Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

5 تغريدة 2 قراءة Feb 22, 2023
कै.श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांस,
बाबासाहेब, आज तुम्हाला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. आयुष्यभर तुम्ही आदिशक्ति आई तुळजाभवानी गोंधळ गात शिवछत्रपतींची महापूजा मांडलीत. तुमचे आयुष्य जगून झाले होते.
आज, तुमचे स्वप्न पूर्ण होत आले आहेत. आणि म्हणूनंच तुमची उणीव अधिक भासवतीये.
१/५
होय बाबासाहेब. तुमचे स्वप्न पूर्ण होत आले आहे. हे बघायला तुम्ही आज असायला हवे होतात.
२ दिवसांपूर्वी मला तुमचे साकार होत असलेले स्वप्न जवळून बघायला मिळाले. तुमच्या संकल्पनेतील शिवनृपतींचा जो महायज्ञ साकार होणार आहे तो या भारत देशात आजपर्यंत कोणीही अनुभवलेला नाही.
२/५
बाबासाहेब, तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे या महायज्ञासाठी कष्टांची पराकाष्टा करत आहेत.
तुमच्यावर प्रेम करणारे शिवप्रभूंच्या या महायज्ञनासाठी लागणारी एक-एक समीधा आणण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत.
बाबासाहेब, हे बघायला तुम्ही आज हवे होतात.
३/५
माझ्यासह असंख्य लोकांना तुम्ही शिवचरित्राची गोडी लावलीत.
प्रभु श्रीरामचंद्रानंतर या पृथ्वीवर जन्माला आलेल्या सर्वोत्तम पुरुषाचे आयुष्य तुम्ही आम्हाला सहजतेने सांगितलेत.
लवकरच, या महान युगपुरुष शककर्त्याचे आयुष्य एका स्वराज्य-संस्थापकांस साजेल अशा स्वरुपात जगासमोर येईल.
४/५
आणि हे केवळ तुमच्यामुळे आणि तुम्ही दिशा दाखवलेल्या लोकांमुळे शक्य झाले आहे.
या साठी, शिवचरित्राचा एक अभ्यासक म्हणून, मी तुमचा आजन्म ऋणी राहीन.
बाबासाहेब, तुमच्या पुण्यस्मृतीस त्रिवार वंदन💐🙏🏼
🚩🙏🏼जय भवानी, जय शिवराय🙏🏼🚩
५/५

جاري تحميل الاقتراحات...