राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

8 تغريدة Feb 28, 2023
बाबरी पाडल्याचे क्रेडिट (थ्रेड) : (शेवटचे ट्विट : पुरावा) -
आज प्रयागराज HCने अडवाणी यांच्या सहित 32 रामभक्तांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान देणारी याचिका फेटाळली! हे समजताच, पूर्वी 'जर-तर' म्हणत क्रेडिट घेतलेल्यांनी आता पुन्हा एकदा क्रेडिट खायचा घाट घातलाय!
⚡ फॅक्ट-चेक : 👇
खालील माहिती मी देत नाहीये, पण नक्की वाचा :
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता! पण मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर यांसारखे बाळासाहेबांचे शिलेदार मुंबईतून अयोध्येला जातो म्हणून गेले होते हेही खरं आहे..👇
अयोध्यानगरी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपचे वरिष्ठ नेते व व कार्यकर्त्यांमुळे खचाखच भरले होते. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सर्व व्यवस्था आधीच फुल्ल झाली होती. जागा नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांची तात्पुरते तंबूत तळ ठोकण्यास सांगण्यात आले..👇
कारसेवा करायला गेलेल्या शिवसेना नेत्यांना चांगल्या सुखसोयी असलेल्या हॉटेल मध्ये नाही तर तंबूत तात्पुरते ऍडजस्ट करायला सांगितलं गेलं हे अपमानास्पद वाटलं. त्यांनी ठाकरे यांना फोन केला, बाळासाहेबांनी त्यांना मुंबईत परतण्याचे आदेश दिले! हे 4 डिसेंबर 1992 रोजी घडलं..
आदेश येताच पहिली ट्रेन पकडून हे नेते आयोध्येतून निघाले खरे, पण ज्या दिवशी बाबरी जमीनदोस्त केली गेली, त्या 6 डिसेंबर 1992 रोजी शिवसैनिक कलकत्तामध्ये होते. कुठे? 900 किलोमीटर दूर मुंबईपासून विरुद्ध दिशेला असलेल्या कलकत्त्यात!!👇
बाबरी पाडण्यात काडीमात्र सहभाग नसलेल्या शिवसेनेने व बाळासाहेब ठाकरे यांनी 'जर'-'तर' म्हणत क्रेडिट घेतले. पण कालांतराने श्रीकृष्ण आयोग, लिबरहान कमिशन आणि अलाहाबाद HCने त्यांना समन धाडल्यावर मीडियाने मला misquote करून चुकीची बातमी छापली, असं म्हणून बाळ ठाकरे भडकले होते!👇
ते इतके भडकले होते की 6 डिसेंबर 1992 रोजी 'जर-तर' म्हणत क्रेडिट घेतलेलं असूनही नंतर 'भाजपच्या नेत्यांनी बाबरी पाडल्याची जबाबदारी माझ्यावर ढकलली' असं म्हणत बाळ ठाकरे यांनी भाजप नेत्यांना अक्षरशः शिव्या घातल्या होत्या. त्यांना आयतं क्रेडिट हवं होतं, पण परिणाम भोगायचे नव्हते!👇
वरील माहिती मी किंवा भाजप देत नाहीये. ही माहिती शिसेउबाठा चा मित्रपक्ष असलेल्या, आजही मविआ चा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे मुखपत्र व स्वतः सोनिया आणि राहुल गांधी मालक असलेल्या 'नॅशनल हेराल्ड' मध्ये 25 नोव्हेंम्बर 2018 रोजी दिली आहे..😬 :
nationalheraldindia.com

جاري تحميل الاقتراحات...