला विकास, बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर जनता उघडपणे बोलू लागली असून घराणेशाही ची तळी उचलायला तामिळनाडूच्या युवा पिढीने नकार दिला आहे. या सकारात्मक बदलाचे श्रेय फक्त आणि फक्त अण्णामलाई यांना व त्यांनी जनतेशी संबंधित 'खऱ्या' विषयांवर उभारलेल्या लढ्याला जाते..
2021 च्या विधानसभा निवडणुकीत 4 जागा जिंकल्यानंतर, पुढील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये 308 जागा भाजपने जिंकल्या. गेल्या 2 वर्षांमध्ये TNच्या कानाकोपऱ्यात अण्णामलाई पोहोचले असून त्यांच्या रॅली व रोड-शो ना मिळणारा प्रतिसाद बघून स्टॅलिन व डीएमकेच्या पायाखालची वाळू सरकली आहे..
कोयम्बतुर स्फोट, आयसिस मॉड्युल्स आणि जिहादी वळवळीची तामिळनाडूत सातत्याने होत असलेली वाढ, यावर अण्णामलाई हे राज्यातील एकमेव नेते आहेत जे आज उघडपणे बोलत आहेत व सरकारला कारवाई करण्यास भागही पाडत आहेत..
आता मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट : सन टीव्ही, कलैग्नार टीव्ही आणि मुरासोली जे करुणानिधी आणि मारन कुटुंबियांच्या मालकीची मीडिया आहे त्यांना अण्णामलाई कोलतात! साधा एक बाईट देत नाहीत. वर त्यांना माकडं पण म्हटलं! आणि, असं म्हटल्यावर झालेल्या गदारोळानंतर माफी मागायला नकार दिला..
बी एस येड्यूरप्पा यांनी दक्षिणेत भाजपचा झेंडा सर्वप्रथम रोवला होता, व पहिले दक्षिणेतील भाजप सरकार बनवून दाखवलं होतं! आज अण्णामलाई जशी मेहनत घेत आहेत, ती पाहता.. तो दिवस दूर नाही, जेंव्हा तामिळनाडूतूनही 'अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा!'
शुभेच्छा सर..💐
शुभेच्छा सर..💐
جاري تحميل الاقتراحات...