Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

5 تغريدة 2 قراءة Feb 22, 2023
१९७४ साली दादर येथील शिवाजी पार्कवर शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टी उभारलेली.
‘मराठा’ शराद पवार यांनी शिवसृष्टीत केवळ हजेरीच नाही लावली पण शिवशाहीरांच्या प्रयत्नांचे गुण-गान ही गायले होते.
इथे ‘मराठा’ उल्लेख करण्याचे कारण पुढे लक्षात येईलच.
१/५
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाची पहिली आवृत्ति इ.स. १९५८ साली प्रकाशित झाली होती.
याचा अर्थ, १९७४ सालापर्यंत या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या.
बाबासाहेबांनी शिवाजी पार्कवर साकारलेल्या शिवसृष्टीत यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र…
२/५
…राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आदि दिग्गज ‘मराठा’ समाजातील नेते येऊन गेलेले.
पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले तथा माँसाहेब बाबासाहेब पुरंदरेंच्या पाठीशी खंबीरपणाने उभ्या होत्याच.
आज पर्यंत ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या लाखों प्रती विकल्या गेल्या आहेत.
३/५
मराठा समाजातील असंख्य लोकांनी ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ विकत घेतला आहे. बाबासाहेबांचे ‘जाणता राजा’ हे महानाट्य पाहिलेले आहे. बाबासाहेबांवर जीवापाड प्रेम केलेलं आहे.
मग अचानक, बाबरमती च्या पातशाहचे गुलाम मराठा समाजातील लोकांच्या रक्तावर संशय घेऊन काय करु इच्छितात?
४/५
हा महाराष्ट्रात जातीयवादी वाद पेटवण्याचा नवा डाव आहे का?
साहेबांच्या गुलामांना ‘मराठी’ भाषा कळत नाही या कारणामुळे महाराष्ट्राने त्रास का सहन करायचा?
टीपः ही टीका नाही. तसं ही आजकाल साहेबप्रेम्यांच्या बुद्धी चे धिंडवणे काढण्यात मला कंटाळा येतो!
P.C. जगन्नाथ चव्हाण
५/५

جاري تحميل الاقتراحات...