राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩
राईट विंग ऑफ महाराष्ट्र 🚩

@RWofMH

12 تغريدة Feb 28, 2023
राऊत-पत्राचाळ प्रकरण :
पत्राचाळ प्रकरण काय आहे?
मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला आणि 2008 साली पत्राचाळ पुनर्विकास हा प्रकल्प सुरू झाला..
म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला.
13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं..
पण या जमिनी गुरुआशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं आणि आणि हा प्रकल्प रखडला. 1034 कोटी रुपयांची फसवणूक या सर्व लोकांनी मिळून केल्याची तक्रारही दाखल झाली..
पत्राचाळ रहिवाशांनी यासंदर्भात म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडा आणि खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. EOW (Economic offence Wing) कडूनही याप्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे.
तिकडे ईडीने या प्रकरणात उडी घेतली. ED ची एन्ट्री कोणामुळे झाली ते पुढे दिलं आहे..
पत्राचाळ सिद्धार्थ नगर गृहनिर्माण संस्थेच्या लोकांना घरं तर मिळालीच नव्हती, पण या काळात गुरूआशिष कंपनी HDIL ने टेक ओव्हर केली आणि घरं बाधांयचं सोडून परस्पर इतर बिल्डरांना जमिनी विकण्यात आल्या. या जागेवर काही प्रमाणात काम झालं असं म्हणत 306 घरांची लॉटरीही म्हाडाने काढली..
पत्राचाळ प्रकरणात 2 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली. प्रवीण राऊत यांच्या जमिनी, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट व वर्षा राऊत, स्वप्ना पाटकर यांच्या अलिबाग येथील जमिनी ताब्यात घेतल्या..
अजून बऱ्याच गोष्टींची चौकशी सुरू आहेच..
यात तक्रारदार कोण होतं? NCP च्या ताब्यातली म्हाडा! म्हाडाने नोंदवलेल्या FIR च्या आधारावर EDने चौकशी सुरू केली. यात गुरुआशिष कंपनी, सारंग वाधवान, राकेश वाधवान यांचाही समावेश आहे. गुरूआशिष कंपनीच्या या संचालकांनी 9 बिल्डरांना FSI विकून 901 कोटी रुपये कमवले..
गुरूआशिष कंपनीने त्यानंतर मिडोज नावाचाही प्रकल्प सुरू केला आणि ग्राहकांकडून 138 कोटी रुपये कमवले. या बांधकाम कंपनीने बेकायेदशीरपणे हा पैसा कमावला. या काळात गुरुआशिष बांधकाम कंपनी HDIL ने टेक ओव्हर केली. HDIL ने प्रवीण राऊत यांच्या बँक खात्यात 100 कोटी रुपये ट्रांसफर केले..
ही रक्कम नंतरच्या काळात प्रवीण राऊत यांनी जवळच्या लोकांच्या खात्यात वळवले. याच दरम्यान 2010 मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या 83 लाख रुपये वर्षा राऊत यांना मिळाले. अजून कोणाला काय मिळलं याचाही तपास सुरू आहे..
वर्षा राऊत यांनी दादर येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी या रकमेचाच वापर केल्याचा दावाही ईडीने केला आहे. ईडीने याची चौकशी सुरू केल्यानंतर वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांना 55 लाख रुपये परत केले.. वर्षा राऊत यांच्या नावावरील अलिबाग येथील 8 भूखंड सुद्धा ED ने जप्त केले..
ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी 55 लाख रुपये परत केले होते. ईडी खोटं बोलत होते तर संजय राऊत यांनी 55 लाख परत का केले? 55 लाख चेकने परत केले मग कॅश किती मिळाले असतील? तपास आणि केस चालू राहणार आहे..
जामीन मिळाला आहे याचा अर्थ निर्दोष नव्हे. जामीन मिळाला यावर कसले डीजे लावताय? ज्यांच्या पैशातून स्वतःच्या दादर पासून अलिबाग पर्यंत प्रॉपर्टी बनवल्या, त्या मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीतील 672 गरीब मराठी माणसांच्या घरांचं काय? हाथ वर? हा प्रश्न अनुत्तरितच आहे!
जय महाराष्ट्र!!

جاري تحميل الاقتراحات...